वृत्त विशेष

म्युच्युअल फंडाविषयी सविस्तर माहिती !

आपल्याला बऱ्याच वेळा गुंतवणूक करून जास्त परतावा मिळावा, अशी इच्छा असते; परंतु, गुंतवणूक साधने, त्यांची जोखीम यांचा पुरेसा अभ्यास नसणे आणि वेळेचा अभाव यामुळे प्रत्यक्ष गुंतवणूक होतच नाही. अशावेळी म्युच्युअल फंड या पर्यायाकडे गुंतवणूकदार बघू शकतात. म्युच्युअल फंड हे अधिक परतावा देणारे; पण अधिक जोखमीचे किंवा कमी जोखमीचे; पण कमी परतावा देणारे पर्याय उपलब्ध करून देतात, म्युच्युअल फंड्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, असा सतत डिसक्लेमर देणारा हा पर्याय खरंच आपल्यासाठी योग्य गुंतवणूक पर्याय असू शकतो का?

म्युच्युअल फंड म्हणजे काय?

म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे साधन आहे, म्युच्युअल फंड हे विविध अॅसेट मॅनेजमेंट कंपन्या ऑफर करतात आणि हे फंड व्यावसायिक फंड मॅनेजर्सद्वारे मॅनेज केले जातात, म्युच्युअल फंड लहान गुंतवणूकदारांना वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देतात. जे वैयक्त्तिकरीत्या अशा लहान गुंतवणूकदारांना शक्य नसते किवा अधिक जोखमीचे असू शकते. म्युच्युअल फंड हे युनिट स्वरूपात उपलब्ध असतात. प्रत्येक युनिटची किमत ही नेट अॅसेट व्हॅल्यू (NAV) स्वरूपात असते. गुंतवणूकदार म्युच्युअल फंड एकाच वेळी विकत घेऊ शकतात किवा दरमहा एका विशिष्ट रकमेला विकत घेऊ शकतात, याला एसआयपी (Systematic Investment Plan) असेही म्हणतात.

म्युच्युअल फंडचे प्रकार

इक्विटी फंड : हे म्युच्युअल फंड दीर्घकालीन वाढ आणि भांडवलाची वाढ या उद्देशाने प्रामुख्याने समभागामध्ये (Stocks) गुंतवणूक करतात.

बाँड/डेट फंड: बाँड फड प्रामुख्याने सरकारी आणि कॉर्पोरेट बाँड्ससारख्या निश्चित उत्पन्न सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतात, नियमित उत्पन्न देतात आणि इक्विटी फडांच्या तुलनेत तुलनेने कमी जोखमीचे असतात.

इंडेक्स फंड : इडेक्स फंड्सचे उद्दिष्ट निफ्टी ५० सारख्या विशिष्ट मार्केट इंडेक्सच्या कार्यप्रदर्शनाची प्रतिकृती स्वरूपात काम करतात. हे फंड व्यापक बाजार एक्सपोजर आणि मार्केट परफॉर्मन्सवर अवलंबून परतावा मिळवण्याचा प्रयत्न करतात.

बॅलन्स्ड फंड्स : हायब्रीड फंड म्हणूनही ओळखले जाणारे, हे म्युच्युअल फंड फंडाच्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टावर आधारित, वाढ आणि उत्पन्न यांच्यात संतुलन साधण्यासाठी स्टॉक आणि बाँड्सच्या मिश्रणात गुंतवणूक करतात.

इक्चिटी म्युच्युअल फंडचे प्रकार:

लार्ज कॅप इक्विटी फंड : हे म्युच्युअल फंड प्रामुख्याने दीर्घकालीन वाढीची क्षमता असलेल्या मोठ्या, सुस्थापित कंपन्यांच्या समभागामध्ये गुतवणूक करतात.

मिड कॅप इविचंटी फंड : हे म्युच्युअल फंड प्रामुख्याने मध्यम आकाराच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात ज्या कंपन्या सातत्याने ग्रोथ रेकॉर्ड करत आहेत आणि भविष्यात मोठ्या कंपन्या बनण्याची क्षमता आहे.

स्मॉल-कॅप इक्चिटी फंड: हे म्युच्युअल फंड प्रामुख्याने लहान कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात ज्यात उच्च वाढीची क्षमता असते; परंतु, उच्च अस्थिरता आणि जोखीमदेखील असते.

इंटरनॅशनल इक्विटी फंड : हे म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांच्या देशाबाहेर असलेल्या कपन्याच्या शेअर्समध्ये गुतवणूक करतात, ज्यामुळे जागतिक बाजारपेठा आणि विविधीकरणाचे फायदे मिळतात.

डेब्ट म्युच्युअल फंड म्हणजे काय?

सरकारी बाँड फंड: गव्हर्नमेंट बाँड फंड्स प्रामुख्याने सरकारने जारी केलेल्या बाँड्समध्ये गुंतवणूक करतात, कमी जोखीम आणि नियमित उत्पन्न देतात.

कॉर्पोरेट बाँड फंड :कॉर्पोरेट बॉड फंड सरकारी बाँडच्या तुलनेत उच्च पातळीवरील उत्पन्न प्रदान करण्याच्या उद्देशाने कंपन्यांद्वारे जारी केलेल्या बाँडमध्ये गुंतवणूक करतात.

अल्प-मुदतीचे बाँड फंड: अल्प मुदतीचे बाँड फंड कमी जोखीम आणि तुलनेने कमी अस्थिरतेसह नियमित उत्पन्न प्रदान करण्याच्या उद्देशाने, कमी मुदतीच्या रोख्यांमध्ये गुंतवणूक करतात.

डायनॅमिक बाँड फंड : हे म्युच्युअल फंड बाजारातील बदलत्या परिस्थिती आणि व्याजदराच्या अपेक्षांवर आधारित अल्प-मुदतीच्या आणि दीर्घ मुदतीच्या बाँड्सच्या मिश्रणात गुतवणूक करतात, ज्यामुळे उच्च परतावा मिळण्याची शक्यता असते; परंतु, जोखीमदेखील जास्त असू असते.

हेही वाचा – आपल्या बंद झालेल्या बँक खात्यातूनही पैसे काढू शकता; पाहा त्यासाठीचे नियम आणि प्रक्रिया

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.