महाराष्ट्र शासन निर्णय - GRइतर मागास बहुजन कल्याण विभागवृत्त विशेषसरकारी कामेसरकारी योजना

विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना – Gyanjyoti Savitribai Phule Aadhaar Scheme

वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी अनुदान देण्याबाबत राबविण्यात येणाऱ्या आदिवासी विकास विभागाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम व सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनाच्या धर्तीवर इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता योजना सुरु करण्यास मा मंत्रिमंडळाने दि.१९.१०.२०२३ रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता दिली आहे.

त्यानुसार, सदर बैठकीत विविध विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती, अधिछात्रवृत्ती, वसतिगृह व वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारा निर्वाह भत्ता, स्वाधार, स्वयंम अशा विविध प्रकारच्या योजनांमध्ये तसेच यापुढे प्रस्तावित करण्यात येणाऱ्या योजनांमध्ये एकसमानता रहावी यासाठी सर्वंकष धोरण निश्चित करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

सदर शासन निर्णयान्वये मा.अ.मु.स. (वित्त) यांच्या अध्यक्षतेखाली दि.०१.१२.२०२३ रोजी आयोजित बैठकीत झालेल्या निर्णयानुसार इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता निर्वाह भत्याची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेले / घेणारे भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून), आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योजना लागू करणेबाबत शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना – Gyanjyoti Savitribai Phule Aadhaar Scheme:

>

आदिवासी विकास विभागाची स्वयंम योजना व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वाधार योजनेच्या धर्तीवर इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता निर्वाह भत्याची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेले / घेणारे भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति जिल्हा ६०० या प्रमाणे एकूण २१,६०० विद्यार्थ्यांकरिता “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.

सदर योजनेंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी खालीलप्रमाणे निश्चित केल्यानुसार विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यात थेट रक्कम वितरीत करण्यात यावी.

अ.क्र खर्चाची बाब मुंबई शहर, उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी- चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम मुंबई इतर महसुली विभागीय शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम इतर जिल्ह्याचे ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम
भोजन भत्ता ३२,००० २८,००० २५,००० २३,०००
निवास भत्ता २०,००० १५,००० १२,००० १०,०००
निर्वाह भत्ता ८,००० ८,००० ६,००० ५,०००
प्रती विद्यार्थी एकूण संभाव्य वार्षिक खर्च ६०,००० ५१,००० ४३,००० ३८,०००

सदर योजनेसाठी रु.१०० कोटी इतक्या वार्षिक खर्चास मान्यता देण्यात येत आहे.

सदर योजनेंतर्गत लाभार्थी निवडीचे निकष व इतर अनुषंगिक बाबी संदर्भात स्वतंत्ररित्या शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल.

इतर मागास बहुजन कल्याण विभाग शासन निर्णय : इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना लागू करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना २०२३

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.