मयत सरकारी नोकर/निवृत्तीवेतनधारकाच्या दिव्यांग मुलांच्या कौटुंबिक निवृत्तीवेतनात अधिक वाढ करणार: केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह

केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले की, मयत सरकारी नोकर/निवृत्तीवेतनधारकाच्या दिव्यांग मुलांना मिळणाऱ्या निवृत्तीवेतनात अधिक वाढ होणार असून यासंबंधीचे निर्देश निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतन कल्याण विभागाने जारी केले आहेत.

केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह पुढे म्हणाले, की सीसीएस (पेन्शन) नियम 1972 या अंतर्गत निवृत्तीवेतन मंजूर करण्यासाठी मयत सरकारी नोकर/निवृत्तीवेतनधारकाच्या मुलाच्या/भावाच्या पात्रतेसाठी उत्पन्नाचे निकष शिथिल करण्याच्या सूचना जारी केल्या गेल्या आहेत. सरकारचे मत असे आहे, की कौटुंबिक निवृत्तीवेतनासाठी पात्रतेचे जे निकष, कुटुंबातील इतर सदस्यांच्या बाबतीत लागू असतात, ते अपंगत्व असलेल्या मुला/भावंडाच्या बाबतीत तसेच्या तसे लागू केले जाऊ शकत नाहीत.

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले, सरकारने अपंगत्व असलेल्या मुला/भावंडाच्या बाबतीत निवृत्तीवेतनासाठी पात्रतेच्या उत्पन्नाच्या निकषांचे पुनरावलोकन केले आहे आणि असा निर्णय घेतला आहे, की अशा मुलांसाठी /भावंडांसाठी कौटुंबिक निवृत्तीवेतन पात्रतेचे उत्पन्नाचे निकष, निवृत्तीवेतनासाठी पात्र इतर कुटुंबियांप्रमाणे यथायोग्य असतील.

निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतन कल्याण विभागाने सांगितले की, मंत्रीमहोदयांनी असे निर्देश/आदेश जारी केले आहेत की, मयत सरकारी नोकर/निवृत्तीवेतनधारकाचे मूल/भावंड, जे मानसिक किंवा शारीरिक अपंगत्वाने ग्रस्त आहे, जर त्याचे/तिचे एकूण उत्पन्न, निवृत्तीवेतनापेक्षा कमी असेल म्हणजेच मयत सरकारी नोकर/निवृत्तीवेतनधारकाला मिळालेल्या शेवटच्या वेतनाच्या 30% आणि त्यावरील स्वीकार्य महागाई भत्त्यासह एकत्रित उत्पन्नाइतके असेल, किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तो आजीवन कौटुंबिक निवृत्तीवेतनासाठी पात्र राहील.

हेही वाचा – पंचायत राज्य संस्थांनी त्यांच्या स्वउत्पन्नातून ५ टक्के निधीतून घ्यावयाच्या अपंग कल्याणासाठी योजना व खर्चाबाबत मार्गदर्शक सूचना

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.