सरकारी कामेवृत्त विशेष

UPI Payment : चुकून दुसऱ्याच्या मोबाइलवर पैसे पाठवल्यास परत पैसे कसे मिळवायचे ? जाणून घ्या सविस्तर !

आधुनिक जगामध्ये सगळेच व्यवहार आता ऑनलाईन होत आहेत. अगदी लहान – सहन गोष्टींसाठी आपण ऑनलाईन (UPI Payment) पेमेंट करतो. युपीआय पेमेंट हे एका अर्थी वरदान आहे, अगदी कुठेही कॅशलेस प्रवास करण्याची मुभा ही डिजिटल पेमेंट प्रणाली देऊ करते. पण कोणतीही गोष्ट म्हटली की फायदा व तोटे अशा दोन्ही बाजू बघणे गरजेचे आहे.

अर्थात युपीआयमुळे वाढते खर्च, मोबाईलवरील वाढलेलं अवलंबित्व हे सगळे त्रास तर समोर आहेतच पण त्याहीपेक्षा डोक्याला ताप ठरणारा एक प्रकार म्हणजे चुकून दुसऱ्याच नंबरवर किंवा अकाउंटला पैसे पाठवणे. अलीकडे खरंतर सगळीकडे क्युआर कोड स्कॅन करून पेमेंट करता येते पण जेव्हा तुम्हाला एखाद्या मोबाईल नंबरला पेमेंट करायचं असतं तेव्हा चूक होण्याची शक्यता टाळता येत नाही.

चुकून दुसऱ्याच्या मोबाइलवर पैसे पाठवल्यास परत पैसे कसे मिळवायचे ? जाणून घ्या सविस्तर ! UPI Dispute Redressal Mechanism:

यूपीआयद्वारे (UPI Payment) पैसे पाठविताना अनेकदा नजरचुकीने चुकीचा मोबाईल क्रमांक दाबला जातो. त्यामुळे चुकीच्या व्यक्तीला पैसे हस्तांतरित होतात. अशावेळी आपल्याला पैसे परत मिळू शकतात का? हा प्रश्न पडणे साहजिकच आहे.

आपण खबरदारी बाळगताना नंबर तपासूनच घेतो पण काहीवेळा एखाद्या व्यक्तीचा मोबाईल नंबर बदललेला असतो आणि इतर कुणाच्या अकाउंटशी लिंक झालेला असतो. तुम्ही याआधी याच नंबरवर व्यवहार केला असल्यास तुम्ही यावर पुन्हा पैसे पाठवत, पण यावेळेस ज्याचा मूळ क्रमांक होता त्याऐवजी ज्याच्या अकाउंटशी नंबर लिंक झालेला असतो त्याला पैसे जातात. आता अशा परिस्थितीत आपले पैसे कसे परत मिळवायचे हे आपण आज पाहणार आहोत.

समोरील व्यक्तीने नकार दिल्यास?

त्यात मुख्य अडचण अशी असते की, तुम्ही त्या व्यक्तीला ओळखत नसता. अशावेळी तुम्ही त्या व्यक्तीस लगेच फोन करून झालेला प्रकार सांगून पैसे परत करण्याची विनंती करू शकता. त्याने पैसे परत केले नाही, तर मात्र तुम्हाला नियमांनुसार प्रक्रिया पार पाडावी लागेल,

बँकेला माहिती द्या:

तज्ज्ञांनी सांगितले की, चुकून भलत्याच व्यक्तीला पैसे पाठविले गेल्याची तकार तुमच्या बँकेकडे तातडीने करा. पैसे पाठविल्याशी संबंधित पुरावे बँक तुमच्याकडे मागेल. खात्री पटल्यानंतर तुमचे पैसे परत मिळविण्याची प्रक्रिया बँकेकडून सुरू करण्यात येईल.

यूपीआय द्वारे पैसे चुकून गेल्यास परत मिळवण्यासाठी अशी करा ऑनलाइन तक्रार:

चुकीच्या हस्तांतरणाची तक्रार एनपीसीआयच्या वेबसाईटवरीही करता येऊ शकते. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या वेबसाईटवरील तक्रार निवारण सेक्शनमध्ये जाऊन आपली तक्रार नोंदविता येते.

१. सर्वप्रथम https://www.npci.org.in या वेबसाईटवर जाऊन What we do या पर्यायावरती क्लिक करा. त्यामध्ये UPI हा पर्याय निवडा. त्यामध्ये Dispute Redressal Mechanism इथे भेट द्या.

२. ‘Complaint’ नावाच्या बॉक्सवर जा. येथे ड्रॉप-डाउन मेनूमधून व्यवहाराचे स्वरूप निवडा. त्यानंतर समस्या निवडा. उदाहरणार्थ, तुम्ही चुकीच्या व्यक्तीला अनावधानाने पैसे हस्तांतरित केल्यामुळे, व्यवहाराचे स्वरूप ‘Person to Person’ आणि समस्या ‘Incorrectly transferred to another account’ असे निवडा.

सुरुवातीला, व्यक्तीने UPI ॲपवर तक्रार करावी. जर एखाद्या व्यक्तीच्या तक्रारीचे उत्तर मिळाले नाही तर पुढील टप्प्यावर बॅक एंड (PSP) आणि NPCI (तक्रार पोर्टलचा वापर करून) व्यवहार हाताळणाऱ्या बँकेकडे तक्रार दाखल करता येईल.

हेही वाचा – आपल्या बंद झालेल्या बँक खात्यातूनही पैसे काढू शकता; पाहा त्यासाठीचे नियम आणि प्रक्रिया

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.