वृत्त विशेष

अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा विधानसभा अध्यक्षांचा निकाल !

विधीमंडळातल्या बहुमताच्या आधारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवार गट हा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल आज दिला. त्यांना ५३ पैकी ४१ आमदारांचा पाठिंबा असल्याचं नार्वेकरांनी सांगितलं. दोन्ही गटांनी परस्परांच्या विरोधात दाखल केलेल्या अपात्रता याचिका फेटाळून लावल्या. त्यामुळं अजित पवारांच्या सोबतच्या आमदारांना पात्र ठरवतांना नार्वेकर यांनी शरद पवारांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांनाही पात्र ठरवलं आहे.

२९ जूनपर्यंत शरद पवार यांच्या अध्यक्ष पदाला कोणीही आव्हान दिलं नव्हतं. ३० जून रोजी पक्षात फूट पडली आणि दोन गट तयार झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेनुसार कार्यकारिणी सर्वोच्च आहे. मात्र त्यावर झालेल्या अनेक नियुक्ती पक्षाच्या घटनेतल्या तरतुदींचं उल्लंघन करणाऱ्या होत्या, असं निरीक्षण नार्वेकर यांनी नोंदवलं. विधानसभा अध्यक्षांनी आजच्या निकालात घटनेच्या १० व्या परिशिष्टाचा गैरवापर झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली.

पक्षातले मतभेद दडपण्यासाठी १० व्या परिशिष्टाचा वापर करता येणार नाही. पक्षांतर्गत मतभेद आणि पक्षांतर यात फरक आहे. पक्षांतर्गत मतभेद अथवा नेतृत्वाला विरोध ही पक्षविरोधी कारवाई ठरू शकत नाही, असं मत नार्वेकर यांनी आजच्या निकालात नोंदवलं. तसंच पक्षांतर्गत वाद सोडवण्याचे काम विधानसभा अध्यक्षांचं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

>

अजित पवार यांच्यासोबत असलेले खासदार सुनिल तटकरे यांनी या निकालाचं स्वागत केलं आहे. सर्व कायदेशीर बाबींचा विचार करुन नार्वेकर यांनी हा निकाल दिला आहे. शरद पवार यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात नाराजी होती, त्यामुळं एवढ्या मोठ्या संख्येनं आमदार बाहेर पडल्याचं ते म्हणाले.

या निकालात आश्चर्यजनक काहीही नसल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांच्यासोबत असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असून तिथेच दाद मागू. प्रादेशिक, मराठी पक्षांना कमकुवत करण्यासाठी हे प्रकार केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.