वृत्त विशेषबांधकाम कामगार कल्याणकारी योजना

बांधकाम कामगारांना ७ कोटी ३४ लाख कोटींच्या निधीचे वाटप

इमारत व इतर बांधकामांवर काम करणाऱ्या बांधकाम कामगारांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी, नूतनीकरण व लाभ वाटपांबाबतचे अर्ज तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाला दिले.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांना देण्यात येत असलेल्या ऑनलाईन सुविधांची आढावा बैठक घेतली, तेव्हा सदर निर्देश कामगार विभागाला देण्यात आले.

मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिलेल्या निर्देशानंतर कामगार विभागातील सर्व विभागीय कार्यालये व जिल्हा कार्यालयात दिनांक 28 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत शिबीरांचे आयोजन करून मोठ्या प्रमाणावर प्रलंबित अर्ज निकाली काढण्यात आले.

या चार दिवसात 55 हजार बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली तर एक हजार 200 कामगारांचे नूतनीकरण करण्यात आले. यापैकी 8 हजार 825 लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करून त्यांना 7 कोटी 34 लाख 21 हजार 832 रूपये वाटप करण्यात आले आहे.

>

हेही वाचा – बांधकाम कामगार लाभार्थी यादी ऑनलाईन पहा आणि लाभार्थी यादी मध्ये नाव नसेल तर नोंदणीची स्थिती जाणून घेऊन अशी करा नोंदणी अपडेट

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

2 thoughts on “बांधकाम कामगारांना ७ कोटी ३४ लाख कोटींच्या निधीचे वाटप

  • विजय महादेव लोहार

    दिवाळी बोनस जमा नाही झाला

    Reply
  • विजय महादेव लोहार

    बांधकाम कामगार

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.