शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! पोकरा योजनेचा दुसरा टप्पा सुरू!
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेतीला नवसंजीवनी देणारा आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेतीसाठी सक्षम उपाय योजना करणारा “नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प” (पोकरा योजना – PoCRA Yojana) आता टप्पा २ मध्ये दाखल झाला आहे. जागतिक बँक आणि महाराष्ट्र शासन यांचा संयुक्त पुढाकार असलेला हा प्रकल्प आता राज्यातील 21 जिल्ह्यांतील 7201 गावांमध्ये अंमलात आणला जाणार आहे. यामुळे लाखो शेतकरी, शेती गट, महिला बचतगट, शेतकरी उत्पादक संस्था व शाश्वत शेती करणारे लाभार्थी जोडले जाणार आहेत.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा योजना टप्पा -२) PoCRA Yojana:
पोकरा (POCRA) म्हणजे “Project on Climate Resilient Agriculture” अर्थात हवामान अनुकूल शेती प्रकल्प. पोकरा (PoCRA Yojana) योजनेचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना हवामान बदलाशी जुळवून घेता यावे, उत्पादनात सातत्य राखता यावे आणि आर्थिक जोखीम कमी करता यावी.
मुख्य उद्दिष्टे:
हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या शेतीच्या समस्यांवर उपाय.
मातीचे पोषण, पाणी साठवण, सेंद्रिय शेती, पीक पद्धतीतील सुधारणा.
उत्पादनात वाढ, शेतीतील जोखीम कमी करणे, शाश्वत शेतीची अंमलबजावणी.
डिजिटल साधनांचा वापर व आधुनिक शेती पद्धतींचा प्रसार.
टप्पा २ मध्ये काय विशेष?
2025 च्या जुलै महिन्यात शासनाने टप्पा २ साठी मंजुरी दिली असून, यामध्ये खालील महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे:
एकूण गुंतवणूक: सुमारे 6000 कोटी रुपये
त्यापैकी 70% निधी (₹4200 कोटी) जागतिक बँकेकडून अल्प व्याज दराने कर्ज
उर्वरित 30% निधी (₹1800 कोटी) राज्य शासनाकडून
कोणते जिल्हे समाविष्ट आहेत?
पोकरा (PoCRA Yojana) योजना टप्पा २ मध्ये खालील 21 जिल्ह्यांतील 7201 गावे या योजनेच्या कक्षेत येणार आहेत:
अकोला, अमरावती, बुलढाणा, जळगाव, नंदुरबार, नाशिक, नांदेड, लातूर, बीड, परभणी, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जालना, धाराशिव.
लाभार्थी कोण?
पोकरा (PoCRA Yojana) योजनेचा लाभ खालील घटकांना मिळणार आहे:
5 हेक्टरपर्यंत जमीनधारक असलेले शेतकरी.
महिला, अनुसूचित जाती व जमाती, दिव्यांग व सर्वसाधारण घटकांतील शेतकरी.
स्वयं सहाय्यता गट, शेतकरी उत्पादक कंपनी, गटशेती करणारे शेतकरी.
विशेषतः, हवामान अनुकूल तंत्रज्ञान अवलंब करणाऱ्यांना प्राधान्य.
अनुदान देण्याची पद्धत:
लाभार्थ्यांना DBT (Direct Benefit Transfer) पद्धतीने आधार लिंक केलेल्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली जाणार.
केंद्र व राज्य शासनाच्या मापदंडांनुसार अनुदान दर लागू राहतील.
प्रकल्प कालावधी:
2025-26 पासून पुढील 6 वर्षे पोकरा (PoCRA Yojana) योजनेचा २ टप्पा राबवला जाणार आहे.
दरवर्षी वित्त विभागाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
प्रकल्पात कोणते घटक असणार?
मृद आरोग्य चाचणी
पाण्याच्या शाश्वत वापरासाठी उपाय
शाश्वत पिक पद्धती
जैविक आणि सेंद्रिय शेती
पाणी साठवण क्षमता वाढविणे
महिला सहभाग वृद्धिंगत करणे
पोकरा योजना (PoCRA Yojana) टप्पा-२ हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नवे बळ देणारे महत्त्वाचे पाऊल आहे. जागतिक बँकेच्या साहाय्याने अंमलात येणारा हा प्रकल्प केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नसून, तो शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ, हवामान बदलाशी जुळवून घेणे, पर्यावरणीय शाश्वतता आणि सामाजिक समावेश अशा अनेक पातळ्यांवर परिणाम घडवणारा आहे.
कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय:
जागतिक बँक सहाय्यित नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, टप्पा-2 च्या अंमलबजीवणीस मान्यता देणे तसेच, जागतिक बँकेसोबत करारनामा करण्यास मान्यता देणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प संपर्क :
अधिक माहीतीसाठी प्रकल्प गावातील संबंधीत कृषि सहाय्यक किंवा समुह सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र कृषि विभागाने केले आहे.
संकेतस्थळ : https://mahapocra.gov.in ईमेल : mahapocra@gmail.com / pmu@mahapocra.gov.in
फोन : 022 – 22163351
या लेखात, आम्ही पोकरा योजनेचा दुसरा टप्पा सुरू (PoCRA Yojana) विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
खालील लेख देखील वाचा !
- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध पोकरा अनुदान योजना – POCRA Yojana
- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत पोकरा अनुदान लाभार्थी यादी !
- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत (POCRA Yojana) योजनांची गावातील सद्यस्थिती पहा आता एका क्लिकवर!
- ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती !
- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना : शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये मदत मिळवण्यासाठी या गोष्टी करा !
- नैसर्गिक संकटात शेतीचं नुकसान झालंय? मग पीक विम्याचा दावा करताना या गोष्टी लक्षात ठेवल्यास नुकसान भरपाई मिळू शकते !
- भारत सरकारचे दामिनी अॅप वीज पडण्यापूर्वी नागरिकांना करणार सावधान ! – Damini Lightning Alert App
- भारत सरकारच्या “राष्ट्रीय कृषी बाजार – eNAM” अॅप व पोर्टल वर अशी करा कृषी उत्पादनांची ऑनलाइन खरेदी – विक्री !
- एमएसएएमबी अॅप वर पहा शेतमालाचे बाजारभाव व कृषि पणनविषयक माहिती !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!