आयुष्यमान वय वंदना कार्ड ऑनलाईन डाऊनलोड कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!
भारत सरकारची आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) आणि महाराष्ट्रातील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) यांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी एक महत्त्वाची योजना म्हणजे आयुष्यमान वय वंदना योजना (Ayushman Vay Vandana Card). ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य उपचाराच्या खर्चामुळे आर्थिक अडचणीत यावे लागू नये म्हणून ही योजना विशेषतः सुरु करण्यात आली आहे.
आयुष्यमान वय वंदना योजना – Ayushman Vay Vandana Yojana:
आयुष्यमान वय वंदना योजना (Ayushman Vay Vandana Card) ही महाराष्ट्रातील 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरोग्य संरक्षण योजना आहे. या योजनेत पात्र नागरिकाला मोठ्या आजारांपासून ते ऑपरेशनपर्यंत सर्व प्रकारच्या उपचारांसाठी दरवर्षी ₹10 लाखांचे कॅशलेस आरोग्य कवच उपलब्ध होते.
यामध्ये दोन प्रमुख योजनांचे कव्हरेज एकत्र मिळते:
PM-JAY (केंद्र शासन) – ₹5 लाख
MJPJAY (राज्य शासन) – ₹5 लाख
म्हणजे एकूण ₹10 लाखांचे आरोग्य संरक्षण ज्येष्ठांना मिळते.
योजनेअंतर्गत मिळणारे प्रमुख लाभ
🔹 1. 1356 प्रकारच्या उपचार व शस्त्रक्रिया
कर्करोग, हृदयविकार, किडनी संबंधित उपचार, ऑर्थोपेडिक ऑपरेशन, न्युरोलॉजी, गॅस्ट्रो, डायलिसिस आणि अनेक क्रिटिकल ट्रीटमेंट्सचा समावेश आहे.
🔹 2. प्रति कुटुंब वार्षिक कव्हर – ₹10 लाख
70 वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला (प्रमाणित लाभार्थी) दरवर्षी हे संरक्षण मिळते.
🔹 3. कॅशलेस उपचार सुविधा
रुग्णालयात दाखल होताच उपचार मोफत मिळतात. बिल सरकार भरते.
🔹 4. खासगी व सरकारी रुग्णालयांचा समावेश
योजनेअंतर्गत मान्यताप्राप्त हजारो हॉस्पिटलमध्ये सेवा मिळू शकते.
कोण पात्र आहे? (Eligibility)
✔ 70 वर्षे व त्याहून अधिक वयाचे नागरिक: ज्येष्ठांची जन्मतारीख आधारवर प्रमाणित असावी.
✔ महाराष्ट्रातील रहिवासी: पत्ता, आधार किंवा इतर ओळखपत्रातून सिद्ध करता येणे आवश्यक.
✔ सरकारने जाहीर केलेल्या पात्र गटातील ज्येष्ठ: जे PM-JAY/MJPJAY योजनेत आधीपासून लाभार्थी आहेत.
आयुष्यमान वय वंदना कार्ड डाऊनलोड ! Ayushman Vay Vandana Card Download:
आयुष्मान वय वंदना कार्ड (Ayushman Vay Vandana Card) ऑनलाईन डाउनलोड करण्यासाठी खालील आयुष्मान भारत राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा (Ayushman App) मोबाईल ॲप डाउनलोड करा.
https://beneficiary.nha.gov.in/
आयुष्मान भारत राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाची अधिकृत वेबसाईट ओपन केल्यानंतर Beneficiary वर क्लिक करून Captcha कोड, मोबाईल नंबर व ओटीपी टाकून लॉगिन करा.

लॉगिन केल्यानंतर पुढे Click Here To Enroll वर क्लिक करा. आता आपला Aadhaar Number, किंवा Family Id टाकून Captcha कोड टाका व सर्च आयकॉन वर क्लिक करा.

आधार प्रमाणीकरण (eKYC) पूर्ण करा
मोबाइल OTP
बायोमेट्रिक
आयरिस
तिन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने करता येते.

पुढे Consent साठी Yes – Allow वर क्लिक करून संमती द्या आणि Member’s Aadhaar OTP टाका.
ई-केवायसी यशस्वी झाले आहे. तुम्ही ७० वर्षे किंवा त्याहून अधिक काळासाठी एबी पीएम-जे योजनेसाठी पात्र आहात. पुढे जाण्यासाठी ओके वर क्लिक करा.

पुढे ई-केवायसी तपशील, अतिरिक्त माहिती / पत्रव्यवहार पत्ता, तुमचे तपशील दिसेल, त्यामध्ये लाभार्थ्यांचा फोटो काढा आणि सबमिट करा.
आवश्यक तपशील सबमिट केल्यनानंतर कार्ड मंजूर होईल, कार्ड मंजूर झाल्यानंतर PDF फाईल मध्ये आयुष्मान वय वंदना कार्ड (Ayushman Vay Vandana Card) डाउनलोड करू शकता.
आयुष्यमान वय वंदना योजना कोणासाठी सर्वात उपयोगी?
हृदय, किडनी, कर्करोग, डायबेटिक कॉम्प्लिकेशन्स असलेल्या ज्येष्ठांसाठी
ऑपरेशन किंवा मोठे उपचार लागण्याची शक्यता असलेल्या नागरिकांना
आर्थिकदृष्ट्या उपचार परवडत नसलेल्या कुटुंबांसाठी
नातेवाईकांवर अवलंबून राहणाऱ्या वृद्ध व्यक्तींसाठी
योजनेसंबंधी काही महत्त्वाच्या अटी
कार्ड वार्षिक नूतनीकरण होत राहते
योग्य तपशील न दिल्यास कार्ड नाकारले जाऊ शकते
प्रवेश घेताना कार्ड व आधार दोन्ही आवश्यक
उपचार फक्त मान्यताप्राप्त हॉस्पिटलमध्येच कॅशलेस मिळतात.
भारतातील अनेक घरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठ्या आजारांचा उपचार हा आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसतो. खासगी रुग्णालयात एक मोठे ऑपरेशनचं खर्च लाखो रुपयांपर्यंत जातो. अशा वेळी आयुष्यमान वय वंदना योजना (Ayushman Vay Vandana Card) हा मोठा आधार ठरतो. यामुळे कुटुंबाचे आर्थिक नुकसान कमी होते, वेळेवर उपचार मिळतात आणि ज्येष्ठ नागरिकांचा आत्मविश्वास वाढतो.
FAQs – वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1. आयुष्यमान वय वंदना योजना कोणासाठी आहे? : 70 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या महाराष्ट्रातील रहिवासी ज्येष्ठांसाठी ही योजना आहे.
2. या योजनेत किती संरक्षण मिळते? : एकूण ₹10 लाखांचे आरोग्य कव्हर (PM-JAY + MJPJAY).
3. कार्ड कसे तयार करायचे? : Ayushman App किंवा beneficiary.nha.gov.in वरून OTP/eKYC करून कार्ड तयार करता येते.
4. कॅशलेस उपचार कुठे मिळतात? : सरकारने मान्यता दिलेल्या खासगी व सरकारी रुग्णालयांमध्ये.
5. प्रत्येक वर्षी नोंदणी करावी लागते का? : होय, डेटा अपडेट होत असल्याने वर्षानुवर्षे नूतनीकरण आवश्यक असू शकते.
आयुष्मान भारत हेल्पलाईन – 14555 / 104 / 1800110770
अधिकृत वेबसाईट : https://pmjay.gov.in/
आयुष्मान भारत मोबाईलॲप (Ayushman App) : मोबाईलॲप डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या लेखात, आम्ही आयुष्यमान वय वंदना कार्ड (Ayushman Vay Vandana Card) ऑनलाईन डाऊनलोड कसे करायचे? सविस्तर प्रोसेस विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
खालील लेख देखील वाचा!
- आयुष्मान कार्ड ऑनलाईन डाऊनलोड कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!
- आयुष्मान कार्ड ऑनलाईन डिजिलॉकर मधून डाऊनलोड कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस!
- मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजना – CM Medical Assistance Fund Scheme.
- मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी मोबाईल ॲप तथा व्हॉट्सॲप हेल्पलाईन !
- महाराष्ट्र “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” योजना – CM Relief Fund Scheme
- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ योजना : रुग्णांना मिळणार विविध आरोग्य सेवा !
- ई-संजीवनी ॲप रुग्णांसाठी संजीवनी!
- वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत मृत्यू झाल्यास व्यक्तीच्या वारसांना आता मिळणार २५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य !
- CGHS लाभार्थी आयडी आयुष्मान भारत हेल्थ आयडीला लिंक करण्याची ऑनलाईन प्रोसेस !
- प्रधानमंत्री जन औषधी केंद्रांवर औषधे माफक दरात उपलब्ध !
- ई-श्रम यूएएन कार्डसाठी अशी करा ऑनलाईन नोंदणी!
- MJPJAY : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
- पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना – Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana (PMJJBY)
- महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आता राज्यातील सर्व कुटुंबांना लागू !
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

