MJPJAY Scheme : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आता राज्यातील सर्व कुटुंबांना लागू !
राज्यातील केवळ गरीब, गरजू नागरिकांसाठी २ जुलै २०१२ पासून लागू करण्यात आलेली महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना (MJPJAY Scheme) आता राज्यातील सर्व कुटुंबांसाठी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी या योजनेचा लाभ अंत्योदय, पिवळे किंवा केशरी कार्डधारकांना मिळत होता.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना – MJPJAY Scheme:
राज्यातील जनतेला गंभीर आजारांवरील उपचारांसाठी पुर्णपणे नि:शुल्क गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधेचा लाभ विशेषज्ञ सेवांतर्गत पॅकेजसाठी अंगीकृत रुग्णालयांमधून उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्धेश आहे.
रुग्णांच्या आरोग्य विमा सरंक्षणाची रक्कम प्रतिकुटुंब एक लाख ५० हजार रुपयांवरून ५ लाख रुपये करण्यात आली आहे. राज्यातील एक हजार ९०० रुग्णालयांमार्फत एक हजार ३५६ प्रकारचे छोटे मोठे उपचार या विमा संरक्षणा अंर्तगत केले जाऊ शकणार आहेत.
राज्यातील महिलांच्या स्तन कर्करोग आजारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. महिलांना या आजाराची तपासणी सहज व स्वस्त व्हावी यासाठी सर्व आरोग्य उपकेंद्रात महिलांसांठी स्तन व गर्भाशयमुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्य उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यासाठी अर्थसंकल्पात ७८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
गर्भवती महिला व बालकांसाठी आरोग्य संस्थेत मोफत ने-आण करण्यासाठी राज्यात ३ हजार ३२४ रुग्णवाहिका आहेत. यातील जुन्या झालेल्या रुग्णवाहिकांच्या जागी नवीन रुग्णवाहिका लवकरच विकत घेतल्या जाणार आहेत.
मदतीसाठी संपर्क :
• टोल फ्री क्रमांक – १५५३८८ / १८००२३३२२००
• रुग्णालय – आरोग्य मित्र
• पत्ता – पो. बॉक्स क्रमांक १६५६५, वरळी पोस्ट ऑफीस, वरळी, मुंबई ४०००१८
• संकेतस्थळ – www.jeevandayee.gov.in
हेही वाचा – महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!