वृत्त विशेषजिल्हा परिषदमहसूल व वन विभागमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीमहाराष्ट्र शासन निर्णय - GRसरकारी योजना

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत मृत्यू झाल्यास व्यक्तीच्या वारसांना आता मिळणार २५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य !

वाघ, बिबटया, अस्वल, गवा (बायसन ), रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती, रानकुत्रे (ढोल), रोही (निलगाय) व माकड / वानर यांच्या हल्ल्यात मनुष्य हानी झाल्यास मृत्यू, कायम अपंगत्व, गंभीर जखमी, किरकोळ जखमी या वर्गवारीनुसार अर्थसहाय्य संबंधितांना अदा करण्यात येते. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अनेक वेळा मनुष्य मृत्यू होत नाही, परंतु गंभीर किंवा किरकोळ जखमी होतात. जखमी व्यक्तिला योग्य व तातडीचे उपचार मिळावेत व ते प्राथमिकतेने शासकीय रुग्णालयात मिळावेत याबाबत प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतात व मानवी जीव वाचविण्यात येतो. काही वेळा उपयुक्त संसाधन युक्त शासकीय रुग्णालय जवळ उपलब्ध नसते व अशा प्रसंगी जखमी व्यक्तिला खाजगी रुग्णालयात जाऊन तातडीचा उपचार करावा लागतो.

सध्याच्या आर्थिक तरतूदित मृत्यू, कायमस्वरुपी अपंगत्व, गंभीर जखमी व किरकोळ जखमी व्यक्तिला द्यावयाची आर्थिक मदत त्या मानाने कमी असल्याबाबत व त्यामध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. जनप्रतिनिधींकडून आर्थिक सहाय्यामध्ये वाढ करण्याबाबत होणाऱ्या मागणीस अनुसरुन वन्यप्राणी हल्ल्यामुळे मनुष्य मृत्यू, कायमस्वरुपी अपंगत्व, गंभीर जखमी व किरकोळ जखमी प्रकरणी देण्यात येणा-या अर्थसहाय्य रक्कम / खर्च वाढ करण्याबाबत शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे.

वाघ, बिबटया, अस्वल, गवा (बायसन), रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती, रानकुत्रे (ढोल), रोही (निलगाय) व माकड / वानर यांच्या हल्ल्यामुळे मृत्यू / कायमस्वरुपी अपंगत्व / मनुष्य गंभीर जखमी / किरकोळ जखमी झाल्यास खालीलप्रमाणे अर्थसहाय्य / खर्च प्रतिपूर्ती देण्यात यावी.

अ. क्र.तपशिलदेय असलेल्या अर्थसहाय्याची रक्कम
1व्यक्ती मृत झाल्यासरुपये २५,००,०००/- (रु. पंचवीस लक्ष फक्त)
2व्यक्ती कायम अपंग झाल्यासरुपये ७,५०,०००/- (रु. सात लक्ष पन्नास हजार फक्त)
3व्यक्ती गंभीररित्या जखमी झाल्यासरुपये ५,००,०००/- (रु. पाच लक्ष फक्त)
4व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यासऔषधोपचारासाठी येणारा खर्च देण्यात यावा. मात्र खाजगी रुग्णालयात औषधोपचार करणे आगत्याचे असल्यास त्याची मर्यादा रुपये ५०,०००/- (रु. पन्नास हजार फक्त) प्रति व्यक्ती अशी राहील. शक्यतो औषधोपचार शासकीय/जिल्हा परिषद रुग्णालयात करावा.

वरीलप्रमाणे देण्यात येणारे अर्थसहाय्य हे शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. डब्ल्युएलपी- १००२/प्रक्र. २५८/फ-१, दिनांक २०/०५/२००३, शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. डब्ल्यूएलपी- १००८/प्र.क्र.२७०/ फ-१, दिनांक ०२/०७/२०१०, शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. डब्ल्यूएलपी- २०१२/ प्र.क्र.३३७ / फ-१, दिनांक ३०/०३/२०१३, शासन निर्णय, शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. डब्ल्यूएलपी- २०१२/ प्र.क्र.३३७/ फ-१, दिनांक १६/०१/२०१५ शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. डब्ल्यूएलपी- ०७१८/ प्र.क्र.२६७ / फ-१, दिनांक ११/०७/२०१८, शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. डब्ल्यूएलपी- ०७१८/ प्र.क्र.२६७/ फ-१, दिनांक २८/११/२०१८, शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र.डब्ल्यूएलपी- ०७१८/ प्र.क्र.२६७/ फ-१, दिनांक २६/०८/२०१९, शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र.डब्ल्यूएलपी- ०७१८/ प्र.क्र.२६७/ फ-१, दिनांक २३/०८/२०२२ ई. शासन निर्णयातील अटी व शर्तींच्या पूर्ततेच्या अधिन राहील.

>

वन्यप्राणी हल्ल्यामुळे मृत व्यक्तीच्या वारसांना देण्यात येणा-या रक्कमेपैकी रु. १०.०० लक्ष (रु. दहा लक्ष फक्त) देय असलेल्या व्यक्तीला तात्काळ धनादेशाद्वारे व उर्वरित रक्कम रु. १०.०० लक्ष रुपये दहा लक्ष फक्त) ५ वर्षांकरिता फिक्स डिपॉझीटमध्ये ठेवावे आणि उर्वरित ५.०० लक्ष (रुपये पाच लक्ष फक्त) १० वर्षांकरिता फिक्स डिपॉझीटमध्ये ठेवावे. दहा वर्षांनंतर वारसांना पूर्ण रक्कम मिळेल.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत मृत्यू झाल्यास व्यक्तीच्या वारसांना अर्थसहाय्य/नुकसान भरपाईसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस :

वन्यप्राण्यांचे हल्ल्यामुळे मनुष्यहानी झाल्यास अर्थसहाय्य/नुकसान भरपाईसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास प्रथम तुम्हाला खालील वनविभागाच्या महाराष्ट्र फॉरेस्ट पोर्टलवर जायचे आहे.

https://intranet.mahaforest.gov.in/forestportal

महाराष्ट्र फॉरेस्ट पोर्टल मध्ये विविध RTS अर्ज फॉर्म आणि सेवा दिसतील त्यामधून तुम्हाला “वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे झालेल्या पशु नुकसानीची नुकसान भरपाई मंजुर करणे” किंवा “वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे व्यक्ती जखमी किंवा मृत झाल्यास आर्थिक सहाय्य मंजुर करणे” या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.

RTS अर्ज
RTS अर्ज

वरील RTS अर्जामध्ये अर्जदार आणि नुकसान भरपाईची माहिती, तसेच आवश्यक तपशील/कागदपत्रे जोडून अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट काडून ठेवा. अर्ज भरल्यानंतर मोबाईल वर मेसेज येईल व वनविभागाचे अधिकारी नुकसान पहाणी दौरा करतील. त्यानंतर तुमच्या अर्जाला मंजुरी मिळून नुकसान भरपाई मिळेल.

अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील उपवनसंरक्षक/उप विभागीय अधिकारी/वन क्षेत्रपाल यांचे कार्यालय या ठिकाणी संपर्क साधावा.

हेही वाचा – महाराष्ट्र “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” योजना – CM Relief Fund Scheme

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.