दहावी-बारावी २०२४ च्या थेट खाजगी परिक्षेसाठी १७ नंबर फॉर्मची ऑनलाईन नोंदणी सुरु (10th-12th Online Registration of Form No. 17)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ.१२ वी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं. १७ भरून परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेसाठी (इ. १०वी) खाजगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सध्या संपर्क केंद्रामार्फत नावनोंदणी प्रक्रिया राबविण्यात येते. यामध्ये संपर्क केंद्रामार्फत सर्व कार्यवाही राबविण्यात येत होती. मात्र प्रचलित पध्दतीमधील अडचणींचा, त्रुटींचा विचार करुन सदरची योजना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभदायी, सुलभ व विद्यार्थी केंद्रीत व्हावी या दृष्टीने सध्याची संपर्क केंद्र शाळेमार्फत नाव नोंदणी अर्ज स्विकारण्याची प्रचलित पध्दत बंद करून इ. १२वी च्या विद्यार्थ्यांचे ज्या पध्दतीने सर्व कनिष्ठ महाविद्यालयातून नाव नोंदणी अर्ज स्विकारण्यात येतात त्याप्रमाणेच माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ. १०वी) च्या खाजगी विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी अर्ज सर्व मान्यता प्राप्त माध्यमिक शाळांमधून स्विकारण्याची कार्यपध्दती मार्च २०२४ च्या परीक्षेपासून सुरु करण्यात येत आहे.
तरी सर्व माध्यमिक शाळांनी याची नोंद घेऊन शिक्षण प्रवाहाच्या बाहेर राहिलेल्या परंतु किमान इ. ५ वी उत्तीर्ण असलेल्या मुला-मुलींना माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेस बसून शिक्षणाच्या प्रवाहात येण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. यासंदर्भातील सर्व माहिती व मार्गदर्शक पुस्तिका मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. तसेच अधिक माहितीसाठी सर्व माध्यमिक शाळांनी आपल्या कार्यकक्षेतील विभागीय मंडळाशी संपर्क साधावा.
त्यानुसार फेब्रुवारी – मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. १२ वी ) परीक्षा व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी ) परीक्षेस खाजगीरित्या (फॉर्म नं. १७) प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी अर्ज (फॉर्म नं. १७) ऑनलाईन प्रक्रियेव्दारे भरुन घेण्यात येणार असून त्यासाठी खाली नमूद केलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करावयाची आहे.
फॉर्म नं. १७ नावनोंदणी अर्ज ऑनलाईन स्विकारण्याच्या तारखा:
इ. १० वी व इ. १२ वी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन स्विकारण्याच्या तारखा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या आहेत.
अ. क्र. | तपशील | इ.१२ वी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन स्विकारण्यासाठी तारखा | इ.१० वी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन स्विकारण्यासाठी तारखा |
1 | विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाईन भरणे. | गुरुवार दि. १० ऑगस्ट २०२३ ते सोमवार दि. ११ सप्टेंबर २०२३ | सोमवार दि. १४ ऑगस्ट २०२३ ते सोमवार दि. ११ सप्टेंबर २०२३ |
2 | विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या माध्यमिक शाळेत / कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जमा करणे. | शनिवार दि. १२ ऑगस्ट २०२३ ते बुधवार दि. १३ सप्टेंबर २०२३ | गुरुवार दि.१७ ऑगस्ट २०२३ ते बुधवार दि. १३ सप्टेंबर २०२३ |
3 | माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीची एक छायाप्रत मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करणे. | शुक्रवार दि. १५ सप्टेंबर २०२३ | शुक्रवार दि.१५ सप्टेंबर २०२३ |
खाजगी विद्यार्थ्यांनी इ.१० वी व १२ वी साठी नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्विकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
१७ नंबर फॉर्मची ऑनलाईन नोंदणी:
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील वेबसाईटचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी/ इंग्रजीमधून उपलब्ध आहेत त्या वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
संकेतस्थळ –
- इ.१० वी – http://form17.mh-ssc.ac.in
- इ.१२ वी – http://form17.mh-hsc.ac.in
विद्यार्थ्याने अर्ज भरण्याकरिता १) शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत), नसल्यास व्दितीय प्रत व प्रतिज्ञापत्र २) आधारकार्ड ३) स्वत: चा पासपोर्ट आकारातील फोटो स्वत: जवळ ठेवावा. ऑनलाईन अर्ज भरताना सदर कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावयाची आहेत.
कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर/मोबाईलब्दारे कागदपत्रांचे फोटो काढून ते अपलोड करावेत. विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई – मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य (compulsory) आहे.
संपूर्ण अर्ज भरुन झाल्यावर भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्याला त्याने अर्जात नमूद केलेल्या ई – मेलवर पाठविली जाणार आहे. तसेच या संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट, शुल्क पावती व हमीपत्र यासह दोन प्रतीत काढून घ्यावी.
विद्यार्थ्यांनी अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोच पावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे नाव नोंदणी अर्जावर नमूद केलेल्या संपर्क शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विहीत मुदतीत जमा करावयाची आहे.
खाजगी विद्यार्थ्यासाठी नाव नोंदणी शुल्काचा तपशील खालीलप्रमाणे :
- इ. १० वी – रू. १०००/- नोंदणी शुल्क + रू. १००/- प्रक्रिया शुल्क (Processing fee)
- इ. १२ वी – रू. ६००/- नोंदणी शुल्क + रू. १००/- प्रक्रिया शुल्क (Processing fee)
अ) माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची नाव नोंदणी ऑनलाईन होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यास त्याच्या पत्यानुसार व त्याने निवडलेल्या माध्यमनिहाय संपर्क केंद्राची यादी दिसेल त्यापैकी एका संपर्क केंद्राची निवड विद्यार्थ्याने करावयाची आहे. या संपर्क केंद्राने प्रकल्प, प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी विषय संदर्भातील कामकाज व अनुषंगिक मूल्यमापन करावयाचे आहे.
ब) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यानी नाव नोंदणी ऑनलाईन करावयाची आहे. नाव नोंदणी करताना विद्यार्थ्यांचा पत्ता, त्याने निवडलेली शाखा व माध्यमनिहाय त्यास कनिष्ठ महाविद्यालयाची यादी दिसेल त्यामधील एका कनिष्ठ महाविद्यालयाची निवड विद्यार्थ्याने करावयाची आहे. त्या कनिष्ठ महाविद्यालयाव्दारे परीक्षा अर्ज, प्रकल्प, प्रात्यक्षिक/तोंडी, श्रेणी परीक्षा दयावयाची आहे. याबाबत सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना विभागीय मंडळांनी मार्गदर्शन करावे.
इ. १० वी व इ. १२ वी फेब्रुवारी – मार्च सन २०२३ खाजगी विद्यार्थी फॉर्म नं. १७ ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क ऑनलाईन पध्दतीने (Debit Card/Credit Card/UPI/ Net Banking) व्दारे भरणे अनिवार्य राहिल. ऑनलाइन पध्दतीने शुल्क जमा केल्यानंतर विद्यार्थ्याला पोचपावती प्राप्त होईल. सदर पोचपावती स्वत: जवळ ठेवून त्याच्या दोन छायाप्रती संपर्क केंद्राला देण्यात याव्यात, तसेच एकदा नाव नोंदणी अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव नाव नोंदणी शुल्क विद्यार्थ्याला परत केले जाणार नाही. तसेच नाव नोंदणी अर्जात दुरुस्ती करावयाची (उदा. माध्यम, शाखा, संपर्क केन्द्र अथवा अन्य कारणास्तव) असल्यास विद्यार्थ्यास पुनःश्च नाव नोंदणी शुल्क जमा करावे लागेल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगीरित्या प्रविष्ट व्हावयाचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या/प्राधिकृत केलेल्या हॉस्पिटलच्या प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित करुन अर्जासोबत सादर करावी व आवश्यकतेनुसार विभागीय मंडळ/कनिष्ठ महाविद्यालय/ संपर्क केन्द्र यांचेकडून माहिती प्राप्त करुन घ्यावी.
ऑनलाईन अर्ज भरताना कोणतीही अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क.०२० २५७०५२०७/२५७०५२०८/२५७०५२७१ वर संपर्क साधावा.
विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी तसेच विद्यार्थ्यांना अर्जासोबत छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे संपर्क केंद्र/कनिष्ठ महाविद्यालयाकडून निर्धारित कालावधीनंतर परत घेवून जाण्याची दक्षता घ्यावी.
पात्र विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे (examination form) मंडळाने विहित केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी.
विभागीय मंडळ | संपर्क क्रमांक |
---|---|
पुणे विभागीय मंडळ | ०२०…. २५५३६७८१,०२०….. २५५३६७८२,०२०….. २५५३६७८३ |
नागपूर विभागीय मंडळ | ०७१२ ….२५५३४०१, ०७१२ ….२५५३४०३ |
औरंगाबाद विभागीय मंडळ | ०२४० ….२३३४२२८, ०२४० ….२३३२८८४ |
मुंबई विभागीय मंडळ | ०२२….२७८८१०७५, ०२२ ….२७८८१०७७ |
कोल्हापूर विभागीय मंडळ | ०२३१…२६९६१०१, ०२३१…२६९६१०२, ०२३१…२६९६१०३ |
अमरावती विभागीय मंडळ | ०७२१…२६६२६४७ , ०७२१…२६६२६७८ |
नाशिक विभागीय मंडळ | ०२५३…२५९२१४१, ०२५३…२५९२१४२ |
लातूर विभागीय मंडळ | ०२३८२…२५८२४१ |
कोकण विभागीय मंडळ. | ०२३५२…२२८४८० |
अर्ज करताना तांत्रिक अडचण असल्यास (For Technical Queries Only ) | ०२०…..२५७०५२०७ |
हेही वाचा – PM यशस्वी योजना; प्रतिवर्ष 1.25 लाखांपर्यंत स्कॉलरशिप – PM YASASVI Scholarship
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!