आरोग्यवृत्त विशेषसरकारी योजना

ई-संजीवनी ॲप रुग्णांसाठी संजीवनी – E Sanjeevani App

राज्यात गेल्यावर्षी शासनाने सुरू केलेली ई-संजीवनी ऑनलाइन ओपीडी म्हणजेच बाह्यरुग्ण सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले आहे. येथील शासकीय सामान्य रुग्णालयात दरमहा शंभराहून अधिक रुग्ण घरबसल्या वैद्यकीय उपचार व सल्ला घेत आहेत. गेल्या वर्षभरात येथील दीड हजार रुग्ण ई- संजीवनी अॅपद्वारे डॉक्टरांच्या सल्ल्याने बरे झाले असून, यामुळे रुग्णांच्या वेळेसह पैशांची बचत होत असल्याने खऱ्या अर्थाने रुग्णांसाठी हे अॅप संजीवनी ठरत आहे.

ई-संजीवनी ॲप रुग्णांसाठी संजीवनी – E Sanjeevani App:

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउनच्या काळात रुग्णांना घरबसल्या वैद्यकीय उपचार, सल्ला मिळावा, यासाठी १३ एप्रिल, २०२० रोजी ऑनलाइन ई-संजीवनी सेवा सुरू करण्यात आली, त्यानंतर मोबाइल अॅपही विकसित करण्यात आल्याने त्याच्या वापरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ई-संजीवनी सेवा मोफत असून त्या माध्यमातुन भारतातील नामांकित जनरल फिजिशियन तसेच तज्ज्ञ डॉक्टरांची ओपीडी सेवा सुरू करण्यात आली आहे.

सर्व जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयातील सर्व वैद्यकीयअधिकाऱ्यांची नोंदणी या अॅपवर करण्यात आली आहे. सकाळी ९ ते दुपारी १ आणि दुपारी १ वाजून ४५ मिनिटांपासून ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वैद्यकीय अधिकारी या सेवेमार्फत रुग्णांना सल्ला देतात. ई- संजीवनी अॅपमुळे रुग्णांना घरबसल्या डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला मिळत असून, यामध्ये सर्वाधिक फायदा वृद्धांना होत आहे. दिवसेंदिवस या अॅपला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले. भविष्यात या अॅपचा वापर करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढणार आहे.

दीड हजाराहून अधिक रुग्णांनी घेतला लाभ

  • राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून रुग्णांसाठी सुरू केलेल्या ई-संजीवनी अॅपमुळे घरबसल्या डॉक्टर हे रुग्णांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंग किवा चॅटचा वापर करून आजाराबाबत सल्ला घेतात.
  • ई-संजीवनी ओपीडी सेवेमार्फत रुग्णांना सल्ला दिल्यानंतर एसएमएसद्वारे ई-प्रीस्क्रिप्शन रुग्णांना प्राप्त होते. त्याद्वारे रुग्ण जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन औषधे घेऊ शकतात.
  • आतापर्यंत मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात १५०० रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्याने बरे झाले आहेत. तसेच यासंदर्भात आशा वर्कर, नर्सिंग स्टॉफ तसेच डॉक्टरांना अॅपबद्दल माहिती टेलिमेडिसिन विभागाकडून दिली जाते.

राज्य नवव्या स्थानावर

राज्य शासनाने कोरोना काळात सुरू केलेला ई-संजीनी अॅपची आशावर्कर हे ग्रामीण भागात जाऊन घरोघरी पोहोचत असल्यामुळे ई-संजीवनी अॅपचा वापर वाढला असून, यामुळे रुग्ण मोबाइल अॅपच्या माध्यमातून डॉक्टरांचा सल्ला व उपचार घेत आहेत.

आतापर्यंत राज्यात ५ हजार ४०० रुग्ण हे बरे झाले असून, महाराष्ट्र राज्य पहिल्या दहा राज्यांच्या यादीत असून, नवव्या स्थानावर महाराष्ट्र राज्य आले आहे.

ई संजीवनी मोबाईलॲप (eSanjeevani – MoHFW App) : ई संजीवनी मोबाईलॲप डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

हेल्पलाइन क्रमांक: +91-11-23978046
टोल फ्री : 1075
हेल्पलाइन ईमेल आयडी : [email protected]

हेही वाचा – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी मोबाईल ॲप तथा व्हॉट्सॲप हेल्पलाईन ! Chief Minister’s Medical Assistance Fund – CMMRF Mobile App and WhatsApp Helpline !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.