स्पर्धा परीक्षामहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेष

पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्तीसाठी पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा- २०२१ सूचना

महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई यांच्याकरीता पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्तीसाठी पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा- २०२१ सूचना.

पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्तीसाठी पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा- २०२१ सूचना:

 महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील एकूण २५० पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार दिनांक ३० जुलै, २०२२ रोजी पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा- २०२१ मुंबईसह महाराष्ट्रातील ६ जिल्हाकेंद्रांवर घेण्यात येईल:

संवर्ग/पदाबाबत सर्वसाधारण तपशील :

>
  • संवर्ग : – पोलीस उपनिरीक्षक, अराजपत्रित, गट – ब
  • वेतनश्रेणी : – रुपये S – १४: ३८६००-१२२८०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
  • पदसंख्या: २५०
  • मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी याचिका क्रमांक २७९७/२०१५ प्रकरणी दिनांक ०४ ऑगस्ट २०१७ रोजी दिलेल्या निकालाच्याआधारे सदर पदे प्रवर्गनिहाय आरक्षणानुसार न भरता गुणवत्तेनुसार भरण्यात येतील .

पात्रता:

1) अर्हता

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई या संवर्गातील कर्मचारीच प्रस्तुत परीक्षेस पात्र असतील.

शैक्षणिक अर्हतेसह सेवा :

(एक) सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई या पदावर नियमित नियुक्तीच्या दिनांकापासून दिनांक १ जानेवारी, २०२२ रोजी खालीलप्रमाणे किमान नियमित सेवा पूर्ण होणे आवश्यक आहे:

(१) मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेचा पदवीधर असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत ४ वर्षे नियमित सेवा.

(२) महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची एच.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र शासनाने एच. एस. सी. च्या समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता, अशा उमेदवारांच्या बाबतीत ५ वर्षे नियमित सेवा. –

(३) महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची एस. एस. सी. परीक्षा उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र शासनाने एस.एस.सी. च्या समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता, अशा उमेदवारांच्या बाबतीत ६ वर्षे नियमित सेवा.

(दोन) नियमित सेवेचा कालावधी खालीलप्रमाणे गणण्यांत येईल :

(१) नामनिर्देशनाने नेमणूक झालेल्या कर्मचा-यांच्या नियमित नियुक्तीच्या दिनांकापासून

(२) अनुकंपा तत्वावर नेमणूक झालेल्या कर्मचा-यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून

(३) अन्य कारणास्तव सेवा नियमित झालेल्या कर्मचा-यांच्या बाबतीत त्यांच्या सेवा नियमित केल्या संबंधीच्या शासन आदेशाच्या दिनांकापासून.

(४) पदोन्नत कर्मचा-याच्या नियमित पदोन्नतीच्या दिनांकापासून

2) वयोमर्यादाः

(१) अमागास उमेदवार कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे

(२) मागासवर्गीय उमेदवार कमाल वयोमर्यादा ४० वर्षे

(३) दिनांक ०१ जानेवारी २०२२ रोजी वयाची गणना केली जाईल.

(४) पोलीस उप निरीक्षक, (सेवाप्रवेश) (तिसरी सुधारणा) नियम, २००८ नुसार एखाद्या वर्षी परीक्षा न झाल्यामुळे कमाल वयोमर्यादा पूर्ण होण्यापूर्वी परीक्षेच्या सलग तीन संधी मिळाल्या नसतील अशा उमेदवारांना कमाल वयोमर्यादेनंतर सलग होणा-या परीक्षेस बसण्याच्या उर्वरित संधी देण्यात येतील. तथापि, कोणत्याही परिस्थितीत या सलग संधी तीन पेक्षा जास्त असणार नाहीत.

(५) कमाल वयोमर्यादा पूर्ण होण्यापूर्वी परीक्षेच्या सलग तीन संधी मिळूनही उमेदवाराने एखाद्या परीक्षेसाठी अर्ज केलेला नसेल तर संबंधित उमेदवाराने सदर परीक्षेची संधी घेतली असे मानण्यात येईल.

(६) सेवाप्रवेश नियमातील कमाल वयोमर्यादा पूर्ण होण्यापूर्वी अर्ज करणा-या उमेदवारांना परीक्षेच्या कमाल संधी बाबत कोणतीही मर्यादा लागू नाही.

(७) विहित वयोमर्यादा इतर कोणत्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाही.

शासन निर्णय, गृह विभाग क्रमांक पोलीस १८२१/प्र.क्र.५२/पोल -५ अ, दिनांक ०४ ऑगस्ट, २०२१ अनुसार दिव्यांग उमेदवार सदर पदाकरीता पात्र नाहीत.

निवडप्रकिया :

१. जाहिरातीमध्ये नमूद अर्हता/पात्रतेविषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखत/शिफारशीसाठी पात्र असणार नाही.

२. सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया पोलीस उप निरीक्षक, गट – ब (अराजपत्रित) सेवाप्रवेश नियम १९९५ अथवा तदनंतर शासनाकडून वेळोवेळी करण्यात येणा-या सुधारणा तसेच आयोगाकडून वेळोवेळी सुधारण्यात येणाऱ्या कार्यनियमावलीतील तरतुदींनुसार राबविण्यात येईल.

परीक्षेचे टप्पे : प्रस्तुत परीक्षा खालील टप्प्यांमध्ये घेण्यात येईल :

(१) मुख्य परीक्षा- ३०० गुण

(२) शारीरिक चाचणी १०० गुण

मुख्य परीक्षा :

(१) प्रश्नपत्रिका : – एक प्रश्नपत्रिकेचा तपशील पुढीलप्रमाणे :

संकेतांक क्रमांकविषयमाध्यमप्रश्नसंख्या व गुणकालावधीप्रश्नपत्रिकेचे स्वरुप
२०१विधी (प्रमुख कायदे व इतर कायदे)इंग्रजी व मराठी१५०/३००दीड तासवस्तुनिष्ठ बहुपर्यायी

(दोन) अभ्यासक्रम :

(१) परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावरील “उमेदवारांना सूचना अंतर्गत” अभ्यासक्रम” या सदराखाली उपलब्ध आहे.

(२) मुख्य परीक्षेची परीक्षा योजना व अभ्यासक्रम सोबतच्या विवरणपत्र १ प्रमाणे राहील.

मुख्य परीक्षेस प्रवेश :

(एक) पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे पात्र उमेदवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल.

(दोन) मुख्य परीक्षेकरीता शासनाकडून परिपत्रक प्रसिध्द झाल्यानंतर आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळाद्वारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांना त्यांच्या प्रोफाईलद्वारे अर्ज करता येईल. त्यावेळी मुख्य लेखी परीक्षेच्या प्रवेशासाठी आयोगाने विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार परीक्षा केंद्र निवडून परीक्षा शुल्क विहित मुदतीत सादर करणे आवश्यक राहील. त्याशिवाय उमेदवारास मुख्य लेखी परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही.

(तीन) पूर्व परीक्षेकरीता अर्ज सादर करताना आयोगाकडे सादर केलेल्या कोणत्याही दाव्यामध्ये नंतर कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही.

परीक्षेकरीता अर्ज करण्याची पध्दत :

१ अर्ज सादर करण्याचे टप्पे :

(एक) आवश्यक असल्यास शैक्षणिक अर्हतेबाबत खाते अद्ययावत करणे. पूर्व परीक्षेच्या अर्जामध्ये नमूद शैक्षणिक अर्हतेव्यतिरिक्त इतर कोणत्याही माहिती/दाव्यामध्ये बदल करता येणार नाही.

(दोन) विहित कालावधीत तसेच विहित पध्दतीने खालीलप्रमाणे लागू असेल त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन अर्ज सादर करणे.

(तीन) परीक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे,

(चार) जिल्हा केंद्र निवड करणे.

२ विहित कागदपत्रे/प्रमाणपत्रे अपलोड करणे :

(एक) प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने उमेदवारांची पात्रता आजमावल्यानंतर (Check eligibility) उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे/प्रमाणपत्रे (लागू असलेली) अपलोड करणे अनिवार्य आहे:

अ. क्र.प्रमाणपत्र/कागदपत्रफाईल फॉर्मेटकिमान फाईल साईज (KB)कमाल फाईल साईज (KB)
एस.एस.सी. अथवा तत्सम शैक्षणिक अर्हताPDF५०५००
2वयाचा पुरावाPDF५०५००
3शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावाPDF५०५००
4सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावाPDF५०५००
5आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावाPDF५०५००
6वैध नॉन – क्रिमीलेयर प्रमाणपत्रPDF५०५००
7पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावाPDF५०५००
8अनुभवाचा पुरावाPDF५०५००
9खेळाडूसाठीच्या आरक्षणाकरीता पात्र असल्याचा पुरावाPDF५०५००
10अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावाPDF५०५००
11अराखीव माहिला, खेळाडू, माजी सैनिक, अनाथ आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्रPDF५०५००
12विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावाPDF५०५००
13मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावाPDF५०५००
14लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापनPDF५०५००

(दोन) उपरोक्त प्रमाणपत्र/कागदपत्रे आयोगाच्या संकेतस्थळावरील “उमेदवारांना सर्वसाधारण सूचना प्रकरण क्रमांक चार तसेच प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे असणे अनिवार्य आहे.

(तीन) उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना शैक्षणिक अर्हतेसह अनुभवासंदर्भात सोबतच्या विवरणपत्र – २ मधील विहित नमुन्यात सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत अपलोड करणे अनिवार्य आहे.

(चार) पात्रतेसंदर्भातील विविध दाव्यांच्या अनुषंगाने प्रमाणपत्रे/कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.

(पाच) शारीरिक चाचणी/प्रमाणपत्र तपासणीकरीता आमंत्रित केल्यानंतर पात्रतेसंदर्भातील सर्व आवश्यक मूळ प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

(सहा) पात्रतेसंदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे तपासणीच्या वेळी सादर न केल्यास शारिरीक चाचणी अथवा शिफारशीसाठी विचार करण्यात येणार नाही.

३ सर्वसाधारण :

(एक) अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील.

(दोन) अर्ज सादर करण्याकरीता संकेतस्थळ : – https://mpsconline.gov.in

(तीन) अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in तसेच https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

(चार) आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

अर्ज सादर करण्याचा कालावधी :

दिनांक १५ जून, २०२२ रोजी १४.०० वाजल्यापासून दिनांक २९ जून, २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत.

जिल्हा केंद्र निवड :

मुख्य परीक्षा खालील सहा जिल्हाकेंद्रांवर घेण्यात येईल :

केंद्रकेंद्राचा सांकेतांककेंद्रकेंद्राचा सांकेतांक
अमरावती१४नागपूर३२
औरंगाबाद१५नाशिक३५
मुंबई३०पुणे३८

अर्ज सादर करतानाच जिल्हा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे. जिल्हा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही.

शुल्क (रुपये) :

(एक) अमागास- रु .८४४/-

(दोन) मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ- रु.५४४/-

(तीन) उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.

(चार) परीक्षा शुल्क ना परतावा (Non – refundable) आहे.

परीक्षा शुल्काचा भरणा करण्याकरीता खाली नमूद केलेल्या पद्धतींचा अवलंब करावा. अर्ज सादरीकरणाचे टप्पे पूर्ण झाल्यावर उपलब्ध होणाऱ्या “Submit and Pay fees” या बटनावर क्लिक केल्यानंतर किंवा मुख्य पृष्ठावरील माझे खाते या सदराखालील अर्ज केलेल्या यादीतील “Fees not “Paid” अशी सद्यस्थिती लिहिलेल्या जाहिरात/पद/परीक्षेसमोरील Pay Now’ या लिंकवर क्लिक करुन परीक्षा शुल्काचा भरणा करता येईल.

परीक्षा शुल्काचा भरणा खालील दोन पध्दतीने करता येईल :

(एक) ऑनलाईन पध्दतीने.

(१) भारतीय स्टेट बँक तसेच क्विकवॉलेट यापैकी कोणत्याही एका पेमेंट गेटवेच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड अथवा नेटबँकिंगद्वारे परीक्षा शुल्क अदा करता येईल.

(२) परीक्षा शुल्काचा भरणा करताना बँक खात्यामधून परीक्षा शुल्काच्या रकमेची वजावट झाल्यावर परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वीपणे झाला (Payment Successful) असल्याचा संदेश आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या पृष्ठावर प्रदर्शित झाल्याशिवाय व परीक्षा शुल्काची पावती तयार झाल्याशिवाय संकेतस्थळावरील संबंधित पृष्ठावरून आणि/अथवा खात्यातून लॉगआऊट होऊ नये.

(३) परीक्षा शुल्काचा भरणा केल्यानंतर उमेदवाराला त्याच्या प्रोफाईलमध्ये परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वी झाला आहे किंवा कसे, याची स्थिती (status) लगेचच अवगत होईल. खात्यातून Logout होण्यापूर्वी परीक्षा शुल्क यशस्वीपणे भरले असल्याबाबत व बँकेकडून व्यवहार (Transaction) पूर्ण झाला असल्याबाबत खात्री करण्याची जबाबदारी उमेदवाराची आहे.

(४) कोणत्याही कारणामुळे विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वीपणे करणे शक्य न झाल्यास अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकानंतर दोन दिवसापर्यंत परीक्षाशुल्काचा भरणा ऑफलाईन पद्धतीने करण्याकरीता चलनाची प्रत घेता येईल.

(दोन) ऑफलाईन पध्दतीने चलनाद्वारे.

(१) चलनाद्वारे परीक्षा शुल्काचा भरणा करण्याचा विकल्प निवडल्यास उपलब्ध होणारी चलनाची प्रत घेऊन भारतीय स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत बँकेच्या कार्यालयीन वेळेत विहित अंतिम दिनांकापूर्वी परीक्षा शुल्काचा भरणा करता येईल. तथापि, चलनाची प्रत घेणे व बँकेत शुल्क जमा करणे, यामध्ये किमान तीन तासांचे कालावधी राहील, याची दक्षता घ्यावी.

(२) परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वी न झाल्यास पुन्हा शुल्क भरण्याची अथवा चलन घेण्याबाबतची कार्यवाही प्रस्तुत जाहिरातीच्या/ अधिसूचनेच्या अनुषंगाने विहित दिनांकापूर्वीच करणे आवश्यक आहे. कोणत्याही कारणास्तव व्यवहार अयशस्वी ठरल्यास यासंदर्भातील तक्रारीची आयोगाकडून दखल घेतली जाणार नाही.

(३) विहित मुदतीत परीक्षा शुल्काचा भरणा करु न शकलेल्या उमेदवारांचा संबंधित भरतीप्रक्रियेकरीता विचार केला जाणार नाही. यासंदर्भात आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचनांमधील संबंधित तरतुदींचे अवलोकन करणे उमेदवारांच्या हिताचे राहील.

(४) परीक्षा शुल्काचा भरणा करण्यासंदर्भातील कार्यवाही खालील विहित दिनांकापूर्वी पूर्ण करावी:

(एक) ऑनलाईन पध्दतीने परीक्षा शुल्क भरण्याकरीता विहित अंतिम दिनांक २९ जून, २०२२ रोजी २३:५९ वाजेपर्यंत.

(दोन) भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरावयाचे झाल्यास चलनाची प्रत घेणे याकरीता विहित अंतिम दिनांक ०१ जुलै, २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत.

(तीन) चलनाद्वारे परीक्षाशुल्क भरावयाचे झाल्यास भारतीय स्टेट बँकेमध्ये शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक ०२ जुलै, २०२२ बँकेच्या कार्यालयीन वेळेत.

ऑनलाईन पध्दतीने आयोगास सादर केलेल्या अर्जाच्या प्रतीसह अर्ज केल्याबाबतची माहिती उमेदवारांनी स्वत: आपल्या विभाग/ कार्यालय प्रमुखांना कळविणे आवश्यक आहे.

प्रस्तुत परीक्षेचा अर्ज विचारात घेण्यास विभाग/कार्यालय प्रमुखांना कोणताही आक्षेप असल्यास तसे विभाग/कार्यालय प्रमुखांनी अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत आयोगास कळविणे आवश्यक आहे. तसेच परीक्षेकरीता अर्ज विचारात घेण्यास हरकत नसल्यास आयोगास तसे कळविण्याची आवश्यकता नाही, असेही उमेदवारांनी संबंधित विभाग/कार्यालय प्रमुखांना कळवावे.

परीक्षेस अर्ज सादर केल्यानंतर अथवा परीक्षा दिल्यानंतर उमेदवाराने राजीनामा दिल्यास अथवा कोणत्याही कारणास्तव नोकरी सोडल्यास अथवा विभागाने सेवा समाप्त केल्यास अथवा धारणाधिकार न ठेवता संवर्गबाह्य पदावर नेमणूक झाल्यास सदर परीक्षेच्या निकालाच्या आधारे संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी पात्र असणार नाही.

“महाराष्ट्र शासकीय गट – अ व गट – ब (राजपत्रित व अराजपत्रित) पदांवर सरळसेवेने व पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसुली विभाग वाटप नियम, २०२१ “तसेच तद्नंतर यासंदर्भात शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार नियुक्ती विषयक कार्यवाही करण्यात येईल. अर्जात नमूद केलेल्या माहितीच्या आधारे उमेदवार परिपत्रकातील विहित अर्हतेबाबतच्या अटींची व शर्तींची पुर्तता करतात असे समजून पात्रता न तपासता आयोगाकडून उमेदवारांना तात्पुरता प्रवेश दिला जाईल. परंतु परीक्षेपूर्वी अथवा परीक्षेनंतर कोणत्याही टप्प्यावर, उमेदवाराने अर्जात नमूद केलेली माहिती चुकीची वा खोटी असल्याचे अथवा उमेदवार विहित अर्हतेची पुर्तता करीत नसल्याचे आढळल्यास अशा उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल तसेच संबंधित उमेदवाराची कृती ही आयोगाची फसवणूक समजून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याव्यतिरिक्त आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार संबंधित उमेदवाराला प्रतिरोधित (Debar) करण्याची कारवाई करण्यात येईल आणि त्याबाबतचा आयोगाचा निर्णय अंतिम राहिल.

शारीरिक चाचणीबाबत:

मुख्य लेखी परीक्षेच्या निकालाआधारे शारीरिक चाचणीसाठी अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांना शारीरिक चाचणी द्यावी लागते हे विचारात घेऊन उमेदवारांनी वेळीच त्यासाठी सराव व पूर्वतयारी करावी. मुख्य लेखी परीक्षेच्या निकालानंतर सर्वसाधारणपणे दोन आठवड्याच्या अंतराने कधीही शारीरिक चाचणी आयोजित केली जाईल. सरावासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याच्या कारणास्तव शारीरिक चाचणीचे दिनांक बदलून मागता येणार नाहीत किंवा त्याबाबत तक्रार करता येणार नाही.

आयोगाकडून शारीरिक चाचणीचा कार्यक्रम निश्चित होताच तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. तसेच, आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीतील संबंधित पात्र उमेदवारांना त्यांच्या प्रोफाईलद्वारे कळविण्यात येईल.

आयोगाने निश्चित केलेल्या दिनांकास व ठिकाणी संबंधित उमेदवाराने शारीरिक चाचणीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे. शारीरिक चाचणीसाठी निश्चित केलेल्या दिनांक व वेळेमध्ये बदल करण्याबाबतची विनंती मान्य केली जाणार नाही व त्यामुळे उमेदवाराची शारीरिक चाचणीची संधी वाया गेल्यास त्याची जबाबदारी संबंधित उमेदवाराची असेल.

केवळ शारीरिक चाचणीच्या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहून वैद्यकीय कारणास्तव शारीरिक चाचणीचा दिनांक बदलून देण्याची विनंती करणा-या उमेदवारांना वैद्यकीय प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या आजार/दुखापत, त्याचे स्वरूप, गांभीर्य व सत्यता तपासणीसाठी लगेचच आयोगाने निश्चित केलेल्या ठिकाणी व वेळेस सक्षम वैद्यकीय मंडळापुढे पाठविण्यात येईल. तसेच वैद्यकीय मंडळाने फिटनेस (Fitness) प्रमाणपत्र प्रदान केले तरच त्यांना आयोगाने निश्चित केलेल्या ठिकाणी व वेळेस शारीरिक चाचणीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येईल.

वैद्यकीय कारणास्तव शारीरिक चाचणीसाठी मुदतवाढ मागणा-या उमेदवारांच्या बाबतीत सत्यता तपासणीनंतर वैद्यकीय मंडळाकडून प्रतिकूल अहवाल प्राप्त झाल्यास संबंधित उमेदवाराला शारीरिक चाचणीची संधी नाकारण्यात येईल. तसेच, अशा प्रकरणी आयोगाची फसवणूक करण्याचा प्रयत्न समजून संबंधित उमेदवारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शिवाय उमेदवाराची संबंधित परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येऊन आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा व निवडीपासून उमेदवाराला प्रतिरोधित (Debar) करण्यात येईल. त्याव्यतिरिक्त संबंधित उमेदवारांवर शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल.

अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत तसेच समर्थनीय कारणासह अर्ज केलेल्या उमेदवारांना शारीरिक चाचणीचा दिनांक व वेळ बदलून देण्याच्या विनंतीबाबत आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार, विचार करण्यात येईल. एखाद्या प्रकरणी आयोगाने विनंती अमान्य केली असेल तर संबंधित उमेदवाराला पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार निश्चित केलेल्या दिनांक व वेळेनुसार शारीरिक चाचणीसाठी उपस्थित रहावे लागेल. तद्नंतर उमेदवाराला पुढील संधी दिली जाणार नाही.

प्रवेशप्रमाणपत्र :

परीक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेशप्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावर (https://mpsconline.gov.in) उमेदवारांच्या प्रोफाईलद्वारे परीक्षेपूर्वी सर्वसाधारणपणे ७ दिवस अगोदर उपलब्ध करुन देण्यात येईल. त्याची प्रत परीक्षेपूर्वी डाऊनलोड करुन घेणे व परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.

  1. परीक्षेच्या वेळी उमेदवाराने स्वतःचे प्रवेशप्रमाणपत्र आणणे सक्तीचे आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
  2. प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर उमेदवाराला त्याच्या आयोगाकडील नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर लघुसंदेशाद्वारे कळविण्यात येईल. याबाबतची घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर परीक्षेपूर्वी एक सप्ताह अगोदर प्रसिद्ध करण्यात येईल.
  3. परीक्षेच्या दिनांकापूर्वी ३ दिवस अगोदर प्रवेश प्रमाणपत्र प्राप्त न झाल्यास अर्ज सादर केल्याच्या आवश्यक पुराव्यासह आयोगाच्या कार्यालयाकडे संपर्क साधावा.
  4. परीक्षेच्यावेळी स्वत: च्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसेन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.
  5. आधार कार्डच्या ऐवजी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) च्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड केलेले ई – आधार सादर करणा-या उमेदवारांच्या बाबतीत ई- आधार वर उमेदवाराचे नाव, पत्ता, लिंग, फोटो, जन्मदिनांक या तपशीलासह आधार निर्मितीचा दिनांक (Date of Aadhaar generation) व आधार डाऊनलोड केल्याचा दिनांक असल्यासच तसेच सुस्पष्ट फोटोसह रंगीत प्रिंट मध्ये आधार डाऊनलोड केले असल्यासच ई – आधार वैध मानण्यात येईल.
  6. नावांमध्ये बदल केलेला असल्यास विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला (विवाहित स्त्रियांच्या बाबतीत), नावांत बदल झाल्यासंबंधी अधिसूचित केलेले राजपत्र किंवा राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावांत बदल झाल्यासंबंधीचा दाखला व त्याची छायांकित प्रत परीक्षेच्यावेळी सादर करणे आवश्यक आहे.

परीक्षेस प्रवेश:

परीक्षेच्या प्रवेश/उपस्थितीसंदर्भात आयोगाच्या संकेतस्थळाद्वारे अथवा प्रवेशप्रमाणपत्राद्वारे देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य आहे. अन्यथा आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन समजून आयोगाच्या स्वेच्छाधिकानुसार कारवाई करण्यात येईल.

प्रस्तुत जाहिरातीमध्ये परीक्षेसंदर्भातील संक्षिप्त तपशील दिलेला आहे. अर्ज स्वीकारण्याची पध्दत आवश्यक अर्हता, वयोमर्यादा, शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया परीक्षा योजना, अभ्यासक्रम इत्यादीबाबतच्या सविस्तर तपशिलासाठी आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील उमेदवारांकरीता माहिती ‘विभागातील” सूचना* अंतर्गत सर्वसाधारण सूचना तसेच परीक्षा” या सदराखालील परीक्षा योजना ‘विभागातील पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा मध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या माहितीचे कृपया अवलोकन करावे. आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली माहिती/जाहिरात अधिकृत समजण्यात येईल.

पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्तीसाठी पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा- २०२१ सूचना:

महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई यांच्याकरीता पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्तीसाठी पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा- २०२१ सूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा – महाज्योती मार्फत UPSC मोफत ऑनलाईन/ऑफलाईन प्रशिक्षणासाठी अर्ज सुरु – 2022-23

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.