महाज्योती मार्फत UPSC मोफत ऑनलाईन/ऑफलाईन प्रशिक्षणासाठी अर्ज सुरु – 2022-23
महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती – विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना नागरी लोकसेवा आयोग (UPSC) स्पर्धा परीक्षेसाठी मोफत ऑनलाईन/ऑफलाईन प्रशिक्षण सत्र 2022-23 योजना.
नागरी लोकसेवा आयोगाच्या 2023 मध्ये होणाऱ्या परीक्षांकरीता इतर मागासवर्गीय भटक्या जाती – विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील 1500 उमेदवारांना 2022-23 मधील सत्रातील UPSC परीक्षेच्या पुर्वतयारीसाठी मोफत ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीने महाज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरीता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
योजनेच्या लाभासाठी पात्रता :
1. उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
2. उमेदवार इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा.
3. उमेदवार नॉन क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा.
4. उमेदवार हा पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले किंवा पदवीच्या अंतीम वर्षाला असणारे विद्यार्थी सुद्धा या प्रशिक्षणाकरीता अर्ज करु शकतात.
5. यापूर्वी महाज्योतीच्या MPSC, UPSC प्रशिक्षण या योजनांचा कोणत्याही स्वरुपात लाभ घेतलेल्या उमेदवारांनी चालु योजनेसाठी पून्हा अर्ज करु नये, त्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
6. उमेदवारांची अंतीम निवड छाननी परीक्षेद्वारे करण्यात येईल.
7. अंतीमतः पात्र ठरणाऱ्या ऑफलाईन प्रशिक्षणाचा पर्याय निवडणाऱ्या उमेदवारांना मोफत प्रशिक्षण व अभ्यास साहित्यासह (पुस्तके) रु. 10000/- प्रतीमहा विद्यावेतन देण्यात येईल.
सामाजिक प्रवर्गनिहाय लाभार्थी संख्येची विभागणी :
अ.क्र. | प्रवर्ग | लाभार्थी संख्या |
1 | इतर मागासवर्ग | 885 |
2 | भटक्या जाती विमुक्त जमाती | 525 |
3 | विशेष मागास प्रवर्ग | 90 |
एकुण | 1500 |
दिव्यांग चा प्रवर्गासाठी वरील 1500 पैकी 75 जागा दिव्यांगासाठी राखून ठेवण्यात येत आहे. त्यासाठी सामाजिक प्रवर्गनिहाय निश्चित संख्या गृहित धरण्यात येणार नाही.
अर्ज कसा करावा ?
1. महाज्योतीच्या https://mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील Application for UPSC Training2022-23 यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.
2. अर्जासोबत जातीचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate), नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, आधार कार्ड ही कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन अपलोड करावी.
3. पदवी उत्तीर्ण केलेल्या उमेदवाराने पदवीचे प्रमाणपत्र/मार्कशीट तसेच पदवीच्या अंतीम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र ( नवीनतम ) अर्जासोबत अपलोड करावे.
4. अर्ज करण्याचा अंतीम दिनांक 20/06/2022 असेल. पोस्टाने किंवा ई – मेल द्वारे प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही.
5. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांच्या अखत्यारीत असतील.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक : 07122870120 :
ई – मेल आयडी: mahajyotiupsc 21@gmail.com
महाज्योती सूचना पत्रक: महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत नागरी लोकसेवा आयोग (UPSC) स्पर्धा परीक्षेसाठी मोफत ऑनलाईन/ऑफलाईन प्रशिक्षण सत्र 2022-23 बाबत सूचना पत्रक फण्यासाठी येथे क्लिक करा.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!