धनगर समाज घरकुल योजना : बुलडाणा जिल्हयातील घरकुल लाभार्थी यादी जारी
धनगर समाज बांधवांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम भटक्या जमाती – क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याची योजना वाचा क्रं २ मधील शासन निर्णयानुसार राबविण्यात येते. सदर योजना खालील शासन निर्णयातील येथील संदर्भ क्रं -१ मध्ये नमुद शासन निर्णयानुसार, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या धर्तीवर राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सदर योजनेअंतर्गत खालील शासन निर्णयातील संदर्भ क्र. ३ नुसार, सहायक आयुक्त, समाज कल्याण बुलडाणा यांच्याकडून ८६ लाभार्थ्याची शिफारस प्राप्त झाली आहे, त्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
धनगर समाज घरकुल योजना : बुलडाणा जिल्हयातील घरकुल लाभार्थी यादी:
धनगर समाज बांधवांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम भटक्या जमाती – क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण बुलडाणा यांच्यामार्फत जिल्हाधिकारी समितीच्या मान्यतेने खालील शासन निर्णयातील संदर्भ क्र.०२ नुसार प्राप्त झालेल्या ८६ वैयक्तिक लाभार्थ्याच्या सोबत जोडण्यात आलेल्या परिशिष्ट “अ” मध्ये नमूद) प्रस्तावास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक असलेला निधी रु. १,०७,३२,८००/- (अक्षरी रु. एक कोटी सात लाख बत्तीस हजार आठशे फक्त) खालील अटींच्या अधीन राहून वितरित करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.
१. बुलडाणा जिल्हयातील जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरविलेल्या व छाननी अंती अंतीम केलेल्या लाभार्थ्यापैकी खालील शासन निर्णया सोबत जोडण्यात आलेल्या परिशिष्ट “अ” मध्ये नमूद पात्र लाभार्थ्यांना सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील.
२. सर्व लाभार्थ्याची जात प्रमाणपत्रे भटक्या जमाती – क प्रवर्गाची असणे बंधनकारक राहील.
३. ज्या व्यक्तीचे जात प्रमाणपत्र आहे. त्याच व्यक्तीस सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. दुसऱ्या व्यक्तीस त्याचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
४. उत्पन्नाचे दाखले हे सन २०२२-२३ या वर्षाचे सादर करणे आवश्यक राहतील.
५. सर्व लाभार्थींना आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्यात अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
६. ज्या व्यक्तीच्या नावात, पालकाच्या/वडीलांच्या नावात अथवा आडनावात तफावत असल्यास ती तफावत दुर करण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या नावाचा, पालकाच्या नाव व आडनावाचा पुरावा सादर करणे आवश्यक राहील.
७. ज्या व्यक्तीच्या नावात, पालकाच्या/वडीलाच्या नावात किंवा आडनावात तफावत असेल अशा व्यक्तीस सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
८. पात्र लाभार्थ्यांची नावे दुबार झाल्यास सदरहू नावे वगळून शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करावी.
९. जिल्हास्तरीय समितीने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसंदर्भात वेळोवेळी शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयांच्या अधीन राहून सदरहू प्रकरणी आवश्यक ती कार्यवाही करून वैयक्तिक लाभार्थी यांच्या घरकुल योजनेस मान्यता देण्याची कार्यवाही करणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत शासन निर्णयातील अटी व शर्तीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.
२. या प्रकरणी लाभार्थ्याच्या सर्व कागदपत्रांची व अटींची पुर्तता झाल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी, बुलडाणा व सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, बुलडाणा यांची राहील.
३. या प्रकरणी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसंदर्भात वेळोवेळी शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार, निधीच्या मर्यादेत निकष व प्राथम्य क्रमानुसार पात्र लाभार्थी यांची निवड करणे व नमूद केलेल्या तरतुदीनुसार किमान मर्यादेत खर्च करणे अनुज्ञेय राहिल. याकरीता कोणत्याही परिस्थितीत अतिरिक्त निधी मंजूर केला जाणार नाही.
४. सदरहू योजनेच्या अंमलबजावणीसाठी सहायक आयुक्त, समाजकल्याण, बुलडाणा हे आहरण व संवितरण अधिकारी असतील. सदरहू योजनेसाठी आवश्यक असलेली तरतूद सहायक आयुक्त, समाजकल्याण, बुलडाणा हे संबंधित यंत्रणेस वितरीत करतील. संबंधित जिल्हाधिकारी व सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांनी सर्व अटी व शर्तीच्या पुर्ततेशिवाय निधी खर्च करु नये.
५. याबाबतचा खर्च सन २०२२-२३ या वित्तीय वर्षात मागणी झेडजी -३, मुख्य लेखाशिर्ष २२२५, (०४) भटक्या जमाती -क यांचे कल्याण (०३) (०४) भटक्या जमाती – क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याची योजना कार्यक्रम) (२२२५ – एफ ४६१) ३१, सहायक अनुदाने (वेतनेत्तर) या लेखाशिर्षाखालील तरतुदीतुन भागविण्यात यावा.
धनगर समाज घरकुल योजना : बुलडाणा जिल्हयातील घरकुल लाभार्थी यादी:
सन २०२२-२३ मध्ये बुलडाणा जिल्हयातील भटक्या जमाती – क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरकूल योजना जिल्हास्तरीय समितीने शिफारस केलेल्या पात्र लाभार्थ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
इतर मागास बहुजन कल्याण विभाग शासन निर्णय :
बुलडाणा जिल्हयातील भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याच्या योजनेसाठी निधी उपलब्धते बाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!