Konkan Railway Online Ganpati Train Booking : गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे तिकीट बुकिंग सुरु !
गणेशोत्सव हा कोकणात सर्वाधिक मोठा उत्सव आहे व यंदा ७ सप्टेंबरला आहे. कोकणात जाण्यासाठी रेल्वेचे बुकिंग कधी सुरु होणार, याकडे अनेक चाकरमानी डोळे लावून बसले होते. गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे तिकिट बुकिंग (Konkan Railway Ganpati Train Booking) दि. ४ मे पासून सुरु झाले आहे. १२० दिवस अगोदर रेल्वेचे आरक्षण होते. गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी मुंबईतील हजारो चाकरमानी कोकणातील आपापल्या गावी जातात. त्यामुळे या काळात कोकण रेल्वेचे बुकिंग फुल्ल असते.
आता ४ मे पासून १ सप्टेंबरच्या प्रवासाची तिकीट रेल्वेच्या ऑनलाईन संकेतस्थळावर सुरू झाले आहे. याच पद्धतीने ५ मे रोजी २ सप्टेंबर, ६ मे रोजी ३ सप्टेंबर, ७ मे रोजी ४ सप्टेंबर, ८ मे रोजी ५ सप्टेंबर आणि ९ मे रोजी ६ सप्टेंबरचे आरक्षण आगाऊ उपलब्ध होणार आहे. कोकण रेल्वेच्या मार्गावर प्रतिवर्षी गणेशोत्सवासाठी जादा फेऱ्या सुरू केल्या जातात. परंतु, यंदा लोकसभा निवडणूक असल्याने लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ज्यादा रेल्वे जाहीर होण्याची शक्यता आहे.
साधारण, जूनच्या अखेरीस कोकणातील गणेश उत्सवासाठी जादा रेल्वे गाड्या जाहीर केल्या जातात. साधारण जुलै, ऑगस्टमध्ये रेल्वेच्या अतिरिक्त फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर केले जाते. परंतु, नियमित धावणाऱ्या गाड्यांना प्रवाशी चाकरमानी प्राधान्याने तिकीट काढत असतात. त्यामुळे कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना आजपासूनच आगाऊ आरक्षणाचा (Ganpati Train Booking) प्रयत्न करावा लागणार आहे.
गणपतीसाठी रेल्वे गाड्यांचे तिकीट बुकिंग सुरु (Konkan Railway Online Ganpati Train Booking):
गणपती उत्सव 2024 साठी रेल्वे तिकिटांचे (Ganpati Train Booking) ऑनलाइन बुकिंग (आरक्षण) 4 मे 2024 पासून IRCTC वेबसाइट आणि PRS काउंटरवर सकाळी 8:00 वाजता सुरू झाले.
गणपती ट्रेन बुकिंग तारखा (Ganpati Train Booking Dates):
गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे तिकीट बुकिंग (Ganpati Train Booking) करण्यासाठी खालील प्रमाणे प्रवास दिवस, आरक्षण दिवस आणि तारीख दिली आहे.
प्रवास दिवस आणि तारीख | आरक्षण दिवस आणि तारीख | ||
---|---|---|---|
वार | तारीख | वार | तारीख |
रविवार | १ सप्टेंबर २०२४ | शनिवार | ४ मे २०२४ |
सोमवार | २ सप्टेंबर २०२४ | रविवार | ५ मे २०२४ |
मंगळवार | ३ सप्टेंबर २०२४ | सोमवार | ६ मे २०२४ |
बुधवार | ४ सप्टेंबर २०२४ | मंगळवार | ७ मे २०२४ |
गुरुवार | ५ सप्टेंबर २०२४ | बुधवार | ८ मे २०२४ |
शुक्रवार | ६ सप्टेंबर २०२४ (हरतालिका) | गुरुवार | ९ मे २०२४ |
शनिवार | ७ सप्टेंबर २०२४ (गणेश चतुर्थी) | शुक्रवार | १० मे २०२४ |
रविवार | ८ सप्टेंबर २०२४ (ऋषी पंचमी) | शनिवार | ११ मे २०२४ |
सोमवार | ९ सप्टेंबर २०२४ | रविवार | १२ मे २०२४ |
मंगळवार | १० सप्टेंबर २०२४ (गौरी अवाहन) | सोमवार | १३ मे २०२४ |
बुधवार | ११ सप्टेंबर २०२४ (गौरी पूजन) | मंगळवार | १४ मे २०२४ |
गुरुवार | १२ सप्टेंबर २०२४ (गौरी गणपती विसर्जन) | बुधवार | १५ मे २०२४ |
शुक्रवार | १३ सप्टेंबर २०२४ | गुरुवार | १६ मे २०२४ |
शनिवार | १४ सप्टेंबर २०२४ | शुक्रवार | १७ मे २०२४ |
रविवार | १५ सप्टेंबर २०२४ | शनिवार | १८ मे २०२४ |
सोमवार | १६ सप्टेंबर २०२४ | रविवार | १९ मे २०२४ |
मंगळवार | १७ सप्टेंबर २०२४ (अनंत चतुर्दशी) | सोमवार | २० मे २०२४ |
बुधवार | १८ सप्टेंबर २०२४ | मंगळवार | २१ मे २०२४ |
गुरुवार | १९ सप्टेंबर २०२४ | बुधवार | २२ मे २०२४ |
रेल्वे तिकीट बुकिंगसाठी नोंदणी (IRCTC Train Booking):
गणपतीसाठी रेल्वे गाड्यांचे तिकीट बुकिंग (Ganpati Train Booking) आपण स्वतः मोबाईल किंवा लॅपटॉप वर करू शकतो, त्यासाठी IRCTC नोंदणी करणे आवश्यक असते. IRCTC चे रजिस्ट्रेशन करण्यासाठी वैयक्तिक नोंदणी हि विनामूल्य आहे. IRCTC चे रजिस्ट्रेशन करण्यासाठी मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी स्वतंत्र वापरकर्ता म्हणून नोंदणी करणे अनिवार्य आहे.
IRCTC चे रजिस्ट्रेशन करण्यासाठी https://www.irctc.co.in च्या वेबसाईट वर जा. वेबसाईटच्या मुख्यपृष्ठावर Login, Register असे ऑपशन दिसतील त्यातील Register या पर्यायावर क्लिक करा व आवश्यक तपशील भरून नोंदणी करा, अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
ऑनलाईन ट्रेन तिकीट बुकिंग कसे करायचे?
ऑनलाईन ट्रेन तिकीट बुकिंग करण्यासाठी IRCTC वेबसाईटवर User Name आणि Password टाकून Login करा, त्यानंतर “आपले तिकिट बुक करा” (BOOK TICKET) असे पेज ओपन होईल. नंतर आपल्या इच्छित स्थानापासून – स्थानकापर्यंत, प्रवासाची तारीख आणि प्रवासाचा वर्ग निवडायचा आहे, अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
कोकण रेल्वे 2024 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई, पनवेल आणि पुणे येथून कोकणासाठी गणपती विशेष गाड्या चालवणार आहे. वरील प्रमाणे आगाऊ ट्रेन तिकीट बुकिंग झाले नाही तर रेल्वेचं ऑनलाईन तात्काळ तिकीट बुकिंगचा पर्याय निवडू शकता, किंवा जादा गाड्या सोडल्यावर त्याचे बुकिंग करू शकता, तसेच IRCTC ची ऑनलाईन बस तिकीट बुकिंग सेवा सुरू आहे त्या पोर्टल वरून देखील ऑनलाईन बस बुकिंग करू शकता.
हेही वाचा – IRCTC च्या वेबसाइटवर ऑनलाईन ट्रेन तिकीट बुकिंग कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!