सरकारी योजनाकृषी योजनाजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेष

मनरेगा रोजगार हमी योजनेअंतर्गत अनुदान लाभासाठी अर्ज सुरु – 2023

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन 2022-23 अंतर्गत कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या फळबाग / फुलपिके लागवड, व्हर्मी कंपोष्ट, नाडेप कंपोष्ट व शेततळे या घटकांसाठी अनुदानाचा लाभ होण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत.

मागेल त्याला काम देणे व गावामध्ये आर्थिक समृध्दी आणणे हे मनरेगा योजनेचे उद्दिष्ट्य असून यासाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार जॉबकार्ड धारक असावा. अर्जदार अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, भटक्या जमाती, निरधिसुचित जमाती ( विमुक्त जमाती ), दारिद्रय रेषेखालील इतर कुटुंबे, स्त्री कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे, दिव्यांग व्यक्ती कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे, जमीन सुधारणांचे लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना, अनुसुचित जमातीचे व इतर पारंपारिक वनवासी या सर्वांना प्राधान्यक्रम दिल्यानंतर कृषि कर्ज माफी योजना, अल्प भूधारक व सीमांत भूधारक यांना प्राधान्य देण्यात यावे. अर्जदाराची जमिन (0.05 हेक्टर ते जास्तीत-जास्त 2 हेक्टर पर्यंत ) असणे आवश्यक.

आवश्यक कागदपत्रे:

>

खालील कागदपत्रे आवश्यक असून अर्ज गावातील ग्रामपंचायतीमध्ये करावे.

अनुदान: मनरेगा अंतर्गत व्हर्मी कंपोष्ट, नाडेप कंपोष्ट, शेततळे व फळबाग/ फुलपिके ही कामे मंजुर आहेत, त्यानुसार खालील प्रमाणे अनुदान राहील.

  • व्हर्मी कंपोष्ट- रक्कम रुपये 11 हजार 944 प्रति युनिट,
  • नाडेप कंपोष्ट – रक्कम रुपये 10 हजार 537 प्रति युनिट,
  • शेततळे -आकारमानानुसार रक्कम रुपये 60 हजार ते रक्कम रुपये 3 लाख पर्यंत.
  • फळबाग/ फुलपिके – जास्तीत जास्त रक्कम रुपये 2 लाख प्रति हेक्टर याप्रमाणे.

मनरेगा रोजगार हमी योजनेत अंतर्भुत फळपिके आणि फुलपिके: मनरेगा रोजगार हमी योजनेत अंतर्भुत फळपिके आणि फुलपिके खालील प्रमाणे आहेत.

फळपिके / वृक्ष – आंबा, काजू, चिकू, पेरु, डाळींब, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, चिंच, सिताफळ, आवळा, नारळ, बोर, कवठ, जांभुळ, कोकम, फणस, अंजीर, साग, सुपारी, कडीपत्ता,कडुलिंब, शेवगा, केळी, ड्रॅगनफ्रुट, करवंद, तुती, जड्रोफा, गिरीपुष्प, पानपिंपरी, द्राक्ष, चंदन, खाया, निम, चारोली, महोगनी, बाभुळ, अंजन, खैर, ताड, सुरु, रबर, महारुख, मँजियम, ऐन, शिसव, निलगिरी, गुलमोहर, महुआ, चिनार, शिरीष, बांबू व औषधी वनस्पती इत्यादी.

फुलपिके – गुलाब, मोगरा, निशीगंध व सोनचाफा.

अनुदानातील अंतर्भुत बाबी:

  • जमीन तयार करणे,
  • खड्डे तयार करणे,
  • कांड्या / कलमांची बीले व नांगी भरणे,
  • खते देणे,
  • आंतरमशागत,
  • पीक संरक्षण व पाणी देणे इ.

अनुदान लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यावर जमा करण्यात येते. अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

मनरेगा अर्ज नमुना PDF फाईल डाउनलोड करा:

  • जॉबकार्ड कुटुंब नोंदणीसाठी करावयाचा अर्ज नमुना नंबर १ डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
  • काम मागणीचा अर्ज नमुना क्र. ४ डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.