आपले सरकार - महा-ऑनलाईनउद्योग उर्जा व कामगार विभागबांधकाम कामगार कल्याणकारी योजनामहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेषसरकारी योजना

बांधकाम कामगारांना मोफत अत्यावश्यक संच लाभासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर !

राज्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणारे मजूर समाजाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहेत. पण या कामगारांचे जीवन अनेकदा असुरक्षित आणि अनिश्चिततेने भरलेले असते. त्यांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत, त्यापैकी एक म्हणजे — “अत्यावश्यक वस्तूंचा संच योजना (Atyavashyak Vastu Sanch – Essential Kit)”.

या योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना घरगुती वापरातील आवश्यक वस्तूंचा एक मोफत संच (Atyavashyak Vastu Sanch – Essential Kit) देण्यात येतो. ही योजना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ (MahaBOCW) मार्फत अंमलात आणली जाते.

मोफत अत्यावश्यक वस्तूंचा संच वाटप – Atyavashyak Vastu Sanch Yojana:

या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे बांधकाम क्षेत्रातील कामगारांना मूलभूत गरजांच्या वस्तू उपलब्ध करून देणे. अनेक कामगारांकडे कायमस्वरूपी निवास व्यवस्था किंवा आवश्यक घरगुती साहित्य नसते. त्यामुळे शासनाने या “अत्यावश्यक संच – Atyavashyak Vastu Sanch” योजनेद्वारे त्यांना जीवनातील किमान गरजा पूर्ण करण्यासाठी मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

योजनेची पात्रता:

या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी आवश्यक आहेत:

  1. अर्जदार हा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत (सक्रिय) बांधकाम कामगार असावा.

  2. नोंदणी वैध आणि अद्ययावत असावी (सदस्यता नूतनीकरण झालेले असावे).

  3. अर्जदाराने मागील १२ महिन्यांत किमान ९० दिवस बांधकामाचे काम केलेले असावे.

  4. सर्व आवश्यक कागदपत्रे (ओळखपत्र, पत्ता पुरावा, कामाचे प्रमाणपत्र इ.) योग्य रीतीने सादर केलेली असावीत.

अत्यावश्यक वस्तूंच्या संचात काय मिळणार?

शासन निर्णयानुसार प्रत्येक पात्र कामगारास खालील वस्तूंचा संच मिळणार आहे:

  1. पत्र्याची पेटी (Galvanized Trunk)

  2. प्लास्टिक चटई

  3. धान्य साठवण्यासाठी कोठी (25 किलो क्षमता)

  4. धान्य साठवण्यासाठी कोठी (22 किलो क्षमता)

  5. बेडशीट

  6. चादर

  7. ब्लँकेट

  8. साखरेचा डबा (1 किलो, SS 202)

  9. चहा पावडरचा डबा (500 ग्रॅम, SS 202)

  10. स्टील वॉटर प्युरिफायर (18 लिटर) – 2 कँडलसह

या सर्व वस्तू उच्च दर्जाच्या आणि शासनमान्य प्रयोगशाळेतून तपासलेल्या असतील.

आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड

  • नोंदणी प्रमाणपत्र (MahaBOCW ID)

  • पत्ता पुरावा (वीज बिल/रहिवासी दाखला)

  • पासपोर्ट साइज फोटो

  • कामाचे प्रमाणपत्र (जर गरज असेल तर)

अर्ज करण्याची प्रोसेस – MBOCWWB Essential kit:

बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तूंचा संच वाटप (Atyavashyak Vastu Sanch – Essential kit) योजनेसाठी अर्ज ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असून पुढीलप्रमाणे टप्प्याटप्प्याने करता येते:

1: नोंदणी क्रमांक मिळवा:

बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तूंचा संच वाटप (Atyavashyak Vastu Sanch – Essential kit) योजनेसाठी नोंदणी क्रमांक आवश्यक आहे त्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या खालील अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

https://iwbms.mahabocw.in/profile-login

पोर्टल ओपन केल्यनानंतर आपला आधार नंबर आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका आणि ‘Proceed to Form’ वर क्लिक करा.

आता तुमच्या मोबाईलवर OTP येईल, तो टाकून ‘Validate OTP’ करा. पुढे तुमचा BOCW नोंदणी क्रमांक मिळेल, तो कॉपी करून किंवा लिहून ठेवा.

2: कामगार – नवीन अपॉइंटमेंट तपशील:

नोंदणी क्रमांक भेटल्यानंतर आता अत्यावश्यक वस्तूंचा संच वाटप (Atyavashyak Vastu Sanch – Essential kit) योजनेची नवीन अपॉइंटमेंट घेण्यासाठी खालील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या खालील अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

https://kitdist-v2.mahabocw.in/essential-kit/appointment

BOCW Registration Number
BOCW Registration Number

पोर्टल ओपन केल्यनानंतर नवीन अपॉइंटमेंट घेण्यासाठी तुमचा नोंदणी क्रमांक खाली “BOCW कामगार नोंदणी क्रमांक” मध्ये टाका आणि Send OTP वर क्लिक करा.

आता मोबाईलवर आलेला OTP टाकून व्हेरिफाय करा, त्यानंतर आपली सर्व वैक्तिक माहिती दाखवली जाईल.

पुढे Select Camp / शिबिर निवडा – आपल्याजवळील केंद्र निवडा आणि Appointment Date निवडा – उपलब्ध तारीख निवडा.(सूटीच्या दिवशी किंवा फुल्ल झालेल्या स्लॉटवर नियुक्ती मिळणार नाही.)

3: अपॉइंटमेंट प्रिंट घ्या

  1. पुढे ‘PRINT APPOINTMENT’ वर क्लिक करा.

  2. दिलेल्या तारखेचा अपॉइंटमेंट स्लिप प्रिंट करून ठेवा.

  3. निवडलेल्या दिवशी संबंधित शिबिरात उपस्थित राहा आणि अत्यावश्यक वस्तूंचा संच (Atyavashyak Vastu Sanch – Essential kit) प्राप्त करा.

उद्योग, उर्जा व कामगार विभाग शासन निर्णय:

  1. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच (Essential kit) पुरविण्याच्या सुधारित योजनेस शासन मान्यता देणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

जर तुम्हाला या योजनेबद्दल अधिक माहिती हवी असेल किंवा अर्ज करताना अडचण येत असेल, तर तुम्ही आपल्या जिल्ह्यातील कामगार कल्याण अधिकारी किंवा शिबिर कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

प्र.१: अत्यावश्यक संच कोणाला मिळणार?
👉 नोंदणीकृत आणि सक्रिय बांधकाम कामगारांना, ज्यांची नोंद Maharashtra BOCW मंडळात आहे.

प्र.२: अर्ज कुठे करायचा आहे?
👉 https://kitdist-v2.mahabocw.in/essential-kit/appointment या संकेतस्थळावर.

प्र.३: संच मिळण्यासाठी शुल्क द्यावे लागते का?
👉 नाही, ही योजना पूर्णपणे मोफत आहे.

प्र.४: संचात कोणत्या वस्तू असतात?
👉 स्टीलची पेटी, धान्य कोठ्या, बेडशीट, ब्लँकेट, चादर, चटई, प्युरिफायर, साखर आणि चहाचे डबे इ.

प्र.५: वितरणाची तारीख कशी मिळेल?
👉 वेबसाइटवर अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला वितरणाची तारीख आणि ठिकाण दिसेल.

या लेखात, आम्ही बांधकाम कामगारांना मोफत अत्यावश्यक वस्तूंचा संच (Atyavashyak Vastu Sanch – Essential kit) योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? या विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

खालील लेख देखील वाचा !

  1. बांधकाम कामगारांना सुरक्षा संच योजना 2025 – मोफत सेफ्टी किट लाभासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर !
  2. बांधकाम कामगारांना सुरक्षा व अत्यावश्यक संच वाटप सुधारित योजना
  3. बांधकाम कामगारांना मोफत घरगुती वस्तूंचा संच योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा !
  4. बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी – नोंदणी व नूतनीकरण आता पूर्णपणे मोफत!
  5. बांधकाम कामगार कल्याणकारी योजना आणि बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी कशी करायची जाणून घ्या सविस्तर!
  6. बांधकाम कामगार लाभार्थी यादी ऑनलाईन पहा आणि लाभार्थी यादी मध्ये नाव नसेल तर नोंदणीची स्थिती जाणून घेऊन अशी करा नोंदणी अपडेट!
  7. बांधकाम कामगार कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन मागणी अर्ज (Online Claim) कसा करायचा जाणून घ्या सविस्तर.
  8. ग्रामसेवक / महानगरपालिका / नगरपरिषदेतर्फे बांधकाम कामगाराने मागील वर्षभरात ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देऊन नोंदणी करणेबाबत शासन नियम
  9. UMANG पोर्टल वरून असे बनवा ई-श्रम यूएएन कार्ड !
  10. ई-श्रम यूएएन कार्डसाठी अशी करा ऑनलाईन नोंदणी!
  11. प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना
  12. नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांसाठी आरोग्य योजना
  13. अटल बांधकाम कामगार आवास योजना – ग्रामीण!
  14. अटल बांधकाम कामगार आवास योजनेंतर्गत जागा खरेदीसाठी १ लाख रूपये अर्थसहाय्य !
  15. बांधकाम कामगारांनी अमिषाला बळी पडू नये; कामगार मंडळाचे आवाहन !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.