स्पर्धा परीक्षावृत्त विशेषसरकारी योजना

बॅंक, रेल्वे, एलआयसी, पोलिस, सैन्य भरती ई. स्पर्धा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण आणि शिष्यवृत्तीसाठी अर्ज सुरु

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दि. ३० ऑक्टोबर रोजी केलेल्या घोषणेनुसार, अनुसूचित जातीतील मुला-मुलींसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम बार्टीमार्फत राज्यातील ३० केंद्रांवर राबवण्यासंदर्भात बार्टीकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मंत्री धनंजय मुंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत राज्यातील ३० केंद्रांवर बँकिंग, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती, कॉर्पोरेट क्षेत्रातील संधी यानुषंगाने विविध स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली होती.

त्यानुसार बार्टी मार्फत ३० केंद्राच्या विस्तृत यादिसह पात्र विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. बार्टी मार्फत राज्यातील ३० केंद्रांवर बँकिंग, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती व कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरीच्या संधीच्या अनुषंगाने लेखी परीक्षा, aptitude test, मुलाखती आदींच्या पूर्वतयारीसाठी विशेष अनिवासी प्रशिक्षण देण्यात येणार असून यासाठी दि. ०९ डिसेंम्बर २०२१ पूर्वी संबंधित केंद्रांवर अर्ज सादर करण्यात यावेत असे आवाहन बार्टीचे महासंचालक धम्मज्योति गजभिये यांनी केले आहे.

सदर प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षात दोन सत्रात मिळून ६०० असे एकूण १८ हजार विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धी साठी प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रशिक्षण कालावधी दरम्यान विद्यार्थ्यांना ६ हजार रुपये प्रतिमहिना प्रमाणे विद्यावेतन तसेच पोलीस भरती व तत्सम तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बूट व अन्य साहित्य खरेदीसाठी एकरकमी ३ हजार रुपये देण्यात येतील.

प्रत्येक प्रशिक्षण केंद्रावरून प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी व त्यातून प्रत्यक्ष नोकरी मिळालेले विद्यार्थी यांच्या प्रमाणावरून संबंधित केंद्रांचा दर्जा ठरविण्यात येईल. तसेच आवश्यकता भासल्यास प्रशिक्षण केंद्रांची संख्या वाढविता येईल. इच्छुक व पात्र असलेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ठराविक वेळेत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री मा. धनंजय मुंडे यांनी केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यासाठी बँक, रेल्वे, एल.आय.सी. इत्यादी व तत्सम नोकरीच्या संधी तसेच Aptitude Test आणि Interview वर आधारित खाजगी व कॉर्पोरेट क्षेत्रातील चांगल्या नोकरीच्या संधी याकरीता घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परिक्षांच्या पूर्वतयारी करिता निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण ( कोचिंग ) खालील नमूद केलेल्या प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.

१) बॅंक, रेल्वे, एलआयसी ई. प्रशिक्षण आणि शिष्यवृत्तीसाठी पात्रता, अटी/शर्ती, अर्ज नमुना आणि आवश्यक कागदपत्रे :

प्रत्येक प्रशिक्षण केंद्रामध्ये १५० अनुसूचित जातीचे विद्यार्थी निवड केले जातील व २० विद्यार्थ्यांची प्रतिक्षा यादी ठेवण्यात येईल. त्यामध्ये ३० टक्के जागा महिलांसाठी, ४ टक्के जागा ” दिव्यांग ” असलेल्या व्यक्ती ( Person with Disability ) जागा राखीव राहतील.

पात्रता:

महाराष्ट्र राज्याचा अनुसूचित जाती मधील उमेदवार असावा.

अर्जदाराचे वय १८ ते ३४ पर्यन्त असावे.

अर्जदार किमान १२ वी उत्तीर्ण अथवा पदवीधर असावा.

प्रशिक्षणाच्या अटी व शर्ती:

१) वर नमूद प्रशिक्षण केंद्रांकडे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ०९/१२/२०२१

२) प्रशिक्षण कालावधी ६ महिन्यांचा राहील.

3) विहीत नमुन्यामध्ये आवश्यक कागदपत्रांसहीत अर्ज दाखल केलेल्या पात्र उमेदवारांची चाळणी परीक्षा ( screening test ) वर नमुद संस्थेमार्फत दिनांक १२/१२/२०२१ रोजी सकाळी १०.३० वा. घेण्यात येईल. त्या आधारे उमेदवारांची गुणानुक्रमे कोचिंगसाठी निवड करण्यात येईल.

४) प्रशिक्षण कोचिंग क्लास दि. १५ डिसेंबर, २०२१ व त्या दरम्यान सुरु करण्यात येईल.

५) निवड झालेल्यापैकी पात्र विद्यार्थी प्रशिक्षणाकरीता रोज ३ तास व त्यापेक्षा जास्त कालावधीकरीता उपस्थित राहील. तसेच एकूण दरमहा ७५ टक्के पेक्षा जास्त कालावधी प्रशिक्षणास उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा रुपये ६०००/- विद्यावेतन ( Stipend ) अनुज्ञेय राहील.

६) विद्यार्थ्यांना रु. ५०००/- एवढ्या किंमतीचे नि: शुल्क अभ्यास साहित्य व पुस्तकांचा संच बार्टी दारे प्रशिक्षण केंद्रमार्फत देण्यात येईल.

७) सदर प्रशिक्षण ( Couching ) कार्यक्रम उपरोक्त ३० प्रशिक्षण केंद्रामार्फत राबविण्यात येणार आहे. तरी त्या त्या जिल्ह्यामध्ये कोचिंग घेण्यासाठी इच्छुक अनु जाती मधील उमेदवार त्या जिल्ह्यातील संबंधित प्रशिक्षण केंद्रावर जाहिरातीनुसार अर्ज करु शकतील.

८) विहीत नमुन्यातील अर्ज वर नमुद केलेल्या प्रशिक्षण केंद्रांच्या कार्यालयाकडून किंवा बार्टी, पुणे या संस्थेच्या वेबसाईट वरुन प्राप्त करुन भरता येईल. अधिक माहितीसाठी वर नमुद प्रशिक्षण केंद्रांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

९) ज्या उमेदवारांनी यापूर्वी बार्टी, पुणे मार्फत बँक, रेल्वे, एल.आय.सी. इत्यादी व तत्सम स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण घेतले असेल, त्यांची पुन्हा नव्याने प्रशिक्षणासाठी गुणाक्रमे निवड केली जाणार नाही.

१०) दि. २९/०२/२०२० रोजी वर्तमान पत्रामध्ये प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने बँक, रेल्वे, एल.आय.सी. इत्यादी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरीता विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केला असेल अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा नव्याने संबंधित प्रशिक्षण केंद्रास अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे :

१) उमेदवाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो.

२) जातीच्या प्रमाणपत्राची सांक्षाकित प्रत.

३) १२ वी उत्तीर्ण अथवा कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण केलेले प्रमाणपत्र सांक्षाकित प्रत

४) शाळा सोडल्याचा दाखला ( TC ) सांक्षाकित प्रत.

५) उमेदवाराचे आधार कार्ड सांक्षाकित प्रत.

६) दिव्यांग असल्यास ४०% पेक्षा जास्त प्रमाणात असलेल्या दिव्यांगत्वाचा दाखला सांक्षाकित प्रत.

बँक, रेल्वे आणि एलआयसी कोचिंग अर्ज नमुना:

अर्ज डाऊनलोड करून किंवा खालील नमुद प्रशिक्षण केंद्राच्या कार्यालयातून प्राप्त करून, खालील पैकी ज्या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण घ्यावयाचे आहे. त्या केंद्रावर दि. ०९/१२/२०२२ पर्यंत परिपूर्ण भरलेला अर्ज कागद पत्रांसह सादर करावा. बँक, रेल्वे आणि एलआयसी कोचिंग अर्ज नमुना डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

२) पोलीस आणि सैन्य प्रशिक्षण आणि शिष्यवृत्तीसाठी पात्रता, अटी/शर्ती, अर्ज नमुना आणि आवश्यक कागदपत्रे :

प्रत्येक प्रशिक्षण केंद्रामध्ये १०० अनुसूचित जातीचे विद्यार्थी निवड केले जातील व २० विद्यार्थ्यांची प्रतिक्षा यादी ठेवण्यात येईल . त्यामध्ये ३० टक्के जागा महिलांसाठी जागा राखीव राहतील.

पात्रता :

१) महाराष्ट्र राज्याचा अनुसूचित जाती मधील उमेदवार असावा.

२) अर्जदाराचे वय १९ ते ३२ पर्यन्त असावे.

३) अर्जदार किमान १० वी १२ वी उत्तीर्ण असावा.

४) महिला उमेदवारांची उंची किमान १५५ से.मी. असणे आवश्यक आहे.

५) पुरुष उमेदवारांना उंची किमान १६५ से.मी. असणे आवश्यक आहे. तसेच छाती किमान ७९ से. मी. व फुगवून ७९ + ५से.मी. असणे आवश्यक आहे.

६) पोलिस व मिलीटरी भरतीच्या शारीरीक क्षमता चाचणीच्या पात्रतेनुसार उमेदवारांना निकष लागु राहतील.

प्रशिक्षणाच्या अटी व शर्ती :

१) वर नमुद प्रशिक्षण केंद्रांकडे अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ०९/१२/२०२१ आहे.

२) प्रशिक्षण कालावधी ४ महिन्यांचा राहील.

३) विहीत नमुन्यामध्ये आवश्यक कागदपत्रांसहीत अर्ज दाखल केलेल्या पात्र उमेदवारांची चाळणी परीक्षा (screening test) वर नमुद केंद्रांमार्फत दिनांक १२/१२/२०२१ रोजी दुपारी ०३.०० वा. घेण्यात येईल. उमेदवारांची गुणानुक्रमे प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल.

४) प्रशिक्षण कोचिंग क्लास दि. १५ डिसेंबर, २०२१ व त्या दरम्यान सुरु करण्यात येईल.

५) निवड झालेल्यापैकी पात्र विद्यार्थी प्रशिक्षणाकरीता लेखी व शारीरीक क्षमता चाचणी पूर्व तयारी करीता रोज ४ तास व त्यापेक्षा जास्त कालावधीकरीता उपस्थित राहील. तसेच विद्यार्थी एकूण दरमहा ७५ टक्के पेक्षा जास्त कालावधी प्रशिक्षणास उपस्थित राहील त्या विद्यार्थ्यांना दरमहा रुपये ६०००/विद्यावेतन ( Stipend ) देण्यात येईल.

६) विद्यार्थ्यांना रु. ५०००/- एवढ्या किंमतीचे नि: शुल्क अभ्यास साहित्य व पुस्तकांचा संच बार्टी व्दारे प्रशिक्षण केंद्रा मार्फत देण्यात येईल. तसेच निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बुट व इतर आवश्यक साहित्य खरेदी करण्याकरीता रु. ३०००/- इतका निधी बार्टी मार्फत एक वेळ दिला जाईल.

७) सदर प्रशिक्षण ( Coaching ) कार्यक्रम ३० प्रशिक्षण केंद्रामार्फत राबविण्यात येणार आहे. तरी त्या – त्या जिल्ह्यामध्ये कोचिंग घेण्यासाठी इच्छुक उमेदवार त्या जिल्ह्यातील संबंधित प्रशिक्षण केंद्रावर जाहिरातीनुसार अर्ज करु शकतील.

८) विहीत नमुन्यातील अर्ज वर नमुद केलेल्या प्रशिक्षण केंद्रांच्या कार्यालयाकडून किंवा बार्टी, पुणे या संस्थेच्या वेबसाईट वरुन प्राप्त करुन भरता येईल. अधिक माहितीसाठी खाली नमुद केलेल्या प्रशिक्षण केंद्रांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:

१) उमेदवाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो

२) जातीच्या प्रमाणपत्राची सांक्षाकित प्रत.

३) १० वी व १२ वी उत्तीर्ण केलेल्या प्रमाणपत्राच्या सांक्षाकित प्रती.

४) शाळा सोडल्याचा दाखला (TC) सांक्षाकित प्रती.

५) उमेदवाराचे आधार कार्ड सांक्षाकित प्रती.

पोलीस आणि सैन्य प्रशिक्षण अर्ज नमुना PDF फाईल:

अर्ज डाऊनलोड करून किंवा खालील नमुद प्रशिक्षण केंद्राच्या कार्यालयातून प्राप्त करून, खालील पैकी ज्या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण घ्यावयाचे आहे. त्या केंद्रावर दि. ०९/१२/२०२२ पर्यंत परिपूर्ण भरलेला अर्ज कागद पत्रांसह सादर करावा. पोलीस आणि सैन्य प्रशिक्षण अर्ज नमुना डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

प्रशिक्षण केंद्र:

इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील संबंधित जिल्ह्यातील केंद्राशी संपर्क साधून त्या केंद्राकडे अर्ज करावा.

अ.क्र. जिल्हाप्रशिक्षण संस्थेचे नाव/पत्ता/दूरध्वनी क्रमांक
1अकोलाबोधीसत्व फाऊंन्डेशन, हर्ष संकुल ४ था मजला, R.L.T. कॉलेज समोर सीवील लाइन रोड,

अकोला मोबाईल क्र. ९३०९२५७१०९ / ९८५०५०९३२७

2औरंगाबादनालंदा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, एन.ए. पटेल कॉम्पलेक्स, रेणुका माता मंदिराजवळ,

सातारा परिसर, बीड बायपास रोड, औरंगाबाद, मोबाईल क्र. ९४२१३२०५४८ / ०२४०२६५३७४७

3औरंगाबादसंबोधी अकादमी संचलित स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र, तिसरा मजला, निर्माण भारती सिटी सेंटर,

शासकीय ग्रंथालयासमोर निराला बाजार औरंगाबाद, मोबाईल क्र. ९९७५६६३३४१ / ९५४५५५२९०२

4अमरावतीजनाई ग्रामिण बहुउद्देशीय शिक्षण संस्था, ३/२ वृंदावन बिल्डींग योग भवन समोर शामनगर

अमरावती मोबाईल क्र. ९७६६३६३६२१/७५५९२०१२०४

5बीडसम्राट प्रतिष्ठान उमरद खालसा संचलित छत्रपती राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रं.

स. मा. गर्ग वाचनालय कॅनल रोड यशवंतराव चव्हाण नाटयगृहजवळ तुळजाई चौक,

बीड मोबाईल क्र. ९९६०२५३४६१ / ९५८८४६७३७७ / ९९७०२२१८२३

6भंडाराए.ई.जी. अकॅडमी. साई मंदीर रोड, रंगारी दवाखान्याजवळ, भंडारा. मोबाईल क्र. ९५७९२९७७४४
7बुलढानाआई स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, जिजाई काँग्रेस नगर, जुन्या पाण्याच्या टाकी जवळ,

सुंदर खेड परिसर, बुलढाना ४४३००१ मोबाईल क्र. ८९८३६४४५७४ / ७७९६१९७७९६

8चंद्रपुरयुक्ती मल्टीपर्पज सोसायटी, ब्राईट इंग्लिश स्कुल, आंबेकर ले आऊट, पाण्याच्या टाकीजवळ,

चोर खिडकी, चंद्रपुर मोबाईल क्र. ९४२२१४१३०९ / ९१५६१९४६०५ / ८३९०४१९३०५ )

9धुळेबहुजन हिताय एज्युकेशन ट्रस्ट धुळे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रा, जोशाबा प्रोफेसर कॉलनी रोड,

चंदन नगर, देवपुर, धुळे मोबाईल क्र. ९८६०११३०७८ / ९४२२२८८७४१

10गडचिरोलीभारतीय सामाजिक बहुउद्देशीय विकास संस्था, दातारकर हाऊस, राधे बिल्डीग जवळ,

चामोशी रोड, ता.जि. गडचिरोली. मोबाईल क्र. ९७६७१५३८९० / ८६६८७०३३६२ / ९५११६७४९८५

11हिंगोलीउदयलक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट, संचलित उदयलक्ष्मी स्पर्धा प्रशिक्षण केंद्र, हिंगोली रेल्वे स्टेशन रोड,

बडेरा कॉम्प्लेक्स जवळ ता. जि. हिंगोली मोबाईल क्र. ७४७९७२७७७७ / ८४२१८८५५५५

12हिंगोलीभरारी बहु उद्देशीय सेवाभावी संस्था द्वारा ज्ञान प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र,

सावके सरांची इमारत, अकोला बायपास रोड, हिंगोली, मोबाईल क्र. ९७६५८५२५७४ / ९६९९१२४१५२

13हिंगोलीसंबोधी अकादमी संचलित स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र/रश्मी देशमुख, जिजामाता नगर,

आदर्श महाविद्यालयाजवळ, हिंगोली मोबाईल क्र. ७०२०११११९६ / ९४०४७३६८९२

14जालनानालंदा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, प्लॉट नं ६१, पागारकर नगर, अंबररोड,

जालना मोबाईल क्र. ९०४९३१४४४४ / ९४२२२००१४३

15मुंबईसम्यक निवास सेवाभावी संस्था, यशवंत सदन, पहिला मजला, हॉल एफ ५ व ६,

हिंदमाता सिनेमाजवळ गोविंदजी केनी मार्ग, नायगांव, दादर (पूर्व )

मुंबई  मोबाईल क्र. ९८९२८९०६६७ / ९१३७३०६६४८

16नागपुरसम्यक निवास सेवाभावी संस्था, सुधा राजनिवास प्लॉट क्रं १०७० वैशाली नगर,

नागपुर उत्तर ४४०१७ मोबाईल क्र. ७२१८७६७६२५ / ९५०३१९०७०३ / ९८३३२८०५३१

17नागपूरयुक्ती मल्टीपर्पज सोसायटी, तनिष्क नर्सिंग स्कूल, भगवान नगर,

नागपूर  मोबाईल क्र. ९५०३५२८७३६ / ९५१८७४४९३३ / ७३८७१७३११८

18नाशिकभरारी बहु उद्देशीय सेवाभावी संस्था, N- ९, H – ३ १/१, राम कुन्हे सरांचे घर (साई कृपा क्लासेस)

हरेश्वर मंदिराजवळ, महाराणा प्रताप चौक, सिडको नाशिक मोबाईल क्र. ९७६५८५२५७४ / ८६९८८०१०७८ / ९५०३४५५१४९.

19नाशिकप्रबोधन बहुउद्देशीय संस्था, संचलित स्पेक्ट्रम अकॅडमी, दुसरा मजला, बडनगरे भवन,

सर्कल सिनेमा समोर, अशोक स्तंभाजवळ, नाशिक. मोबाईल क्र. ०२५३२३१८८९४ / ९२२५१२९६८१

20उस्मानाबादडॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, व्हिजन करिअर अॅकडमी,

सेंट्रल बिल्डींग समोर, बार्शी बायपास रोड, संभाजी नगर,

उस्मानाबाद मोबाईल क्र. ९०११६३५५९६ / ९९२२५७०८४४

21पालघरगॉड फादर सेवाभावी बहुउद्देशीय शिक्षण संस्था, शॉप नं. १२९ ते १३२,

भास्कर कमर्शियल बिल्डींग प्लॅट फॉर्म नं. १ रेल्वे स्टेशन विराट नगर, विराट वेस्ट,

पालघर ४०१३०३ ) मोबाईल क्र. ९७६८९९८१९४ / ९७६७३७४३५१

22परभणीसंबोधी अकादमी संचलित स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र, सी/ओ संबोधी विद्यालय,

धार रोड, परभणी. मोबाईल क्र. ९९२२२४०६८५ / ७७४१०९२९७८

23परभणीउदयलक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट, संचलित उदयलक्ष्मी स्पर्धा प्रशिक्षण केंद्र, जुनापेडगाव रोड,

SBI बँके जवळ, जुना पेडगाव रोड, ता. जि. परभणी मोबाईल क्र. ९८२२९४४३४७ / ८६००७११०१०

24पुणेत्रैलोक्य बौध्द महासंघ सहाय्यक गण, संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र,

८५ अ धम्मचक्र प्रवर्तन महाविहार, राजा हरिश्चंद्र रोड, दापोडी,

पुणे. मोबाईल क्र. ८५५१००७२३३ / ९८२३०९९१०३ / ९०४९५१८०४३

25नवी मुंबईअनुसूचित जाती जमाती शिक्षण संस्था, ए.ई. जी अॅकेडमी हॉल नं. ००१, विक्रम टॉवर,

प्लॉट नं. २, सेक्टर १० कामोठे नवी मुंबई. मोबाईल क्र. ८८३०९८८३९१

26रत्नागिरीसेवा सामाजिक विकास संस्था, शिर्के प्लाझा बिल्डींग, ३ रा मजला कलेक्टर ऑफिस समोर,

जयस्तंभ जवळ, रत्नागिरी, मोबाईल क्र. ८१४९१०९५७२ / ७८७५६९६८४५ / ८७९३३५३७६६

27साताराबहुजन हिताय शिक्षण संस्था, गुलाब कॉलनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनीक वाचनालयाच्या पाठी मागे.

राजर्षी शाहू मार्ग तथा १०० फुटी रोड, दक्षिण शिवाजीनगर,

सांगली मोबाईल क्र. ९८९००११४३५ / ९९६०३०४४८२ / ०२३३-२३२०७९९

28साताराप्रथम इन्फोटेक फाऊंडेशन, पेस प्रशिक्षण केंद्र, लाहोटी कॉम्प्लेक्स, राधिकारोड, कदम पेट्रोल पंपाजवळ,

सातारा. मोबाईल क्र. ९५०३७२६१९३ / ८७८८५३०३९७ / ८८८८४८३३५०

29वर्धाभारतीय सामाजिक बहुउद्देशीय विकास संस्था, गजानन सायकल स्टोअर्स जवळ, ICICI एटीएम च्या समोर.

रामनगर, वर्धा मो. क्र. ८९५६३११६८९

30वाशिमप्रसंग मागासवर्गीय समाज कल्याण संस्था, डांगे कॉम्प्लेक्स, योजना पार्क जवळ, पंचायत समितीच्या पाठी मागे,

सिविल लाईन, ता. जि. वाशिम, मोबाईल क्र.- ९७६५७०६६२८ / ९४०३२२०३५९

संपर्क:

अधिकृत संकेतस्थळ: https://barti.in/

फोन नंबर: ०२०-२६३३३३३०, २६३३३३३९, २६३४३६००.

ईमेल: dg@barti.in

हेही वाचा – सेवा प्रवेश नियमानुसार टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक असलेल्या परीक्षांकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी लागू

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.