वृत्त विशेषकृषी योजना

पीक कर्ज योजना 2021 – आता शेतकऱ्यांना थेट 3 लाखांचे 6% व्याजाने पीक कर्ज मिळणार

महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना ६% व्याज दराने अल्प मुदत पीक कर्ज पुरवठा होण्यासाठी शासकीय अर्थसहाय्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयानुसार, केंद्र शासनाचे धोरणानुसार बँका ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना ७% व्याज दराने कर्ज पुरवठा करणार आहेत, त्या ठिकाणी बँकांनी ७% ऐवजी शेतकऱ्यांना ६% व्याज दराने कर्ज पुरवठा करावा, असे राज्य शासनाचे धोरण आहे. या प्रयोजनासाठी १% व्याज फरकाच्या रकमेचा आर्थिक भार शासनावर आहे. सन २००६-०७ पासून खरीप व रब्बी हंगामामध्ये राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका व सन २०१३-१४ पासून शेतकऱ्यांना रुपये ३.०० लाखापर्यंत अल्प मुदत पीक कर्ज वाटप करणाऱ्या खाजगी बँकांना या निर्णयाचा लाभ देण्यात येणार आहे.

पीक कर्ज योजना 2021 – 3 लाखांचे 6% व्याजाने पीककर्ज:

राज्य शासनाच्या धोरणास अनुसरून शेतकऱ्यांना अल्प मुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी १ टक्का दराने अर्थसहाय्य योजनेअंतर्गत संदर्भ क्र. ३ व ४ अन्वये अर्थसंकल्पीय तरतुदीच्या ३५ % निधी नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेने संदर्भ क्र. ५ व संदर्भ क्र. ८ अन्वये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर निधी वजा जाता उर्वरित निधी मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

सन 2020-21 वर्षात शेतकऱ्यांना अल्प मुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी 1 टक्का व्याज दराने अर्थसहाय्य (2425 1501)-33 अर्थसहाय्य खाली सुधारीत अंदाजाच्या 100% निधी नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेने वितरित करून खर्च करण्यास सं.क्र.7 अन्वये मान्यता दर्शवण्यात आली आहे. त्यास अनुसरून सुधारित अंदाजानुसार रू.5000.00 लाख निधी वितरीत करण्यास नियोजन व वित्त विभागाने मान्यता दर्शविली आहे. तथापि, त्यापैकी रू. 3500.00 लाख निधी सं.क्र.५. व सं.क्र. ८ अन्वये वितरित करण्यात आला असल्यामुळे रू.1500.00 लाख (रुपये पंधरा कोटी फक्त) एवढ्या निधीचे वितरण करून या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

पीक कर्ज योजना नियम:

वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र. संकीर्ण -2016/प्र.क्र.31/कोषा प्रशा-5, दिनांक 10/05/2016 अन्वयेच्या परिच्छेद “अ” नुसार या प्रकरणीची माहिती खालीलप्रमाणे आहे :-

(१ ) विभागास प्रदान वित्तीय अधिकार :- वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र.अर्थसं-2020/प्र.क्र.64/अर्थ-3, दिनांक 15/03/2021 अन्वये उपरोक्त बाबीखालील 100 टक्के रक्कम नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेने खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली असून सदर परिपत्रकातील तपासणी सूचीप्रमाणे सर्व बाबींची सदर प्रकरणी पूर्तता होणार आहे.

(2) मंजूर निधी :या योजनेच्या लेखाशिर्षाखाली सन 2020-21 या वित्तीय वर्षासाठी रुपये 5000.00 लाख इतका निधी अर्थसंकल्पित झालेला आहे.

(3) मागील 3 महिन्यापूर्वी निधी वाटप करण्यात आलेले आहे. तथापि, दिलेल्या अनुदानांपैकी 75% किंवा अधिक निधी खर्च झाला नाही.

(4) ज्या लेखाशिर्षाखाली अनुदान वितरीत करण्यात येत आहे त्या लेखाशीर्षांतंर्गत 1 वर्षांपासूनचे संक्षिप्त देयक प्रलंबित नाही. :- या योजनेखाली देयकांची संक्षिप्त देयके पारित होत नाहीत.

5) स्थानिक स्वराज्य संस्थांना अनुदान देताना त्यांचेकडून राज्य शासनास येणे नाही किंवा येणे रक्कम समायोजित करण्यात आली आहे :- लागू नाही.

(6) वैयक्तिक लाभार्थीचे देयक सादर करताना यादीसह व शक्यतो आधार क्रमांकासह सादर करावे :- या योजनेअंतर्गत बँका लाभार्थी आहेत.

(7) बांधकाम विषयक प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देताना सक्षम अधिकाऱ्याची मान्यता घेतल्याचा उल्लेख आदेशात करावा. :- लागू नाही.

(8) खरेदीविषयक प्रक्रिया अद्ययावत संबंधित शासन आदेशानुसार करावी व तसा उल्लेख प्रशासकीय मान्यतेत असावा. :- लागू नाही.

(9) साहित्य खरेदीची रक्कम पुरवठादाराच्या नावे ECS द्वारे आहरित करावी. लागू नाही.

सदर तरतूद संबंधित संस्थाना अदा करण्यासाठी V0004- सहायक निबंधक ( अर्थसंकल्प आणि नियोजन ) आयुक्त, सहकार, पुणे याना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. तसेच लेखाधिकारी, अधीन सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे याना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. सदर निधी आहरण करून हा खर्च किती वेळेत होईल हे सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे पाहणार आहेत. तसेच याबाबतचा अहवाल व विकास मंडळनिहाय खर्चाची माहिती वेळो वेळी शासनास पाठवली जाणार आहे.

सदरहू रक्कम मागणी क्र.व्ही – 2 मुख्यलेखाशिर्ष ” 2425 सहकार – (107), सहकारी पत संस्थाना सहाय्य (01) (10) -शेतकऱ्यांना अल्पमुदती पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी १ % व्याज दराने अर्थसहाय्य. ( कार्यक्रम ) ( दत्तमत ) (24251501) 33, अर्थसहाय्य “, या लेखाशिर्षाखालील सन 2020-21 या वर्षासाठी उपलब्ध असलेल्या तरतुदींमधून सदर रक्कम खर्च करण्यात येणार आहे.

पीक कर्ज योजना 2021 चा शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.