वृत्त विशेष

संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळातर्फे बीज भांडवल अनुदान योजना !

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित (Lidcom), या संस्थेच्या अनुदान आणि बीजभांडवल योजनेच्या अनुदानासाठी चर्मकार समाजातील बेरोजगार युवक-युवतींनी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. या योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविल्या जातात. अनुदान योजना आणि बीजभांडवल योजना कर्ज प्रस्तावाचे अर्ज वाटप करण्यात येणार आहेत. अर्ज स्विकृती कार्यालयीन वेळेत करण्यात येईल, इच्छुकांनी अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळातर्फे बीज भांडवल अनुदान योजना ! Lidcom:

चर्मकार समाजांतर्गत असणाऱ्या चांभार, मोची, ढोर, होलार या समाजातील लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच अर्जदाराने महामंडळाच्या नियमांप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन तीन प्रतीत महामंडळाच्या कार्यालयात स्वत: अर्जदाराने मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहून अर्ज दाखल करावेत. त्रयस्थ अथवा मध्यस्थांमार्फत कर्ज प्रकरणे स्वीकारण्यात येणार नाहीत.

आवश्यक कागदपत्रे:

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत विविध (LIDCOM Loan scheme) कर्ज योजनेसाठी अर्ज करताना अर्जदारांनी पुढील कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत.

  • जातीचा दाखला (सक्षम प्राधिकारी यांच्याकडून घेतलेला असावा).
  • अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला.
  • चालू वर्षाचा (तहसीलदार यांच्याकडून घेतलेला असावा),
  • नुकताच काढलेल्या पासपोर्ट साईज फोटो तीन प्रती जोडाव्यात,
  • अर्जदाराचा शैक्षणिक दाखला,
  • रेशनकार्ड झेरॉक्स प्रत,
  • ओळखपत्र-आधार कार्ड,
  • मतदान कार्ड,
  • पॅनकार्ड प्रत,
  • व्यवसायाचे दरपत्रक (कोटेशन).,
  • व्यवसाय ज्या ठिकाणी करायचे आहे त्या जागेची भाडेपावती/करारपत्रे किंवा मालकी हक्काचा पुरावा (नमुना नं. 8),
  • वीजबिल,
  • टॅक्स पावती इ,
  • बीजभांडवल योजनेसाठी प्रकल्प अहवाल व दोन सक्षम जामीनदार,
  • वाहनासाठी लायसन्स,
  • बॅच परवाना,
  • व्यवसायाचे ग्रा.पं./न.पा. यांचे नाहरकत प्रमाणपत्र,
  • व्यवसायाचे तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला,
  • अनुदान न घेतल्याबाबत प्रतिज्ञापत्रावरील कागदपत्रे स्वयंसाक्षांकित करुन घोषणापत्र.

योजनेसाठी अटी:

१) या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा चर्मकार समाजातील (चांभार, ढोर, होलार, मोची) असावा.

२) अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

कार्यालयीन वेळेत जिल्हा कार्यालय, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ (Lidcom) मर्यादित, गव्हर्नमेंट लेदर वर्किंर्ग स्कूल कंपाऊंड, खेरवाडी, बांद्रा (पूर्व), मुंबई-400 051 या ठिकाणी स्विकारले जातील.

मुंबई शहर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील चांभार, मोची, ढोर, होलार या समाजातील बेरोजगार युवक युवतींना तसेच होतकरु गरजू अर्जदारांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक, मुंबई शहर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत अनुदान योजना

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.