महाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसहकार पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

एफ.आर.पी. प्रमाणे गाळप हंगाम 2023-24 साठी ऊसदर धोरण

केंद्र शासनाने दिनांक ०६/०७/२०२३ रोजीच्या अधिसूचनेद्वारे, गाळप हंगाम २०२३-२४ साठीचा किमान एफआरपी ऊसदर प्रसिध्द केलेला आहे. सदर अधिसूचनेद्वारे जाहिर केलेला ऊस दर विचारात घेता, गाळप हंगाम २०२२-२३ साठी जाहिर केलेल्या एफआरपी ऊसदरात बदल झालेला आहे. सदर बदल आणि त्यासंदर्भातील दिनांक २१/०२/२०२२ रोजीच्या शासन निर्णयातील निर्देश विचारात घेता, २०२३-२४ हंगामाचा अंतिम साखर उतारा निश्चित होईपर्यंत, हंगाम सुरू झाल्यापासून गाळप केलेल्या ऊसासाठी सुरूवातीचा किमान एफआरपी ऊसदर निश्चित करताना आधारभूत धरावयाचा किमान साखर उतारा निश्चित करणे आवश्यक असल्याने शासनाने त्याबाबत खालीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे.

एफ.आर.पी. प्रमाणे गाळप हंगाम 2023-24 साठी ऊसदर धोरण शासन निर्णय :-

गाळप हंगाम २०२३-२४ व त्यापुढील हंगामाचा अंतिम साखर उतारा निश्चित होईपर्यंत, हंगाम सुरू झाल्यापासुन गाळप केलेल्या ऊसासाठी सुरूवातीचा किमान एफआरपी ऊसदर अदा करताना आधारभूत धरावयाचा साखर उतारा महसूल विभागनिहाय पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आलेला आहे.

अ.क्र. महसुल विभागाचे नाव हंगामाचा अंतिम साखर उतारा निश्चित होईपर्यंत एफआरपी ऊस दर अदा करण्यासाठी आधारभूत धरावयाचा साखर उतारा
पुणे व नाशिक १०.२५%
छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर ९.५०%

वरीलप्रमाणे आधारभूत साखर उतारा विचारात घेऊन त्या त्या महसुल विभागातील साखर कारखान्यांनी केंद्र शासनाने सन २०२३-२४ च्या हंगामासाठी एफ. आर. पी. च्या धोरणात दि.०६/०७/२०२३ च्या अधिसूचनेद्वारे निश्चित केलेल्या मुलभूत एफ.आर.पी. दरानुसार हंगामाच्या सुरुवातीचा किमान एफ.आर.पी. ऊसदर खालीलप्रमाणे निश्चित करून ऊस (नियंत्रण) आदेश १९६६ मधील कलम ३ नुसार अदा करण्याची कार्यवाही करण्यात यावी.

१. हंगाम २०२३-२४ करीता बेसिक १०.२५% साखर उताऱ्यासाठी रास्त व किफायतशीर ऊसदर प्रति क्विंटल रू.३१५/-

२. साखर उतारा १०.२५% च्या वरील प्रत्येक ०.१% उतारा वाढीसाठी प्रिमियम दर रु.३.०७ प्रति क्विंटल

३. साखर उतारा १०.२५% पेक्षा कमी परंतु ९.५०% पेक्षा जास्त असलेल्या प्रकरणी, प्रत्येक ०.१% उतारा घटीसाठी रू. ३.०७ प्रति क्विंटल तथापि, साखर उतारा ९.५०% किंवा त्यापेक्षा कमी असल्यास रास्त व किफायतशीर ऊसदर रू.२९१.९७५ प्रति क्विंटल.

आधारभूत धरावयाचा किमान साखर उतारा यासह इतर सर्व धोरणात्मक बाबी ह्या दि. २१/०२/२०२२ रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे राहतील.

उपरोक्त आदेश गाळप हंगाम २०२३-२४ साठी पासुन लागू राहील.

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग शासन निर्णय: केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील साखर कारखान्यांनी एफ.आर.पी. प्रमाणे गाळप हंगाम 2023-24 साठी ऊसदर अदा करावयाचे धोरण शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी अनुदान योजना – Subsidy Scheme for Purchase of Sugarcane Cutting Machine

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.