वृत्त विशेष

Seed token machine : बियाणे टोकन यंत्रासाठी असा करा ऑनलाईन अर्ज

बियाणे टोकन यंत्र (Seed token machine) टोकन पद्धतीने बियाणे पेरणीसाठी छोट्या शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे. बियाणे टोकन यंत्रामुळे मका,सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल, कापूस, तूर, धने..इ बियाणे टोकन करता येते. यामध्ये एक मजुराने १ दिवसात २ एकरपर्यंत टोकन करणे शक्य होते. बियाणे टोकन यंत्रामुळे (Seed token machine) मजुरी,वेळ व बियाणे यांची बचत होण्यास मदत होते. दोन बियांमधील एकसमान अंतर, एका ठिकाणी १ बी, एका ठिकाणी २ किंवा ३ बिया टोकन करता येऊ शकतात. यामध्ये दोन बियामधील अंतर १३ से.मी.(५ इंच) ते २५ से.मी.(१० इंच) असते.

या टोकन यंत्राच्या सहाय्यने पेरणी करणे अगदी सोपे जाते. शिवाय ज्या ठिकाणी ट्रॅक्टर जात नाही बैल किंवा औत जात नाही अशा ठिकाणी अगदी एक माणूस आपल्या खांद्यावर हे बियाणे टोकन यंत्र घेवून चार पाच मजुरांचे काम अगदी काही तासांमध्ये करू शकतो.

मार्केटमध्ये या बियाणे टोकन यंत्राची किंमत ६५०० हजार रुपयांपर्यंत आहे परंतु महा dbt या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज केल्यास तुम्हाला शासनाकडून ५० टक्के सबसिडी मिळते. Samson या बियाणे टोकन यंत्राचा टेस्ट रिपोर्ट मिळत असल्याने तुम्ही अगदी शासकीय अनुदानावर देखील हे बियाणे टोकन यंत्र (Seed token machine) खरेदी करू शकता.

बियाणे टोकन यंत्रासाठी (Seed token machine) असा करा ऑनलाईन अर्ज:

 • गुगलमध्ये mahadbt farmer login करा.
 • Applicant login here अशी लिंक येईल त्या लिंकवर क्लिक करा.
 • येथे तुम्ही तुमचा युजर आयडी पासवर्ड टाकून लॉगीन करा किंवा तुमच्या आधार नंबर टाकून देखील तुम्ही लॉगीन करू शकता.
 • आधार नंबरला जो मोबाईल लिंक करण्यात आला आहे त्यावर एक otp येईल तो दिलेल्या चौकटीमध्ये टाका आणि otp तपासा या बटनावर क्लिक करा.
 • अर्ज करा अशी लिंक शोधून त्यावर क्लिक करा.
 • कृषी यांत्रिकीकरण या पर्यायासमोर दिसत असलेल्या बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करा.
 • या ठिकणी आता एक अर्ज ओपन होईल त्यामध्ये व्यवस्थित माहिती भरा जसे कि मुख्य घटक या चौकटीमध्ये क्लिक करून कृषी यंत्र औजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडा.
 • तपशील या चौकटीवर क्लिक करून मनुष्यचलीत औजारे हा पर्याय निवडा.
 • यंत्रसामग्री औजारे या पर्यायावर क्लिक करून टोकन यंत्र हा पर्याय निवडा.
 • योजनेच्या अटी आणि शर्थी मान्य करण्यासाठी दिलेल्या चौकटीमध्ये टिक करा.
 • जतन करा या बटनावर क्लिक करा.
 • योजनेला प्राधान्य क्रमांक द्या
 • तुम्हाला अजून काही अर्ज करायचे असेल तर yes या बटनावर करा नसेल तर No या बटनावर क्लिक करा. आपण फक्त टोकन यंत्रासाठी अर्ज करत आहोत त्यामुळे No या बटनावर क्लिक करणार आहोत.
 • अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा. सूचना वाचून घ्या आणि ओके या बटनावर क्लिक करा.
 • पहा या बटनावर क्लिक करा. या ठिकणी तुम्ही जर एकापेक्षा अनेक योजनांसाठी अर्ज केला असेल तर त्या योजनांना प्राधान्य क्रमांक द्यावा लागेल, तो देवून टाका.
 • योजनेच्या अटी आणि शर्थी मान्य करा आणि अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा.
 • बियाणे टोकन यंत्रासाठी तुम्हाला २३.६० एवढे शुल्क भरावे लागणार आहे त्यासाठी make payment या बटनावर क्लिक करा.
 • पेमेंट करण्याचा पर्याय निवडा.
 • proceed for payment या पर्यायावर क्लिक करा.
 • पेमेंट करण्याचे अनेक पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसेल तुम्हाला जो सोपा वाटेल तो पर्याय निवडून पेमेंट करा. शक्यतो क्यूआर कोड हा पर्याय पेमेंट करण्यासठी वापरा कारण तो अधिक सोपा आहे.
 • पेमेंटची पावती प्रिंट करून घ्या.

अशा पद्धतीने तुम्ही बियाणे टोकन यंत्रासाठी अर्ज यशस्वीपणे सादर केला आहे.

बियाणे टोकन यंत्राच्या (Seed token machine) अर्जाची सद्यस्थिती कशी पाहता येईल :

महा डीबीटीवर अर्ज सादर केल्यानंतर शासनाच्या वतीने दर हफ्त्याला लॉटरी पद्धतीने अर्ज निवडले जातात यामध्ये जर तुमच्या अर्जाची निवड झाली तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक संदेश येईल त्यानुसार पुढील कागदपत्रे अपलोड करून द्या.

तुम्हाला जर तुमच्या अर्जाची सद्यस्थिती बघायची असेल म्हणजेच अर्जाचे स्टेट्स बघायचे असेल तर मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावर क्लिक करा.

छाननी अंतर्गत अर्ज या पर्यायावर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अर्जाचे तपशील दिसेल. अर्जाची पोहोच पावती देखील तुम्ही डाउनलोड करू शकता.

अशा पद्धतीने तुम्ही बियाणे टोकन यंत्रासाठी (Seed token machine) अर्ज सादर करू शकता.

हेही वाचा –E-Peak Inspection : ई-पीक पाहणी मोबाईल ॲप वापरताना नेहमी उद्भवणाऱ्या प्रश्नांची उत्तरे

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.