महाराष्ट्र शासन निर्णय - GRआदिवासी विकास विभागवृत्त विशेषसरकारी योजना

महिला बचत गटांना शेळी गट वाटप !

आदिवासी बांधवांची उपजीविका पावसावर आधारित शेती असल्यामुळे प्रत्येक वर्षी शेतीच्या माध्यमातून निश्चित उत्पन्न मिळेल याची हमी नसते. शेतीबरोबरच शेतीशी निगडीत बकरीपालन हा जोडधंदा केल्यास त्यांना निश्चित उत्पन्नाची हमी मिळू शकेल व या व्यवसायाशी मुख्यत्वे महिला वर्ग निगडीत असल्याने महिला बचत गटांना १० शेळी व १ बोकड यांचे युनिट देण्याच्या हेतुने शासन निर्णयान्वये मार्गदर्शक सुचनांना मान्यता देणेत आली आहे. सदर मार्गदर्शक सुचनांमंध्ये सुधारणा करण्याची विनंती आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी केली आहे. सदर अनुषंगाने कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सुचना सुधारित करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

महिला बचत गटांना शेळी गट वाटप – Distribution of goat groups to women self-help groups

बकरीपालनाच्या माध्यमातून महिला बचत गटांचे उत्पन्न वाढून बचत गटांचे बळकटीकरण करणे, त्यांचे स्थलांतर कमी करणे या कार्यक्रमाअंतर्गत मंजूर “Supply of Goat Units to Women SHGS (१० Female+ 9 Male) या रु ५००.०० लक्ष इतक्या किंमतीच्या योजनेच्या मार्गदर्शक सुचनांबाबत निर्गमित करणेत आलेल्या शासन निर्णयांसोबतच्या परिशिष्ट १ मधील मुद्दा क्रमांक २, ३, ८ व ९ मध्ये या निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट क्रमांक १ मध्ये नमुद केल्याप्रमाणे सुधारणा करण्यास मंजूरी प्रदान करण्यात येत आहे. उपरोक्त मुद्यांव्यतिरिक्तचे मुद्दे व उपरोक्त मुद्यांमधील २ व ८ मधील अन्य उपमुद्द्यांमध्ये कोणताही बदल करणेत आलेला नाही.

सदर मार्गदर्शक सूचनांनुसार वितरीत तरतूदींच्या मर्यादेत योजना राबविण्याबाबत त्वरीत कार्यवाही आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी करावी व त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र आर्थिक व भौतिक अहवालासह शासनास सादर करण्याची दक्षता घ्यावी.

सन २०१४-१५ मधील विशेष केंद्रिय सहाय्य अंतर्गत मंजूर योजना:

1योजनेतील लाभार्थी / युनिट संख्याएकुण लाभार्थी ४८२ ऐवजी निवड झालेल्या लाभार्थ्यांना पुरविण्यात येणा-या शेळीगटांच्या (उस्मानाबादी/ संगमनेरी अथवा स्थानिक) जातींना अनुज्ञेय असणाऱ्या रक्कमेवर लाभार्थी संख्या ठरेल. तथापि लाभार्थी संख्या ४८२ पेक्षा कमी नसेल. होणाऱ्या बचतीच्या प्रमाणात अधिकचा लक्षांक आयुक्त, आदिवासी विकास हे ठरवतील.
2योजनेसाठी येणाऱ्या खर्चाचे सविस्तर अंदाजपत्रककार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांच्या भौगोलिक क्षेत्रानुसार उस्मानाबादी/ संगमनेरी किंवा स्थानिक जातीचे शेळीगट पुरवण्यात येईल.

अ. क्रतपशिलदर(१० शेळया)/(१ बोकड) रक्कम (रु.)
1शेळया खरेदी₹.8000/- प्रती शेळी (उस्मानाबादी/ संगमनेरी जातीच्या पैदास सक्षम शेळया)₹.80,000/- (१० शेळया)
₹.6000/- प्रती शेळी (अन्य स्थानिक जातीच्या पैदास सक्षम शेळया)₹.60,000/- (१० शेळया)
2बोकड खरेदी₹.१०,०००/- (उस्मानाबादी/ संगमनेरी जातीचा नर)₹१०,०००/- (१ बोकड)
₹८,०००/- (अन्य स्थानिक जातीचा नर)₹8,०००/- (१ बोकड)
3शेळया व बोकडाचा विमा /(३ वर्षासाठी)12.75% (अधिक 18% वस्तू व सेवाकर)रु.१३,५४५/- (उस्मानाबादी/ संगमनेरी जातीसाठी)
रु.१०,२३१/- (अन्य स्थानिक जातीसाठी)
एकुण खर्च :-(उस्मानाबादी/ संगमनेरी जातीसाठी)रु. १,०३,५४५/-
(अन्य स्थानिक जातीसाठी)रु. ७८,२३१/-
3योजना राबविण्याची कार्यपद्धतीलाभार्थ्यांकडुन उस्मानाबादी/ संगमनेरी जातीच्या पैदासक्षम शेळया/बोकडाची खरेदी प्राधान्याने अधिकृत बाजारातुन करण्यात येईल.

ऐवजी

लाभार्थ्यांकडुन उस्मानाबादी/ संगमनेरी किंवा स्थानिक जातीच्या पैदासक्षम शेळया/ बोकडाची खरेदी प्राधान्याने अधिकृत बाजारातुन करण्यात येईल.

  • खरेदी केल्या नंतर शेळ्यांचा विमा उतरवणे बंधनकारक राहील.

ऐवजी

  • शेळी गटाचा विमा स्थानिक कंपनीकडुन प्रकल्प अधिकारी यांचे नावे काढण्यात यावा व सहअर्जदार म्हणुन लाभार्थी यांचे नाव लावण्यात यावे.
  • खरेदी शक्यतो एकाच वेळी करावी.

ऐवजी

  • सर्व लाभार्थ्यांकरिता शेळीगटाची खरेदी एकाच वेळी करणे शक्य नसल्यास किमान एका प्रकल्प कार्यालयातील लाभार्थ्यांकरिता शेळीगटाची खरेदी एकावेळी करण्यात यावी व तेही शक्य न झाल्यास तालुकानिहाय शेळीगट खरेदी करण्यात यावेत.
  • लाभार्थ्यांना शेळी गटाचे वाटप करण्यासाठी नजीकची शाळा किंवा अन्य सार्वजनिक ठिकाण याची निवड करण्यात यावी. सदर ठिकाणाहुन लाभार्थ्यांने स्वखर्चाने वाहतुक करावयाची आहे.
4निधी वितरण कार्यपद्धती
  • कार्यक्रमाचा संपुर्ण निधी रु. ५००.०० लक्ष महामंडळास वर्ग करणेत यावा.
  • महामंडळाने सुरवातीला ४८२ लाभार्थ्यांना कार्यक्रमाचा लाभ द्यावा. स्थानिक जातीच्या शेळीगटाचा पुरवठा केल्यामुळे बचत होणाऱ्या निधीच्या प्रमाणात आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्याकडुन अधिकचा लक्षांक प्राप्त करुन त्याप्रमाणे लाभार्थ्यास लाभ द्यावा.
  • निधी विनावापर बराच कालावधी राहु नये याकरिता आयुक्त, कार्यालयाने निधी वितरीत केल्यानंतर व लाभार्थ्यांची यादी सादर केल्यानंतर वाजवी कालावधीत महामंडळाने लाभार्थ्यांना कार्यक्रमाचा लाभ द्यावा.
  • महामंडळाने योजनेच्या अटी शर्तीनुसार लाभार्थी महिला बचत गटास शेळी/ बोकड यांचा पुरवठा करुन छायाचित्रांसह अहवाल, शेळी/ बोकड वाटपाची बचत गट निहाय पोच पावती, योजनेच्या फलनिष्पतीबाबत अहवाल व उपयोगिता प्रमाणपत्र आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना सादर करावा.

आदिवासी विकास विभाग शासन निर्णय : विशेष केंद्रीय सहाय्य योजने अंतर्गत “महिला बचत गटांना शेळी युनिट पुरवठा करणे (Supply of Goat Units to Women SHGS (10 Female+ 1 Male)” या योजनेच्या मार्गदर्शक सुचनांना मंजुरी देणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM) ; शेळी-मेंढी, कुक्कुट, वराह पालन व वैरण बियाणे उत्पादनाकरीता योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा – National Livestock Mission

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.