आपले सरकार - महा-ऑनलाईनजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेष

आपले सरकार सेवा केंद्र – महा ई सेवा केंद्र बुलढाणा जिल्ह्यासाठी अर्ज सुरू, पहा अटी शर्ती – Aapale Sarkar Seva Kendra Buldana District

मला मा. जिल्हाधिकारी, बुलढाणा यांचे आदेश क्रमांक/डीआयटी/सेतू/कावि/ 421/2023 दिनांक 07/11/2023 अन्वये प्राप्त झालेल्या शक्तीचा वापर करुन बुलडाणा जिल्हयामध्ये आज रोजी 645 आपले सरकार सेवा केंद्र कार्यरत असून 434 आपले सरकार सेवा केंद्राची निवड प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.

आपले सरकार सेवा केंद्र – महा ई सेवा केंद्र बुलढाणा जिल्ह्यासाठी अर्ज सुरू, पहा अटी शर्ती – Aapale Sarkar Seva Kendra Buldana District:

बुलडाणा जिल्हयाची लोकसंख्या लक्षात घेता सदर आपले सरकार सेवा केंद्र कमी पडत असल्यामुळे नविन 120 आपले सरकार सेवा (महा ई सेवा) केंद्र स्थापन करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. या सोबत रिक्त आपले सरकार सेवा केंद्रांची यादी व अर्जाचा नमुना प्रसिध्द करण्यात येत असुन तरी इंच्छुक सुशिक्षीत बेरोजगार उमेदवार यांनी सदर अर्जाचा नमुना डाउनलोड करुन दिनांक 20/11/2023 ते दिनांक 05/12/2023 रोजी दुपारी 5.00 पर्यंत या कालावधीमध्ये (सुटीचे दिवस वगळता) सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत या वेळामध्ये सेतु विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा येथे या सोबत देण्यात आलेल्या नमुन्यामध्ये अर्ज सादर करावा. दिनांक 20/11/2023 रोजीचे पुर्वीचे व दिनांक 05/12/2023 रोजीचे नंतरचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही याची नोंद घ्यावी. वरिल प्रक्रियेबाबतच्या अटी व शर्ती पुढिलप्रमाणे आहेत.

अटी व शर्ती

1) उमेदवार हा CSC केंद्रधारक असावा किंवा किमान तो CSC केंद्र धारण करण्यास तो पात्र असावा.

2) CSC केंद्र धारकाला प्रथम प्राधान्य देण्यात येईल.

3) CSC केंद्रधारक उमेदवार ज्या आपले सरकार सेवा केंद्राकरिता अर्ज करित असेल त्या गावात CSC चे केंद्र असणे बंधनकारक आहे.

4) CSC केंद्राचे लोकेशन बाबत जिल्हा व्यवस्थापक, सी.एस.सी. बुलढाणा यांचेकडून प्राप्त अहवाल ग्राह्य धरला जाईल, सदर अहवालानुसार CSC चे Village location ग्राह्य धरले जाईल. location बाबत समितीचा निर्णय अंतिम राहील.

5) एका उमेदवाराला एका पेक्षा जास्त आपले सरकार केंद्रासाठी अर्ज करता येणार नाही त्याचे ज्या गावामध्ये किंवा वार्डामध्ये CSC केंद्र आहे त्याच ठिकाणाचा अर्ज ग्राह्य धरण्यात येईल.

6) यासोबत तालुका निहाय यादी प्रसिध्द करण्यात येत आहे त्यानुसार अर्ज स्विकारण्यात येतील.

7) CSC केंद्रधारक उमेदवाराचे एका केंद्राकरिता एका पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्यांचे मागिल दोन वर्षाचे ट्रान्झेक्शन विचारात घेऊन ज्या CSC केंद्र धारकाचे सर्वाधीक ट्रान्झेक्शन असतील त्यांना नियुक्ती देण्यात येईल.

8) CSC केंद्रधारक उमेदवारा व्यतिरिक्त इतर उमेदवार यांना एकापेक्षा जास्त केंद्रासाठी अर्ज करता येनार नाही. ते ज्या गावाचे रहिवासी असतील त्याच केंद्राकरीता अर्ज करता येईल. जर नमूद केंद्र गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असेल तर सदर गट ग्रामपंचायत चा कोणत्याही गावाचा रहिवासी पात्र धरला जाईल. तसेच CSC केंद्रधारक उमेदवारा व्यतिरिक्त इतर उमेदवार यांचे एका केंद्राकरिता एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास गुणदान पद्धतीने निवड करण्यात येईल.

9) उमेदवाराकडे शॉप अॅक्ट लायसन किंवा ग्रामपंचायतचे ना हरकत प्रमाणपत्र (ग्रामिण भागासाठी) असणे आवश्यक आहे.

10) उमेदवाराकडे किमान 10 x 10 sq जागा असावी (मालकीची अथवा भाडेपटटयाची)

11) उमेदवाराकडे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. (संबंधीत पोलीस स्टेशन/ पोलीस पाटील)

12) केंद्र मिळविण्यासाठी कुठल्याही प्रकारचा दबाव आणल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीत उमेदवाराचा मुळ अर्ज रदद करण्यात येईल.

13) अर्जामध्ये नमुद केलेले सर्व मूळ कागदपत्रे पडताळणी करतेवेळी उमेदवारास सोबत आणणे बंधनकारक आहे.

14) संगणक अहर्तेकरिता उमेदवाराकडे एम.एस.सी.आय. टी. प्रमाणपत्र, ट्रिपल सी. प्रमाणपत्र, डी.ओ.ई.ए.सी.सी. प्रमाणपत्र, बी.एस.सी.कॉम्पुटर सायन्स, एम. एस. सी. कॉम्पुटर सायन्स व कॉम्पुटर सायन्स हा विषय घेतलेली डिग्री यापैकी एक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

15) अर्जदार हा शासकीय / निमशासकीय कार्यालयात कार्यरत नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

16) आपले सरकार सेवा केंद्र यांची संख्या कमी किंवा जास्त करण्याचे अधिकार मा. जिल्हाधिकारी यांनी राखून ठेवलेले आहेत.

17) वेळोवेळी आवश्यक त्या सुचना www.buldhana.nic.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येतील त्या सुचना बघण्याची व त्यानूसार कार्यवाही करण्याची जबाबदारी उमेदवारांची असेल.

1. शैक्षणिक अहर्ता

1. पदवीत्तर पदवी / पोस्ट ग्रॅज्युएशन

2. पदवी / Graduation

3. एच.एस.सी./पदविका

4. एस. एस. सी.

2. संगणक अहर्ता

एम.एस.सी.आय.टी. प्रमाणपत्र, ट्रिपल सी. प्रमाणपत्र, डी.ओ.ई.ए.सी.सी. प्रमाणपत्र बी.एस.सी. कॉम्पुटर सायन्स, एम.एस.सी. कॉम्पुटर सायन्स व कॉम्पुटर सायन्स हा विषय घेतलेली डिग्री यापैकी एक प्रमाणपत्र

आपले सरकार सेवा केंद्राच्या कागदपत्रे पडताळणी करिता या कार्यालयाकडून बोलाविण्यात आल्यास सोबत येतांना आणावयाचे आवश्यक मूळ कागदपत्रे व त्याच्या एक छायाप्रत :-

आपले सरकार सेवा केंद्राच्या कागदपत्रे पडताळणी करिता या कार्यालयाकडून बोलाविण्यात आल्यास येतांना खालील दिलेले मूळ कागदपत्रे व त्याच्या एक छायाप्रत सोबत आणणे आवश्यक आहे.

1. पॅन कार्ड आणि आधार कार्ड.

2. शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे.

3. संगणक अहर्ता पूर्ण असल्याचे प्रमाणपत्र.

4. केंद्राची जागा स्वतः मालकीची असल्याबाबतचे ग्रामीण भागासाठी 7/12, 8 अ व शहरी भागासाठी Property Card सक्षम पुरावा अथवा भाडेतत्वावर असल्यास भाडे करारनामा ई तपशील नमूद असलेले प्रतिज्ञापत्र.

5. अर्जदार शासकीय अथवा निमशासकीय सेवेत कार्यरत नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र.

6. केंद्राच्या / दुकानाच्या संगणक साहित्यासह जागेचे फोटो (एक बाहेरील व दुसरा आतील भागेचा अर्जदारासह)

7. चारित्र पडताळणी प्रमाणपत्र संबधीत पोलीस स्टेशन यांचे सही शिक्क्यानिशी.

8. अर्जदार जर सीएससी (CSC) केंद्र चालक असेल तर सीएससी (CSC) केंद्र असल्याबाबतचे प्रमाणपत्र.

9. रहिवासी दाखला ( तलाठी / ग्रामसेवक / तहसीलदार)

10. Shop act Lincence किवा ग्रामपंचायत चे ना हरकत प्रमाणपत्र

11. जाहिरातीमधील अटी व शर्तीचे आवश्यक कागदपात्रांच्या छायाप्रती अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याचे कालावधी: दिनांक 20/11/2023 ते दिनांक 05/12/2023 रोजी दुपारी 5.00 पर्यंत या कालावधीमध्ये (सुटीचे दिवस वगळता) सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत या वेळामध्ये सेतु विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा येथे अर्ज सादर करावा.

जाहिरात (Notification) आणि अर्ज (Application Form): जाहिरात आणि अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट : अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – CSC सेंटर साठी असा करा ऑनलाईन नोंदणी अर्ज (Common Service Centres)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.