सरकारी कामेकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागकृषी योजनावृत्त विशेष

खरीप हंगामातील पीक पाहणी करण्याची सुविधा ई-पीक पाहणी मोबाईल ॲपवर उपलब्ध ! – E-Peek Pahani Kharif Season 2023-24

ई-पीक पाहणी मोबाईल ॲपच्या सहाय्याने सर्व खातेदार शेतकऱ्यानी तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या मोबाईलवरून आपल्या ७/१२ वर विविध पिकांची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे. महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१ पासून महाराष्ट्रात राज्यभर राबविण्यात येत आहे. या ॲपमध्ये आतापर्यंत सुमारे १.८८ कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यानी रेजिस्ट्रेशन केलेले आहे व आपल्या पिकांची नोंदणी केली आहे.

खरीप हंगाम २०२३ पीक पाहणी नोंदणीसाठी ई – पीक पाहणीचे २.०.११ हे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तरी सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नवीन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे. खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे पीक पाहणी करण्यासाठी ०१ जुलै २०२३ पासून सुरु करण्यात येत आहे.

तरी राज्यातील सर्व शेतकरी बंधु-भगिनींना अवाहन करण्यात येते कि त्यांनी खरीप हंगामा २०२३ साठी दिलेल्या कालावधीमध्ये आपली ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी जेणे करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास अडचण येणार नाही.

ई-पीक पाहणी ॲप डाउनलोड करा (E Peek Pahani App):

>

ई-पीक पाहणी ॲप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://play.google.com/store/apps/E-Peek Pahani App

हेही वाचा – ई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे पिकांची माहिती कशी नोंदवावी?

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.