कृषी योजनावृत्त विशेषसरकारी कामे

ई-पीक पाहणी च्या रब्बी हंगामाची मुदत आता १५ मार्च – E-Peek Pahani

ई -पीक पाहणी मोबाईल ॲपच्या साहाय्याने सर्व खातेदार शेतकरी तलाठ्याकडे न जाता आपल्या स्वतःच्या मोबाईल वरून आपल्या ७/१२ वर विविध पिकांची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे.

महसूल विभागाचा ई पीक नोंदणी प्रकल्प हा १५ ऑगस्टपासून महाराष्ट्रात राज्यभर राबविण्यात येत आहे. या ॲप द्वारे आता पर्यंत सुमारे १ कोटी पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ई – पिक पाहणी भ्रमणध्वनी ॲप द्वारे आपल्या पिकांची नोंदणी केली आहे.

सध्या रब्बी हंगामाच्या पीक पाहणीची कार्यवाही सुरु आहे. रब्बी हंगामाच्या पीक पाहणीच्या नोंदी साठी ई – पीक पाहणी चे 1.0.0.7 हे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करून दिले आहे. तरी सर्व खातेदार शेतकरी यांनी नवीन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे. रबी हंगामाच्या प्रत्यक्ष ई – पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी करण्यासाठी २८ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

राज्याच्या काही भागात कोरोना महामारी व उशिराच्या मान्सूनमुळे शेतकर्याना आपली पीक पाहणी पूर्ण करता आली नाही , याचा विचार करून मा. जमाबंदी आयुक्त यांचे मान्यतेने ई – पीक पाहणी मोबाईल ॲप द्वारे शेतकरी स्तरावरील पीक पाहणीची मुदत १५ मार्च २०२२ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तरी सर्व शेतकरी बंधूना आवाहन करण्यात येते की, त्यांनी रब्बी हंगाम २०२२ ची पीक पाहणी वाढीव मुदतीत म्हणजेच दिनांक १५ मार्च २०२२ पर्यंत ई – पीक पाहणी मोबाईल द्वारे पीक पाहणीची नोंदणी पूर्ण करावी.

ई-पीक पाहणी ॲप डाउनलोड करा (E Peek Pahani App):

ई-पीक पाहणी ॲप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://play.google.com/store/apps/E-Peek Pahani App

हेही वाचा – ई-पीक पाहणी ॲपद्वारे अशी करा ७/१२ वर पिकांची नोंदणी – E Peek Pahani Online Maharashtra

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.