कृषी योजनाजिल्हा परिषदतलाठी कार्यालय नोंदवह्यामहानगरपालिकामहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र जमीन महसूल कायदामहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेषसरकारी कामे

खरीप हंगाम 2022 ई-पीक पाहणीची अंतिम मुदत 22 ऑक्टोबर 2022 पर्यंत

सध्या खरीप 2022 हंगामाची पीक पहाणीची कार्यवाही सूरु आहे. खरीप हंगाम 2022 च्या ई-पीक पाहणीच्या नोंदणीसाठी ई-पीक पाहणी चे 2.0.4 हे अपडेटेड व्हर्जन गुगल प्लेस्टोअर वर उपलब्ध करुन दिले आहे. खरीप हंगाम 2022 ची ई-पीक पाहणी प्रत्यक्ष मोबाईल ॲपद्वारे करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2022 पर्यंत मुदत देण्यात आली होती.

खरीप हंगाम 2022 ई-पीक पाहणीची 22 ऑक्टोबर 2022 पर्यंत मुदतवाढ:

राज्याच्या काही भागात उशिराच्या मान्सूनमुळे काही शेतक-यांना अद्यापही आपली ई-पीक पाहणी पूर्ण करता आलेली नाही. याचा विचार करुन मा. जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख महाराष्ट्र राज्य, पुणे. यांचे मान्यतेने मोबाईल ॲपद्वारे शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीची कालमर्यादा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्याप्रमाणे खरीप हंगाम 2022 च्या शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणीची कालमर्यादा 22 ऑक्टोबर 2022 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरी खरीप हंगाम 2022 ची ई-पीक पाहणी करण्यासाठी ही अंतिम मुदतवाढ असल्याने, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पीक पाहणीची नोंद केलेली नाही, त्या शेतकऱ्यांनी आपली पीक पाहणी स्वत: ई-पीक पाहणी या मोबाईल ॲप द्वारे करून घ्यावी जेणेकरून शासकीय योजनांचा लाभ सर्वांना घेता येईल असे आवाहन ई-पीक पाहणी महाराष्ट्र राज्याचे राज्य समन्वयक श्री. श्रीरंग तांबे यांचे कडून करण्यात येत आहे.

>

तरी सर्व खातेदारांना आपले ई-पीक पाहणी मोबाईल ॲप अपडेट करून पीक पाहणीची नोंद करून घ्यावी. ई-पीक पाहणी ॲपवर वापरून शेतकरी आपल्या पिकांच्या नोंदी, बांधावरच्या झाडांच्या नोंदी, व चालू पड/कायम पड क्षेत्राच्या नोंदी अक्षांस व रेखांशासह नोंदविण्याची सोय देण्यात आलेली आहे.शेतातल्या पिकांची माहिती पीक पाहणी अपवर नोंदवल्यानंतर या माहितीचं पुढे काय होतं, यावर काय प्रक्रिया होतं? या प्रश्नावर ई-पीक पाहणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक श्रीरंग तांबे सांगतात, शेतकऱ्यांनी या अपवर पिकांची नोंद केल्यानंतर ती नोंद 48 तास कुठेही सातबाऱ्यावर पाठवत नाही. 48 तास ती नोंद दुरुस्तीसाठी दिलेले आहेत. मात्र त्यानंतर ही नोंद गाव नमुना बारावर प्रतिबिंबित करतो आणि मग ती गाव नमुना बारा वर दिसायला लागते.

हेही वाचा – ई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे पिकांची माहिती कशी नोंदवावी?

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.