फळ पीक विमा लाभार्थी यादी २०२०
सन २०२० मध्ये विविध नैसर्गिक आपत्ती मुळे नुकसान झालेल्या व क्लेम केलेल्या पात्र शेतकऱ्यांना AIC of India कडून विमा परतावा देण्यात आला आहे. विविध हवामान धोक्यांमुळे फळपिकाच्या उत्पादकतेवर विपरीत परीणाम होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादना मध्ये घट येते. पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षीत उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते. या सर्व बाबींचा विचार करुन शेतकऱ्यांना फळपिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणुन फळपीक विमा योजना राबविण्यात येते.
फळ पीक विमा लाभार्थी यादी २०२०:
फळ पिकविमा यादी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि AIC of India ची वेबसाईट ओपन करा.
https://www.aicofindia.com/AICEng/Pages/default.aspx
Aicofindia ची वेबसाईट ओपन झाल्यावर खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे “Our Business” या टॅब मध्ये “Business Profile – States/UTs” या पर्यायावर क्लिक करा.

पुढे आपल्या देशाचा नकाशा येईल त्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या नकाशावर क्लिक करा.

आता खालील विविध याद्या आपल्याला पाहायला मिळतील यामध्ये आपण इथे “LIST OF BENEFICIARY FARMERS ON AIC RWBCIS RABI 2019-20 ILA CLAIMS” अशी लिंक दिसेल तिच्यावर क्लिक करा.
त्या लिंक वर क्लिक केल्यावर विविध जिल्ह्यांची नावे दिसतील त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याच्या नावावर क्लिक करा, नंतर एक PDF फाईल ओपन होईल ती डाउनलोड करा. त्यामध्ये पीकविमा लाभार्थ्यांचे नाव पाहू शकता. जर तुमच्या मोबाईल मध्ये ती फाईल ओपन होत नसेल तर “WPS Office” हे ऍप इन्स्टॉल करून ती फाईल ओपन करा किंवा तुमच्या कॉम्पुटर मध्ये ती फाईल ओपन करा.
जिल्हानिहाय फळपीक विमा लाभार्थी यादी:
- अहमदनगर
- अकोला
- अमरावती
- बीड
- धुळे
- हिंगोली
- जळगाव
- जालना
- लातूर
- नांदेड
- नंदुरबार
- उस्मानाबाद
- पालघर
- पुणे
- सांगली
- सोलापूर
हेही वाचा – अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी २०२१
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!