वृत्त विशेषजिल्हा परिषदसरकारी योजना

गटई कामगारांना लोखंडी पत्र्याचे स्टॉल देण्यांची योजना सुरु – समाज कल्याण विभाग, हिंगोली

जिल्ह्यातील गटई कामगारांना उन, वारा, पाऊस यापासून संरक्षण मिळावे, त्यांचे आर्थिक व सामाजिक जीवन उंचवावे यासाठी संत रविदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ (Lidcom) व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना कार्यान्वित आहे.

गटई कामगारांना लोखंडी पत्र्याचे स्टॉल देण्यांची योजना:

आवश्यक कागदपत्रे:

सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी खालील कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे.

>
  1. उत्पन्नाचा दाखला
  2. जातीचे प्रमाणपत्र
  3. रेशन कार्ड
  4. आधार कार्ड
  5. रहिवाशी दाखला
  6. या योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र

वरील कागदपत्रासह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, हिंगोली यांच्याकडे दि. 20 जुलै, 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत.

तसेच यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करु नयेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी केले आहे.

संपर्क: सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, हिंगोली.

हेही वाचा – बांधकाम कामगार कल्याणकारी योजना आणि बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी कशी करायची जाणून घ्या सविस्तर

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.