वृत्त विशेषअन्‍न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीमहाराष्ट्र शासन निर्णय - GRसरकारी योजना

गौरी-गणपती उत्सवानिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा !

विभागाच्या संदर्भाधीन दि. २२.०८.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत राज्यातील लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी १ किलो या परिमाणात रवा, चनाडाळ, साखर व १ लिटर या परिमाणात खाद्यतेल हे शिधाजिन्नस समाविष्ट असलेले शिघाजिन्नस संच “आनंदाचा शिघा” गौरी-गणपती उत्सवानिमित्त १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत ई-पॉस प्रणालीद्वारे ₹ १००/- प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरीत करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

पात्र शिधापत्रिकाधारकांना शिधाजिन्नस संचांचे वितरण करण्याबाबत पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत :-

राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील एपीएल (केशरी) शेतकरी शिधापत्रिकाधारकांना १ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १ किलो साखर व १ लिटर खाद्यतेल या ४ शिधाजिन्नसांचा समावेश असलेला १ शिघाजिन्नस संच प्रति शिधापत्रिका ई-पॉस प्रणालीद्वारे प्रति संच र १००/- या दराने वितरीत करावेत.

जिल्हानिहाय पुरवठा करावयाच्या शिधाजिन्नस संचांच्या संख्येचे विवरणपत्र सोबत जोडलेले आहे. सदर संख्येच्या मर्यादेत केंद्रिय भांडार, मुंबई यांनी शिधाजिन्नस संच संबंधित तालुका गोदामांपर्यंत पोहोचवावेत.

गोदामात येणारी शिधाजिन्नस आवक तसेच रास्त भाव दुकानात पाठवण्यात येणारे शिधाजिन्नस यांची नोंद online पद्धतीनेच ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार AePDS पोर्टलवर योग्य त्या नोंदी घेण्याची दक्षता घ्यावी.

जिल्ह्याकरीता आवश्यक असणारे पुरवठादाराकडून प्राप्त होणारे शिधाजिन्नस तालुका गोदामांमध्ये व्यवस्थितरीत्या उतरवून घेण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी / अन्नधान्य वितरण अधिकारी/ उप नियंत्रक यांची राहील. शिघाजिन्नस उतरविण्याकरीता येणाऱ्या हमाली खर्चाचे प्रदान विभागाकडून करण्यात येईल. त्यानुषंगाने सदर देयके वित्तीय सल्लागार व उपसचिव यांना सादर करण्यात यावीत.

शिधाजिन्नस संचात समाविष्ट शिधाजिन्नस खराब न होण्याची/ खाण्यास अयोग्य होण्याची मुदत (expiry date) कमीतकमी ४ महिन्यांची असल्याची खात्री करूनच पुरवठादाराकडून शिघाजिन्नस संच स्विकारण्यात यावेत.

शिधाजिन्नस संचात समाविष्ट शिधाजिन्नस FSSAI मानकाची पूर्तता करीत असल्याचे NABL अधिकृत प्रयोगशाळेचे प्रमाणपत्र पुरवठादाराकडून प्राप्त करुन घेऊन तद्नंतरच शिधाजिन्नस संच स्विकारण्यात यावेत. कोणत्याही परिस्थितीत निकृष्ट दर्जाचे शिधाजिन्नस / शिधाजिन्नस संच स्वीकारले जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.

पुरवठादाराकडून तालुका गोदामात शिधाजिन्नस संच प्राप्त झाल्यावर, जिल्हा पुरवठा अधिकारी / अन्नधान्य वितरण अधिकारी/ उप नियंत्रक यांनी स्वत: अथवा तहसिलदार यांच्यापेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्याची नेमणूक करून शिधाजिन्नस संचाची पुरवठादाराच्या प्रतिनिधीसमोर यादृच्छिकपणे ( randomly) नमुने गोळा करावेत. सदर नमुन्यांची NABL अधिकृत प्रयोगशाळेत तपासणी करावी. सदर तपासणीअंती नमुना विहित निकषांची पुर्तता करीत नसल्याचे आढळल्यास, पुरवठादारास तात्काळ अवगत करून संबंधित शिधाजिन्नस संचाचा साठा (Lot) बदलून घेण्याबाबत कार्यवाही करावी.

सदर शिधाजिन्नस संच प्रति संच ₹१००/- या दराने वितरीत करावयाचे आहेत. सदर विक्रीपोटी प्राप्त होणारी रक्कम रास्तभाव दुकानदारांनी मार्जिन वजा करुन उर्वरित रक्कम जिल्हा पुरवठा अधिकारी / अन्नधान्य वितरण अधिकारी / उप नियंत्रक यांच्याकडे शिधाजिन्नस संचांच्या वितरणानंतर ७ दिवसांत जमा करावी. सदर शिधाजिन्नस संचांची विक्री करण्याकरिता संदर्भाधीन दिनांक ४ सप्टेंबर, २०१७ च्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार रास्तभाव दुकानदारांना मार्जिन देय राहील. तसेच शिघाजिन्नस संच वितरणाचा कालावधी विचारात घेता, एका महिन्याच्या कालावधीत संपूर्ण शिधाजिन्नस संचांचे वितरण करण्याबाबत रास्तभाव दुकानदारांना आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे.

जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना गौरी-गणपती उत्सवानिमित्त वितरीत करावयाच्या शिधाजिन्नस संच “आनंदाचा शिधा” योजनेचा लाभ सुनिश्चित करण्याकरीता, या योजनेबाबतची जनजागृती करण्याची कार्यवाही संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी / अन्नधान्य वितरण अधिकारी / उप नियंत्रक यांनी करावी.

जिल्हा पुरवठा अधिकारी / अन्नधान्य वितरण अधिकारी/ उप नियंत्रक यांनी त्यांच्या जिल्ह्याकरिता प्राप्त व वितरीत होणाऱ्या शिधाजिन्नस संचांची माहिती शासनास वेळोवेळी उपलब्ध करुन द्यावी व त्याबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करावे.

प्रस्तुत शिधाजिन्नस संचांच्या खरेदीसाठी केंद्रिय भांडार, मुंबई यांच्याशी करारनामा करण्याबाबत वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालयास विभागाचे पत्र क्र. अघापू-२०२३/प्र.क्र ४५/नापू-२२ दि.२३.०८.२०२३ अन्वये कळविण्यात आले आहे. त्यानुसार वित्तीय सल्लागार व उपसचिव यांनी कार्यवाही करावी.

केंद्रिय भांडार, मुंबई यांनी शासनास पुढील मुद्द्याबाबतची माहिती दररोज napu२२.mhpds@mah.gov.in या ई-मेल वर तसेच वित्तीय सल्लागार व उपसचिव यांना सादर करावी :-

अ) शासनाने विहीत केलेल्या ठिकाणी (ठिकाणांच्या नावांसह) पोहोच केलेले शिधाजिन्नस संच.

ब) निविदाधारकाकडे / केंद्रिय भांडार, मुंबई यांच्याकडे शिल्लक राहिलेले शिधाजिन्नस संच.

उपरोक्त कार्यपद्धतीनुसार सर्व संबंधितांनी कार्यवाही करावी. सदर कार्यवाहीमध्ये कोणत्याही प्रकारे कसूर झाल्यास संबंधितांना जबाबदार धरण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन निर्णय : सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना गौरी-गणपती उत्सवानिमित्त चार शिधाजिन्नस समाविष्ट असलेला शिधाजिन्नस संच आनंदाचा शिधा वितरण करण्याबाबतची कार्यपद्धती शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – मंत्रिमंडळ निर्णय महाराष्ट्र शासन (दि. १८ ऑगस्ट २०२३) – Cabinet Decision

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.