ग्रामपंचायतीच्या सर्व सभांच्या सुचना व इतिवृत्त नोंदवही बाबत शासन नियम
राज्यातील ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण करण्यासाठी ग्रामपंचायतींना जास्तीत जास्त अधिकार देण्याचे शासनाचे धोरण आहे. ग्रामपंचायत क्षेत्रातील विविध योजनांची/विकास कामे/धोरणे ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा/मासिक सभा/महिला सभा/वॉर्ड सभा/विविध समित्यांच्या बैठका यांच्या माध्यमातूनच निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्यात येतात. यात आर्थिक व्यवहारांचाही समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा/मासिक सभा/महिला सभा/वॉर्ड सभा/विविध समित्यांच्या बैठका यांचे दप्तर असणे आवश्यक असते.
या दप्तरात एकसुत्रता असणे अपेक्षित आहे. तथापि ग्रामसेवकांकडून दप्तर ठेवण्याच्या पध्दतीत तफावत असल्याचे आढळून आल्याने तसेच अपूर्ण दप्तर व दप्तर लिहिण्यातील पध्दतीमधील त्रुटी यामुळे बऱ्याच अफरातफरी व निधीच्या दुरूपयोगाला वाव मिळत असल्याचेही आढळून आले आहे. या अनियमितता दूर करण्यासाठी संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये एकाच विहीत पध्दतीत दप्तर लिहिणे अनिवार्य करून ग्रामपंचायतीच्या कारभारात एकसूत्रता व पारदर्शकता आणण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
ग्रामपंचायतीच्या सर्व सभांच्या सुचना व कार्यवृत्त/इतिवृत्त विहीत नमून्यातच ठेवणे व जनतेच्या माहितीसाठी ग्रामपंचायत फलकावर, संकेतस्थळावर उपलब्ध करणेबाबत शासन नियम:
१. प्रत्येक ग्रामपंचायतीतील ग्रामसभा/मासिक सभा/महिला सभा/वॉर्ड सभा/विविध समित्यांच्या सभेच्या सुचना/नोटीस खालील परिशिष्ट अ मध्ये दिलेल्या विहीत नमून्यातच काढण्यात यावी.
२. खालील परिशिष्ट- ब मध्ये दिलेल्या विहीत नमून्यातच प्रत्येक सभेची स्वतंत्र नोंदवही/इतिवृत्त ठेवावी.
३. बैठकीस उपस्थित असलेल्या ग्रामस्थ/सदस्य/उपसरपंच/सरपंच यांची स्वाक्षरी ही कार्यवृत्त/इतिवृत्ताच्या रजिस्टरमध्येच असणे अनिवार्य आहे. उपस्थितांच्या स्वाक्षऱ्या दुसऱ्या रजिस्टरमध्ये घेतल्यास अशा सभांचे इतिवृत्त विधीग्राहय मानण्यात येणार नाही.
४. बैठक/सभा झाल्यानंतर सर्व प्राथम्याने त्या सभेचे इतिवृत्त लिहिण्यात यावे. दि. २७ सप्टेंबर, २०१३ रोजीच्या पत्रानुसार मुख्य राज्य माहिती आयुक्त यांनी माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या कलम १९ ( ८ ) ( क ) अन्वये ग्रामविकास विभागाला दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी ग्रामसभा/मासिक सभा/महिला सभा/वॉर्ड सभा/विविध समित्यांच्या बैठकांचे कार्यवृत्त/इतिवृत्त तात्काळ लिहून ग्रामपंचायत फलकावर लावणे, ग्रामपंचायतींच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करणे व नागरिकांना तपासणीसाठी खुले ठेवण्याबाबतचे निर्देशीत केले आहे. त्यानुसार सदर शासन निर्णयानुसार मुख्य माहिती आयुक्तांच्या या निर्देशांची अंमलबजावणी करणे सर्व ग्रामपंचायतींना या शासन निर्णयाद्वारे बंधनकारक करण्यात येत आहे.
६. उपरोक्त बैठकीच्या सुचनांची माहिती ही ई – पंचायत अंतर्गत प्राप्त झालेल्या सोशल ऑडीट व मिटींग मॅनेजमेंट या आज्ञावलीत भराव्यात तसेच इतिवृत्ताची स्कॅन PDF स्कॅन कॉपी अपलोड करणे या शासन निर्णयाद्वारे बंधनकारक करण्यात येत आहे. ही जबाबदारी संबंधित ग्रामसेवकाची राहील.
७. विहीत केलेल्या नमून्यातच सभा/बैठक सुचना व इतिवृत्ताची नोंदवही ठेवली जात आहे याची खातरजमा करण्याची संपूर्ण जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांची आहे.
८. उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पंचायत ), गट विकास अधिकारी तसेच विस्तार अधिकारी ( पंचायत ) यांनी ग्रामपंचायत दप्तर तपासणीचे वेळी सदर नमून्यातच बैठकीच्या सुचना व इतिवृत्त ठेवले असल्याची तपासणीमध्ये खात्री करावी.
९. ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकाऱ्याने या नमून्यात दप्तर न ठेवल्यास तो/ती शिस्तभंग विषयक कारवाईस पात्र राहील. त्याचबरोबर संबंधित पर्यवेक्षक अधिकारी सुध्दा प्रशासकीय कारवाईस पात्र राहतील.
परिशिष्ट-अ सभेच्या सुचनेचा नमूना:
ग्रामपंचायत ग्रामसभा/मासिक सभा/महिला सभा/वॉर्ड सभा/ समितीच्या सभेच्या सुचनेचा PDF नमुना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
परिशिष्ट-ब सभेचे इतिवृत्त नोंदवहीचा नमूना:
ग्रामपंचायत मध्ये झालेल्या ग्रामसभा/मासिक सभा/महिला सभा/वॉर्ड सभा/समितीच्या बैठकीचे/सभेचे इतिवृत्त नोंदवहीचा PDF नमुना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
महाराष्ट्र ग्रामपंचायत माहिती ऑनलाईन पहा:
ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागाच्या या वेबसाईटवर महाराष्ट्रातील कोणत्याही ग्रामपंचायतीची माहिती पाहू शकता. जसे की, ग्रामपंचायत कार्यकारणी तपशीलमध्ये सरपंच, उपसरपंच आणि निवडून आलेले सदस्य यांचा मोबाईल क्रमांक, इमेल आयडी, पदप्राप्त दिनांक, पदसमाप्ती दिनांक आणि त्यांचा फोटो इत्यादी तपशील पाहू शकता.
याव्यतिरिक्त, तूम्ही निवड केलेल्या ग्रामपंचायतीची क्षेत्रफळ, जिल्हा परिषद ते ग्रामपंचायत अंतर, वार्ड संख्या, कुटुंब संख्या, एकूण लोकसंख्या, एकूण पुरुष, स्त्री इत्यादी तपशील पाहू शकता. वैयक्तिक ग्रामपंचायत पृष्ठ पाहण्यासाठी खालील पोर्टलला भेट द्या.
वरील पोर्टलला भेट दिल्यानंतर पेज स्क्रोल करून खालील “वैयक्तिक ग्रामपंचायत पृष्ठ पाहण्यासाठी” या मेनू मध्ये आपला जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत निवडून शोधा या पर्यायावर क्लिक करा.
शोधा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या ग्रामपंचायतचे नांव येईल त्यावर क्लिक करा, जसे इथे मी “ग्रामपंचायत कोट पंचायत समिती – लांजा, जिल्हा परिषद रत्नागिरी” यावर क्लिक करतो.
- ग्रामपंचायत कार्यकारणी
- ग्रामपंचायत सर्व सभा व इतर कार्यक्रम फोटो
- वार्षिक उत्पन्नाची स्थिती
- ग्रामपंचायतीमधील सर्वसाधारण सुविधा
- माहिती संगणकीकरण व सेवा वितरण
- राबविण्यात आलेल्या योजना
तुमच्या ग्रामपंचायतचे नावावर क्लिक केल्यानंतर वरील प्रकारची माहिती तुम्हाला पाहायला मिळेल.
हेही वाचा – माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 नागरिकांना अवलोकनासाठी अभिलेख उपलब्ध करुन देणेबाबत शासन नियम
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!