मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना व बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना – २०२२-२३
धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी मा. पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या १५ कलमी कार्यक्रमानुसार धार्मिक अल्पसंख्याक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यासाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना दि. २३ जुलै २००८ च्या शासन निर्णयानुसार सन २००८-०९ पासून राज्यात राबविण्यात येते. ही शिष्यवृत्ती योजना मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारशी, बौध्द व जैन या इ. १ ली ते १० वी च्या धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आहे.
अल्पसंख्याक समाजातील गुणवंत मुलीसाठी बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती ही योजना पूर्वी अल्पसंख्याक मुलींसाठी मोलाना आझाद राष्ट्रीय शिष्यवृत्ती म्हणून ओळखली जात होती आणि ती ०३.०५.२००३ रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आयोजित अल्पसंख्याकाच्या शैक्षणिक आणि आर्थिक विकासाच्या परिषदेत भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयी यांनी सुरु केली होती. सदर योजना अल्पसंख्याक ( मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, बौध्द, पारसी व जैन ) समाजातील इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतच्या मुलीसाठी आहे. इयत्ता ९ वी व इयत्ता १० वी च्या मुलींना वार्षिक रुपये ५,०००/- व ११ वी व १२ वीच्या मुलीसाठी वार्षिक ६,०००/- रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते.
धार्मिक अल्पसंख्याक समाजातील आर्थिक दुर्बल असलेल्या विद्याथी/विद्यार्थीनींचे जास्तीत जास्त अर्ज NSP 2.0 या पोर्टलवर भरण्याबाबत विविध माध्यामातून जाहिरात करुन मोफत प्रसिध्दी देण्यात यावी. तसेच कार्यालयाच्या व शाळेच्या दर्शनीभागामध्ये योजनेच्या माहितीचे फलक लावण्यात यावेत.
प्रि – मैट्रिक शिष्यवृत्तीचे सन २०२२-२३ साठी नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज व बंगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना नवीन विद्यार्थीनींचे अर्ज भरावयाची प्रक्रिया केंद्रशासनाकडून NSP 2.0 या पोर्टलवर दि. २०/०७/२०२२ पासून सुरू करण्यात आलेली आहे. नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. ३०/०९/२०२२ पर्यंत आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्याचे व पडताळणीचे वेळापत्रक:
अ. क्र. | शिष्यवृत्ती योजना | नवीन/नुतनीकरण | इयत्ता | कालावधी | शाळास्तरावर पडताळणी | जिल्हास्तरावर पडताळणी |
1 | प्रि – मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना | नवीन/नुतनीकरण | इ. १ ली ते १० वी ( मुले व मुली ) | दि. २०/०७/२२ ते दि. ३०/०९/२२ | दि. १६/१०/२२ | दि. ३१/१०/२२ |
2 | बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना | नवीन | इ. ९वी ते १२ वी ( फक्त मुली ) | दि. २०/०७/२२ ते दि. ३०/०९ / २२ | दि. १६/१०/२२ | दि. ३१/१०/२२ |
सन २०२२-२३ या वर्षांसाठी सर्व इच्छुक तसेच मागील वर्षीच्या लाभार्थी विद्याथी/विद्यार्थीनींनी केंद्र शासनाच्या National Scholarship Portal (NSP 2.0 Portal) संकेतस्थळावर आपले अर्ज केवळ ऑनलाईन पध्दतीने भरावयाचे आहेत. सन २०२१-२२ या वर्षी ज्या विद्यार्थ्यांना अल्पसंख्याक विद्यार्थ्यासाठी असलेली मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती मिळालेली आहे अशाच विद्यार्थ्यांनी आपले अर्ज Renewal student म्हणून भरावयाचे आहेत. ( नुतनीकरण विद्यार्थ्यांची यादी शाळेच्या लॉगिन मध्ये उपलब्ध आहे. ) तसेच पात्र नवीन इच्छुक विद्यार्थ्यांनी आपले अर्ज Fresh student म्हणून भरावयाचे आहेत. / प्रि – मॅट्रिक शिष्यवृत्तीचे तसेच बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्तीचे वाटप केंद्रशासनाकडून DBT ( Direct Benefit Transfar ) मोडद्वारे विद्यार्थी विद्यार्थीनींच्या खात्यावर होत असल्याने विद्याथी / विद्यार्थीनीचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. आधार कार्ड नसेल तर आधार कार्डसाठी नोंदणी केलेली पावती ( Enrollment ID ) किंवा बैंक पासबुक ( छाया चित्रासह ) किंवा रेशन कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा पासपोर्ट किंवा शाळेच्या मुख्याध्यापकांनी साक्षांकित केलेले फोटो सहीत असलेले विद्यार्थी/ विद्यार्थीनींना ओळख प्रमाणपत्रची सत्य प्रत शाळेत सादर करणे बंधनकारक आहे.
1) मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्तीसाठी पात्रतेचे निकष व आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे:
पात्रतेचे निकष:
१. शासन मान्यताप्राप्त सर्व व्यवस्थापनाच्या अनुदानित / विनाअनुदानित / स्वयं अर्थसहाय्यित शाळांतील इयत्ता १ ली ते १० वी मध्ये शिकणारे / शिकणाऱ्या अल्पसंख्याक समाजातील पात्र विद्यार्थी / विद्यार्थिनी.
२. मागील शैक्षणिक वर्षात ५० टक्के पेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे. ( ही अट इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना लागू नाही. )
३ . पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. एक लाखापेक्षा कमी असावे. ( सक्षम अधिकाऱ्याच्या सहीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. )
४. एका कुटुंबातील २ पेक्षा अधिक पाल्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही.
५. एकूण पात्र विद्याथ्यांपैकी ३० टक्के शिष्यवृत्ती विद्यार्थिनींसाठी राखीव आहेत.
६. आधारकार्ड नंबर असणे आवश्यक आहे.
७. आधारकार्ड बँक खात्याशी जोडणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे / प्रमाणपत्रे:
१. विद्यार्थी शाळेत शिकत असल्याबाबतचे मुख्याध्यापकांचे बोनाफाईड प्रमाणपत्र.
२. मागील वर्षातील इयत्तेचे गुणपत्रक ( इयत्ता १ ली तील विद्यार्थ्यासाठी ही अट लागू नाही )
३. धर्माबाबत पालकांचे स्वयंघोषित प्रमाणपत्र.
४. पालकांच्या उत्पन्नाबाबत सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र.
५. रहिवासाचा पुरावा.
६. बैंक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत / चेकची प्रत.
७. विद्यार्थ्याचा स्वयंसाक्षांकित फोटोग्राफ
८. आधारकार्ड,
2) बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेसाठीचे पात्रतेचे निकष व आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे:
पात्रतेचे निकष
१. शासनमान्यता प्राप्त सर्व व्यवस्थापनाच्या अनुदानित / विनाअनुदानित / स्वयंअर्थसहाय्यित शाळांतील इयत्ता ९वी ते १२ वी मध्ये शिकणाऱ्या अल्पसंख्यांक समाजातील पात्र विद्यार्थीनी
२. मागील शैक्षणिक वर्षात ५० टक्केपेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे.
३. पालकाचे वार्षिक उत्पन्न रु. दोन लाखापेक्षा कमी असावे.
४. उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे सक्षम अधिकाऱ्याच्या सहीचे असणे बंधनकारक आहे.
५. एका कुटुंबातील २ पेक्षा अधिक पाल्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही.
६. आधारकार्ड नंबर असणे तसेच बँक खात्याशी जोडणे आवश्यक आहे.
७. इतर कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा.
आवश्यक कागदपत्रे / प्रमाणपत्रे:
१. विद्यार्थीनी शाळेत शिकत असल्याबाबतचे मुख्याध्यापकांचे बोनाफाईड प्रमाणपत्र,
२. मागील वर्षातील इयत्तेचे गुणपत्रक.
३. धर्माबाबत पालकांचे स्वयंघोषित प्रमाणपत्र,
४. पालकांच्या उत्पन्नाबाबत सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र,
५. रहिवासाचा पुरावा.
६. बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत / चेकची प्रत.
७. विद्यार्थीनींचा स्वयंसाक्षांकित फोटोग्राफ.
८. आधारकार्ड.
सन २०२२-२३ मध्ये NSP 2.0 या पोर्टलवर नवीन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थी विद्यार्थीनांची माहिती भरण्यासाठी विद्याथी / विद्यार्थीनीचे आधार नुसार नाव, जन्मतारीख, लिंग, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, राष्ट्रीयकृत बँकेचे खाते क्रमांक व I.F.S.C कोड ( विद्यार्थ्याचे बँक खाते नसल्यास पालकांचे चालेल), कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न शाळेचे नाव व यु – डायस क्रमांक, विद्यार्थी विद्यार्थीनीचे शाळेतील जनरल रजिस्टर क्रमांक, शाळेत प्रवेश घेतलेले वर्ष, हजेरी क्रमांक, तुकडी, इयत्ता, मागील वर्षी प्राप्त झालेले गुण, पालकांचा व्यवसाय, पूर्ण पत्ता इ. माहिती तसेच विद्यार्थी अनाथ आहे का ? अपंग आहे का ? असल्यास प्रकार व टक्केवारी इ. माहिती आवश्यक आहे. मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजन॑मधील नूतनीकरण विद्यार्थ्यांसाठी आधार क्रमांक, कुटूंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न, शाळा सुरु झालेली तारीख Day Scholar / Hosteler. विद्यार्थ्याचा शाळेतील जनरल रजिस्टर क्रमांक, शाळेत प्रवेश घेतलेले वर्ष, हजेरी क्रमांक, तुकडी इत्यादी माहिती आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
कोणत्याही तांत्रिक प्रश्नांसाठी, कृपया हेल्पडेस्कवर helpdesk@nsp.gov.in किंवा 0120 – 6619540 वर संपर्क साधा (सर्व दिवशी सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत, सुट्टीचे दिवस वगळून)
हेही वाचा – HDFC बढते कदम स्कॉलरशिप – HDFC Badhte Kadam Scholarship 2022-23
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!