वृत्त विशेष

टॅगिंग न झाल्यास दूध अनुदान नाही

शेतकऱ्यांच्या नावाखाली एजंटांकडून दूध गोळा करणाऱ्या काही डेअरी प्रकल्पांना टॅगिंग प्रणाली अडचणीची वाटते आहे. त्यामुळे थेट दूध अनुदान योजनेला आतून विरोध करण्याचा उद्योग काही प्रकल्पांनी चालू केला आहे. परंतु टॅगिंगशिवाय अनुदान मिळणार नसल्याचा स्पष्ट निर्वाळा दुग्ध व्यवसाय विकास खात्याने दिला आहे.

दुग्ध व्यवसाय विकास आयुक्त प्रशांत मोहोड यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे अलीकडेच राज्यातील दुग्ध प्रकल्पांची बैठक घेतली. सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांमार्फत संकलित होणाऱ्या गाय दुधाकरिता दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान केवळ ११ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२४ या कालावधीपुरते मिळणार आहे. त्यासाठी नियमावलींचे काटेकोर पालन करण्याचा आग्रह बैठकीत धरण्यात आला.

शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यासाठी शासकीय यंत्रणेने आयसीआयसीआय बँकेच्या मदतीने एक उपयोजन (अॅप्लिकेशन) विकसित केले आहे. या उपयोजनावर संकलित होणारी माहिती अनुदान वितरणासाठी वापरली जाणार आहे. प्रतिलिटर २७ रुपये दर अदा केल्याचा पुरावा दिला असेल तरच पाच रुपये अनुदान मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांऐवजी एजंटांकडून दूध खरेदी करणाऱ्या काही डेअरीचालकांची घाबरगुंडी उडाली आहे. परिणामी, ही योजना शेतकऱ्यांना समजावून सांगणेही नको व त्यांची माहिती राज्य शासनाला पाठवणेदेखील नको, अशी मधली भूमिका या डेअरीचालकांनी घेतली आहे.

टॅगिंगची योजना अतिशय उपयुक्त आहे. माझ्या प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात टॅगिंगचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम आठवडाभरात होईल.

काही थातूरमातूर माहितीच्या आधारे अनुदान वाटप होणार नाही. दुधाळ गायीचे टॅगिंग केलेले नसल्यास अनुदान मिळणार नाही, अशी भूमिका शासनाने घेतली आहे. दुधाळ गायीचा टॅगिंग क्रमांक, पशुपालक शेतकऱ्याचा आधार क्रमांक व बँक खाते क्रमांक एकमेकांशी संलग्न करण्याचा निर्णय अनुदानवाटपासाठी घेण्यात आला आहे. नेमकी हीच बाब काही खासगी डेअरी प्रकल्पांना अडचणीची ठरते आहे. शेतकऱ्यांकडून दुधाची खरेदी करता दूध संकलनासाठी २ ते ३ एजंटांची साखळी वापरणारे प्रकल्प या योजनेसाठी शेतकऱ्यांची माहिती देण्यात असमर्थ ठरणार आहेत. त्यामुळे ही योजना चुकीची असल्याची आवई उठवली जात आहे. परंतु, नियम मोडतोड न करण्याची भूमिका शासनानेदेखील घेतलेली आहे.

हेही वाचा – दुध उत्पादक शेतकरी यांना प्रतिलिटर रू.५/- इतके अनुदान

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.