वृत्त विशेषग्राम विकास विभागजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीसरकारी कामे

ग्रामसभांच्या कामकाजांची नोंद आता GS NIRNAY ॲपव्दारे होणार !

ग्रामपंचायत कार्यात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने पंचायतीराज विभाग, भारत सरकार यांनी GS NIRNAY National Initiative for Rural India to Navigate, InnovAte and Resolve Panchayat at decisions या ॲप्लीकेशनची निर्मिती केली आहे.

यामध्ये खालीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत.

1. GS NIRNAY ॲप स्मार्टफोनमध्ये Android Play Store & Apple App Store मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.

2. ग्रामसभेने घेतलेल्या निर्णयांचा सारांश देणारा कमीत कमी 2 मिनिटे व जास्तीत जास्त 15 मिनिटांपर्यंतचा स्पष्ट ऑडिओसह चांगल्या दर्जाचा प्रत्येक ग्रामसभेचा व्हिडिओ रेकॉर्ड करावा व तो GS NIRNAY ॲपवर अपलोड करावा.

3. उपरोक्त संदर्भीय पत्रामध्ये नमूद माहितीनुसार महाष्ट्रामध्ये एकही व्हिडिओ अपलोड झाल्याचे दिसून येत नाही.

4. GS NIRNAY ॲपमध्ये लॉगिन करण्यासाठी eGramSwaraj साठी उपलब्ध असलेल्या User idPassword चा वापर करावयाचा आहे.

5. GS NIRNAY ॲप व्हायब्रेट ग्रामसभा पोर्टलशी जोडले गेले आहे. त्यामुळे व्हायब्रेट ग्रामसभा पोर्टलमध्ये ग्रामपंचायतीने ग्रामसभा वेळापत्रक (Schedule) भरणे बंधनकारक आहे.

6. ग्रामपंचायतीने लॉगिन केल्यानंतर व्हायब्रेट ग्रामसभा पोर्टलमध्ये निश्चित केलेल्या ग्रामसभांचे वेळापत्रक ग्रामपंचायतीस दिसून येईल, त्यानुसार ग्रामसभेने घेतलेल्या निर्णयांचा सारांश देणारा 2 ते 15 मिनिटांपर्यंतचा व्हिडिओ अपलोड करावयाचा आहे.

7. ग्रामपंचायतींनी अपलोड केलेले व्हिडिओ Approve किंवा Reject करण्याची जबाबदारी पंचायत समिती स्तरावर गट विकास अधिकारी यांना देण्यात आलेली आहे. स्तरावरून सदर व्हिडिओ Approve किंवा Reject करणे बंधनकारक आहे.

8. तालुका स्तरावरून सदर व्हिडिओ Approve करताना पंचायतीराज विभाग, भारत सरकार यांनी व्हिडिओ संदर्भात दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

वरील सूचनांच्या अनुषंगाने ग्रामपंचायत स्तरावर सरपंच, ग्रामसेवक व केंद्र चालक व तालुका स्तरावर गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी व तालुका व्यवस्थापक यांना याबाबत सूचना देणेबाबत संबंधित अधिकारी यांना सूचीत करावे ही विनंती.

याबाबतचा नियमित आढावा केंद्र शासनाकडून घेण्यात येत आहे. याअनुषंगाने सन 2022-23 मध्ये व्हायब्रेट ग्रामसभा पोर्टलमध्ये ज्या ग्रामपंचायतींनी ग्रामसभा Schedule नुसार ग्रामसभांचे व्हिडिओ तयार केले असतील असे व्हिडिओ GS NIRNAY ॲपवर अपलोड करावेत तसेच सन 2023- 24 मध्ये ग्रामसभा Schedule नुसार अपलोड करण्यात येणा-या व्हिडिओची माहिती जून, सप्टेंबर, डिसेंबर व मार्च अखेर असे तिमाही अहवाल खालील नमुन्यात या कार्यालयास सादर करणेबाबत संबंधितांना सूचना देणेस विनंती आहे.

GS NIRNAY ॲप: GS NIRNAY ॲप डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – ग्रामपंचायत ग्रामसभा नियम व अटी (महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ७ व ८ नुसार)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

One thought on “ग्रामसभांच्या कामकाजांची नोंद आता GS NIRNAY ॲपव्दारे होणार !

  • सागर श्रीधर गोसावी

    2 व 15 मिनिटांची ग्रामसभा व्हिडिओ पाहिजे ह्याचा GR आहे का

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.