ग्राम विकास विभागमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी योजना

महिला बचत गटांच्या महिलांसह सखी यांना देण्यात येणार वाढीव मानधन

संभाजीनगर येथील दिनांक १६.०९.२०२३ रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यरत समुदाय संसाधन व्यक्तीं (Community Resource Person-CRP) / प्रेरिका (ICRP) / सखी यांना त्यांच्या कामाचे प्रचलित पध्दतीने मुल्यमापन करुन कमाल रु.६०००/- दरमहा मानधन अदा करण्याबाबत तसेच उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन झालेल्या स्वयंसहाय्यता गटांना सद्य:स्थितीत “अ”, “ब” व “क” वर्गवारीत श्रेणीकरण करुन अधिकतम रु.१५,०००/- फिरता निधी (Revolving Fund) वितरीत करण्यात येतो. यामध्ये वाढ करुन केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनान्वये स्वयंसहाय्यता गटांची वर्गवारी करुन “अ” वर्गवारी प्राप्त होणाऱ्या स्वयं सहाय्यता गटांना रु.३०,०००/- व वर्गवारी “ब” व “क” मध्ये येणाऱ्या स्वयंसहाय्यता गटांना प्रचलित पध्दतीने फिरता निधी (Revolving Fund) अदा करण्याबाबत संदर्भाधिन क्र.१ अन्वये शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्यानुषंगाने या योजनेसाठी (२५०१ ए१८२) या लेखाशीर्षाखाली पुरवणी मागणीद्वारे रु.९९६६०.०० लक्ष इतकी तरतूद अर्थसंकल्पीत करण्यात आली आहे. सदर अर्थसंकल्पीत केलेल्या तरतूदीमधून रु.६९७६२.०० लक्ष इतकी रक्कम शासन निर्णय दिनांक ३०.०१.२०२४ अन्वये वितरीत केली आहे. आता उर्वरित रु.२९८९८.०० लक्ष इतका निधी वितरित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

महिला बचत गटांच्या महिलांसह सखी यांना देण्यात येणार वाढीव मानधन शासन निर्णय:-

सन २०२३-२४ मध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत समुदाय संसाधन व्यक्तींसाठी वाढीव मानधन व स्वंय सहायता गटांना फिरता निधी (अतिरिक्त राज्य हिस्सा) (२५०१९१८२) याकरिता केलेल्या तरतूदीतून रु.२९८९८.०० लक्ष (रुपये दोनशे अठ्ठयाण्णव कोटी अठ्ठयाण्णव लाख फक्त) इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली (B.D.S) द्वारे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानास वितरीत करण्यात येत आहे.

सदर रक्कम उप संचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, बेलापूर, नवी मुंबई यांच्याकडे आहरण व संवितरण अधिकारी म्हणून सुपूर्द करण्यात येत आहे.

सदर रक्कम रु.२९८९८.०० लक्ष (रुपये दोनशे अठ्ठयाण्णव कोटी अठ्ठयाण्णव लाख फक्त) चा खर्च “मागणी क्र.एल ३, २५०१, ग्रामविकासासाठी विशेष कार्यक्रम, ०६, स्वयंरोजगार कार्यक्रम, १०१, सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना, (०१) सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना, (०१) (२१) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत समुदाय संसाधन व्यक्तींसाठी वाढीव मानधन व स्वंय सहायता गटांना फिरता निधी (अतिरिक्त राज्य हिस्सा), ३३ अर्थसहाय्य, (२५०१ ए१८२)” या लेखाशिर्षाखाली सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पीत केलेल्या तरतूदी मधून भागविण्यात येणार आहे.

हे अनुदान ज्या प्रयोजनाकरीता मंजूर करण्यात आलेले आहे, त्याच प्रयोजनाकरीता खर्च करण्यात येईल.अन्यथा ती वित्तीय अनियमितता समजण्यात येईल, याची अमंलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी.

या शासन निर्णयान्वये मंजूर केलेले अनुदान कोषागारातून काढल्यानंतर पुढील माहिती त्वरीत लेखाधिकारी कार्यासन क्रमांक योजना-२, ग्राम विकास विभागयांचेकडे पाठवावी. १) मंजूर केलेली रक्कम, २) कोषागारातून काढलेली रक्कम, ३) रक्कम काढल्याचा प्रमाणक क्रमांक व दिनांक, ४) महालेखापाल कार्यालयातील रक्कमेशी ताळमेळ केल्याचे प्रमाणपत्र.

सदर शासन निर्णय वित्त विभाग परिपत्रक्र दिनांक १२ एप्रिल, २०२३ व ०८ डिसेंबर, २०२३ अन्वये दिलेल्या केंद्र पुरस्कृत योजनांसाठी निधी तसेच राज्य शासनाचा समरुप हिस्सा प्रशासकीय विभागांने त्यांचे स्तरावर वितरित करण्याच्या प्रदान केलेल्या अधिकारानुसार तसेच वित्त विभागाचा अनौ.संदर्भ क्र.९७/२०२४/व्यय-१५, दिनांक ०७.०२.२०२४ अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

ग्राम विकास विभाग शासन निर्णय : राज्य शासनाकडून समुदाय संसाधन व्यक्तीं (Community Resource Person-CRP) / प्रेरिका (ICRP) / सखी यांना देण्यात येणारे वाढीव मानधन व स्वयंसहाय्यता गट यांना देण्यात येणारा वाढीव फिरता निधी वितरीत करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – महिला बचत गटांना ड्रोन पुरवण्यासाठीच्या योजनेला मंत्रिमंडळांची मंजुरी !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.