भारतीय रेल्वेने ऑनलाइन आरक्षणासाठी तिकीट मर्यादा वाढवली – Indian Railways Increased ticket limit for online reservations
रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेने ऑनलाईन पद्धतीने आरक्षण केल्या जाणाऱ्या तिकिटांची संख्या वाढवली आहे. आधार क्रमांकाशी संलग्न नसलेल्या वापरकर्त्या आयडीद्वारे याआधी एका महिन्यात जास्तीतजास्त 6 तिकिटे काढता येत होती मात्र नव्या नियमानुसार, ही मर्यादा 12 तिकिटांपर्यंत वाढविण्यात आली आहे.
आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या वापरकर्त्या आयडीद्वारे आता एका महिन्यात 12 ऐवजी 24 तिकिटे काढता येऊ शकतील. अर्थात या तिकिटांचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांपैकी कोणत्याही एका प्रवाशाच्या तिकीटाची आधार क्रमांकद्वारे पडताळणी केली जाईल असे रेल्वेने म्हटले आहे.
सध्या रेल्वे विभागाचे आयआरसीटीसी संकेतस्थळ तसेच ॲप यांचा वापर करून आधार क्रमांकाशी संलग्न नसलेल्या वापरकर्त्या आयडीद्वारे एका महिन्यात जास्तीतजास्त 6 तिकिटे काढता येतात.
आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या वापरकर्त्या आयडीद्वारे एका महिन्यात जास्तीतजास्त 12 तिकिटे काढता येतात आणि यातील कोणत्याही एका प्रवाशाच्या तिकीटाची आधार क्रमांक वापरून पडताळणी केली जाते.
हेही वाचा – IRCTC च्या नवीन वेबसाइटवर ऑनलाईन ट्रेन तिकीट बुकिंग कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!