यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना घरकुल लाभार्थी यादी जाहीर !
विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजनेंतर्गत शासन निर्णय संदर्भ क्रमांक १ व शासन शुध्दीपत्रक संदर्भ क्र. २ ते ४ मधील तरतुदींनुसार, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत / घरकुल योजना जिल्हास्तरीय समिती, उस्मानाबाद यांच्या अध्यक्षतेखाली दि. १६.०९.२०१९, दि. २९.१०.२०२१ व दि. ०१.१२.२०२२ रोजी झालेल्या बैठकांमध्ये प्रशासकीय मंजूरी दिलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांच्या नावांचा अंतिम केलेला प्रस्ताव संदर्भ क्र. ५ च्या पत्रान्वये शासनास प्राप्त झाला आहे.
सन २०२३-२४ या वर्षात उस्मानाबाद जिल्ह्यातील १०५७ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांकरीता (परिशिष्ट-अ) प्रति लाभार्थी रु. १.२० लक्ष प्रमाणे रु. १२,६८,४०,०००/- (अक्षरी रुपये बारा कोटी अडुसष्ट लक्ष चाळीस हजार फक्त) व ४ टक्के प्रशासकीय निधी (प्रति घरकुल रु.४८००/- प्रमाणे) रु. ५०,७३,६०० /- (अक्षरी रुपये पन्नास लक्ष त्र्याहत्तर हजार सहाशे फक्त) असा एकूण रु. १३,१९,१३,६००/- (अक्षरी रुपये तेरा कोटी एकोणावीस लक्ष तेरा हजार सहाशे फक्त) इतक्या निधीस शासनाची मान्यता देण्यात येत आहे. सदरहू निधीपैकी तूर्त रू. २,००,००,०००/- (अक्षरी रूपये दोन कोटी फक्त) इतका निधी वितरीत करण्यात येत असून उर्वरित निधी या योजनेतंर्गत निधीच्या उपलब्धतेनुसार अदा करण्यात येईल.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत सोबतच्या परिशिष्ट – अ मधील १०५७ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना सदरहू मान्यता खालील अटींच्या अधीन राहून देण्यात येत आहे.
१. उस्मानाबाद जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरवलेल्या व छाननी अंती अंतिम केलेल्या लाभार्थ्यांपैकी फक्त सोबत जोडण्यात आलेल्या “परिशिष्ट-अ” मध्ये नमूद पात्र लाभार्थ्यांनाच सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील..
२. सर्व लाभार्थी विजाभज प्रवर्गातील वैयक्तिक जात प्रमाणपत्र धारक असणे बंधनकारक असून अशाच व्यक्तीस सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील.
३. ज्या व्यक्तीचे जात प्रमाणपत्र आहे त्याच व्यक्तीस सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील दुसऱ्या
व्यक्तीस लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
४. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना सन २०२२-२३ या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक राहील.
५. सर्व लाभार्थ्यांना आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्यात अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
६. लाभार्थ्यांपैकी एखाद्या व्यक्तीच्या नावात, पालकाच्या / वडीलांच्या नावात अथवा आडनावात तफावत असल्यास ती तफावत दूर करण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या नावाचा, पालकाच्या नावाचा व आडनावाचा पुरावा सादर करणे आवश्यक राहील. नाव / आडनावातील तफावत दूर न झाल्यास अशा व्यक्तीस सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
७. पात्र लाभार्थ्यांची नावे दुबार झाल्यास सदरहू नावे वगळून शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करावी.
८. जिल्हास्तरीय समितीने संदर्भाधिन शासन निर्णयातील तरतूदींच्या अधीन सदरहू प्रकरणी आवश्यक ती कार्यवाही करुन वैयक्तिक लाभार्थी यांच्या घरकुल योजनेस मान्यता देण्याची कार्यवाही करणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत शासन निर्णयातील अटी व शर्तीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.
या प्रकरणी लाभार्थ्यांच्या सर्व कागदपत्रांची व अटींची पुर्तता झाल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी ही जिल्हाधिकारी, उस्मानाबाद व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, उस्मानाबाद यांची राहील.
सदरहू निधी वितरीत करण्यासाठी उप सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई यांना “नियंत्रक अधिकारी तसेच सहायक आयुक्त, समाजकल्याण, उस्मानाबाद यांना “आहरण व संवितरण अधिकारी” म्हणून घोषित करण्यात येत आहे. आहरण व संवितरण अधिकारी यांनी आवश्यक तरतूद संबंधित यंत्रणेस वितरीत करावी. तसेच कामाबाबतचा अहवाल वेळोवेळी शासनास सादर करावा.
जिल्हाधिकारी, उस्मानाबाद व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, उस्मानाबाद यांनी सर्व अटी व शर्तीच्या पुर्ततेशिवाय निधी खर्च करु नये. तसेच याकरीता कोणत्याही परिस्थितीत अतिरिक्त निधी मंजूर केला जाणार नाही.
याबाबतचा खर्च सन २०२३ २४ या वित्तीय वर्षात मागणी झेडजी-३, मुख्य लेखाशिर्ष २२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास वर्ग यांचे कल्याण, ०३ मागासवर्गाचे कल्याण, (०१) (०३) विमुक्त जाती भटक्या जमाती यांच्याकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना (२२२५-ई ८२१) ३१ सहायक अनुदाने (वेतनेत्तर) या लेखाशिर्षाखाली प्राप्त आर्थिक तरतूदीतून भागविण्यात यावा.
याद्वारे वितरीत करण्यात येणाऱ्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापाल व शासनास सादर करण्याची जबाबदारी आहरण व संवितरण अधिकारी यांची राहील.
इतर मागास बहुजन कल्याण विभाग शासन निर्णय आणि लाभार्थ्यांची यादी:
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेंतर्गत सन २०२३-२४ करीता मान्यता व निधी उपलब्ध करुन देण्यात येत असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील १०५७ लाभार्थ्यांची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा – यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना – Yashwantrao Chavan Gharkul Yojana
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!