महाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसहकार पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत शेतकऱ्यांना कर्जमाफी (जुलै, २०१९ ते ऑगस्ट, २०१९)

राज्यात जुलै, २०१९ ते ऑगस्ट, २०१९ या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्हयातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत रु. ५२,५६२.०० लाख इतकी रक्कम वितरीत करण्यात आली आहे. सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त, पुणे यांनी संदर्भ क्र.५ च्या पत्रान्वये रु. ३७९.९९ लाख निधी वितरीत करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार सदर योजनेसाठी सन २०२३-२४ साठी सन २०२३ च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रु. ३७९.९९ लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत शेतकऱ्यांना कर्जमाफी (जुलै, २०१९ ते ऑगस्ट, २०१९) शासन निर्णय :-

सदर योजनेसाठी सन २०२३-२४ साठी सन २०२३ च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रु. ३७९.९९ लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. वित्त विभागाच्या दि.०५.०२.२०२४ रोजीच्या परीपत्रकानुसार मंजूर निधीपैकी ७० टक्के म्हणजे रु. २६५.९९ लाख (रु. दोनशे पासष्ट लाख नव्यान्नव हजार फक्त) एवढा निधी राज्यात जुलै, २०१९ ते ऑगस्ट, २०१९ या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्हयातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य (राज्यस्तर) (कार्यक्रम), (२४३५०१३३) ३३ अर्थसहाय्य या लेखाशिर्षाअंतर्गत वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

सदर तरतूद खर्च करण्यासाठी (V०००४) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिनस्त उपनिबंधक (अंदाज व नियोजन), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे. तसेच लेखाधिकारी, अधिन सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषीत करण्यात येत आहे. सदर निधी आहरण करुन वेळेत खर्च होईल याची दक्षता सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी घ्यावी. तसेच या बाबतचा अहवाल व खर्चाची माहिती वेळोवेळी शासनास पाठवावी.

>

सदर खर्च मागणी क्रमांक व्ही-०२, २४३५- इतर कृषीविषयक कार्यक्रम, ६०-इतर, (००) (१०१) शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना (००) (०२) नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी (राज्यस्तर) (२४३५०१३३), ३३ अर्थसहाय्य या लेखाशिर्षाखालील सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी उपलब्ध असलेल्या तरतूदीमधून करण्यात यावा.

सदर शासन निर्णय, नियोजन विभाग अनौपचारीक संदर्भ क्रमांक ७७/का.१४३१, दिनांक २९.०१.२०२४ अन्वये व वित्त विभाग अनौपचारीक संदर्भ क्रमांक १२३/२०२४/व्यय-२, दिनांक ०९.०२.२०२४ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग शासन निर्णय : नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत शेतकऱ्यांना कर्जमाफी (राज्यस्तर) योजनेसाठी निधी वितरीत करणेबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – या कुटुंबांना प्रतिमाह 200 युनिट पर्यंत मोफत वीज मिळणार !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.