महावितरण कृषी वीज धोरण योजना – असा करा ऑनलाईन अर्ज आणि मिळवा 50% वीज बिल माफी
महावितरण कृषी वीज धोरण योजनेअंतर्गत थकबाकीदार शेतकरी बांधवांना वीज बिल भरण्यासाठी आकर्षक सवलत देण्यात आली आहे, एकूण बिलापैकी फक्त ५० टक्केच रक्कम एकदम भरावयाची आहे. उर्वरित ५० टक्के रक्कम हि कायमस्वरूपी माफ होणार आहे.
ग्राहकांच्या माहितीसाठी –
१. कृषी वीज धोरण – २०२० योजनेअंतर्गत आपण भरणा केलेल्या रकमेपैकी ३३% रक्कम हि आपल्याच ग्रामपंचायत क्षेत्रामधील विजेच्या पायाभूत सुविधा सक्षमीकरणासाठी वापरली जाणार आहे.
२. तसेच, आपल्या भरणा रकमेपैकी आणखी ३३% रक्कम हि आपल्या जिल्ह्यातील विजेच्या पायाभूत सुविधा सक्षमीकरणासाठी वापरली जाणार आहे.
महावितरण कृषी वीज धोरण योजने साठी असा करा ऑनलाईन अर्ज :
खालील महावितरणची वेबसाईट ओपन करा.
https://billcal.mahadiscom.in/agpolicy2020/
महावितरणची वेबसाईट ओपन झाल्यावर तुमचा वीजबिल ग्राहक क्रमांक टाका आणि “शोधा” या पर्यायावर क्लिक करा.
ग्राहकाचा तपशील: वीजबिल ग्राहक क्रमांक टाकलयानंतर तुम्हाला तुमचा सर्व तपशील दिसेल तो चेक करा. ग्राहकाचा तपशील मध्ये ग्राहक क्रमांक, ग्राहकाचे नाव, पत्ता, बिलिंग युनिट, भ्रमणध्वनी क्रमांक,मीटर क्रमांक इत्यादी दिसेल.
कृषी योजना २०२०: कृषी योजना २०२० या पर्यायामध्ये थकबाकीची माहिती दिसेल.
मागील ५ वर्षात भरलेल्या रक्कमेचा तपशील: यामध्ये मागील ५ वर्षात ग्राहकाने भरलेली रक्कम (ऑक्टोबर – २०१५ ते सप्टेंबर- २०२०) आणि मागील पावतीचा दिनांक दिसेल.
कृषी योजना २०२० अंतर्गत विलंब आकार आणि व्याजातील सूट: विलंब आकाराची थकबाकी आणि व्याजाची थकबाकी पाहायला मिळेल.
विलंब आकाराची थकबाकी:
- सप्टेंबर-२०१५ पूर्वीची १००%
- सप्टेंबर-२०१५ नंतरची १००%
- एकूण माफ केलेले विलंब शुल्क (F + G)
व्याजाची थकबाकी:
- सुधारित व्याज दराद्वारे ऑक्टोबर – २०१५ ते सप्टेंबर – २०२० या कालावधीत पुनर्गणित व्याज
- पुनर्गणनात्मक आणि वास्तविक मधील फरक (E3 – I)
- एकूण माफ केलेले व्याज (D3 + J)
- एकूण माफ रक्कम (H + K)
कृषी योजना २०२० नुसार सप्टेंबर – २०२० रोजी सुधारित देय थकबाकी:
1.मूळ थकबाकी (C1)
2.विलंब आकाराची थकबाकी [ C2 – H]
3.व्याजाची थकबाकी [C3 – K ]
सुधारित देय थकबाकी:
योजनेचा लाभ घेण्यासाठी, योजनाच्या कालावधीत देण्यात आलेली सर्व चालू देयके देय तारखेच्या आत अदा करावीत.
- दिनांक ३१ – मार्च – २०२२ पर्यंत भरल्यास, अतिरिक्त 50% सूट
- दिनांक ३१ – मार्च – २०२३ पर्यंत भरल्यास, अतिरिक्त 30% सूट
- दिनांक ३१ – मार्च – २०२४ पर्यंत भरल्यास, अतिरिक्त 20% सूट
कृषी योजना २०२० अंतर्गत देय रक्कम:
कृषी योजना २०२० अंतर्गत देय रक्कम या पर्यायामध्ये तुम्हाला कोणत्या वर्षात तुम्ही योजनेचा लाभ घेता त्यानुसार सूट मिळून भरावयाची रक्कम दिसणार आहे.
“कृषी वीज धोरण २०२० मधील जाहीर केलेल्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी मी सहभागी होण्यास तयार आहे.” या चेक बॉक्स मध्ये क्लिक करून “जतन करा” बटन वर क्लिक करा. नंतर प्रिंट बटन वर क्लिक करून अर्जांची प्रिंट काडून महावितरण ऑफिस मध्ये देय रक्कम भरून वीजबिलात 50% सूट सूट मिळवा.
हेही वाचा – घरगुती छपरावरील रूफटॉप सोलर अनुदान योजना सुरु, असा करा ऑनलाईन अर्ज – Apply Online for Solar Rooftop
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!