वृत्त विशेषमहाराष्ट्र शासन निर्णय - GRसरकारी योजना

कोरोनाने निधन झालेल्यांच्या वारसांना ५० हजार सानुग्रह अर्जासाठी नवीन मुदत – MahaCovid19Relief

मा. सर्वोच्च न्यायालयाने रिट याचिका (सिव्हील ) क्र.५३९/२०२१ (गौरवकुमार बंन्सल विरुध्द भारत सरकार) मधील संकीर्ण अर्ज क्र. १८s०५/२०२१ मध्ये दि. ४ ऑक्टोबर, २०२१ रोजी दिलेल्या आदेशानुसार शासन निर्णय, महसूल व वन विभाग दि. २६ नोव्हेंबर, २०२१ अन्वये कोव्हिड -१९ या आजारामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रु.५०,०००/- इतके सानुग्रह सहाय्य देण्याची ही योजना दि. ०१ डिसेंबर, २०२१ पासून ऑनलाईन पध्दतीने कार्यान्वित करण्यात आली आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी दि.२४ मार्च, २०२२ रोजी दिलेल्या आदेशास अनुसरुन पुढील प्रमाणे आदेश देण्यात येत आहेत :

कोव्हिड -१९ या आजारामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रु. ५०,०००/- इतके सानुग्रह सहाय्य देण्याच्या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत पुढील प्रमाणे राहिल :

अ) कोव्हिड १९ या आजारामुळे दि.२० मार्च, २०२२ पूर्वी मृत्यू झालेला असल्यास दि.२४ मार्च, २०२२ पासून ६० दिवसाच्या आत म्हणजेच दि. २४ मे, २०२२ पर्यंत.

ब) कोव्हिड -१९ या आजारामुळे दि. २० मार्च, २०२२ पासून पुढे मृत्यू झाल्यास मृत्यूच्या दिनांकापासून ९० दिवसांच्या आत.

>

या योजनेखाली अर्ज करण्यासाठी वर नमूद केलेल्या मुदतीच्या नंतरचे अर्ज केवळ गाऱ्हाणे निवारण समिती (GRC) मार्फत करता येतील.

अर्ज करण्याची मुदतीत राज्यातील सर्व व्यक्तींना माहिती व्हावी याकरिता यापुढे प्रत्येक १५ दिवसाला एकदा याप्रमाणे ६ आठवड्याकरिता सर्व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने प्रिंट व ईलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे जाहिर प्रसिध्दी द्यावी.

या योजनेकरिता ज्या अर्जदारांनी सानुग्रह सहाय्यासाठी चुकीचा दावा दाखल केलेला आहे, त्यांच्याविरुध्द जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ च्या कलम ५२ प्रमाणे कारवाई करावी.

वरील आदेश विचारात घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने तातडीने कार्यवाही करावी, असे शासन परिपत्रका मध्ये नमूद केले आहे.

शासन परिपत्रक: कोरोना आजारामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्रदान करण्याबाबत शासन परिपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा – कोरोनाने निधन झालेल्यांच्या वारसांना ५० हजार सानुग्रह निधीसाठी ऑनलाईन अर्ज सुरु – MahaCovid19Relief

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.