वृत्त विशेषआपले सरकार - महा-ऑनलाईनजिल्हा परिषदमहानगरपालिकामहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीसरकारी कामे

आपले सरकार सेवा केंद्र – महा ई सेवा केंद्र नांदेड जिल्ह्यासाठी अर्ज सुरू, पहा अटी शर्ती – Aapale Sarkar Seva Kendra Nanded District

मा. प्रधान सचिव, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील शासन निर्णय क्रमांक मातंसं-1716/प्र.क्र. / 517/39 दिनांक 19 जानेवारी, 2018 रोजीच्या शासन निर्णयान्वये जिल्हयातील ग्रामीण व महानगरपालीका क्षेत्रात रिक्त असलेल्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र देण्यास्तव दिनांक 04/09/2023 पासून ते दिनांक 22/09/2023 सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. रिक्त असलेल्या गावांची व महानगरपालीका क्षेत्राची यादी नांदेड जिल्हयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. जिल्हयातील एकुण आपले सरकार सेवा केंद्राच्या रिक्त जागेपैकी 05% जागा दिव्यांग व 03 जागा तृतियपंथी यांचेसाठी राखीव ठेवण्यात येत आहेत.

आपले सरकार सेवा केंद्र – महा ई सेवा केंद्र नांदेड जिल्ह्यासाठी अर्ज सुरू, पहा अटी शर्ती – Aapale Sarkar Seva Kendra Nanded District:

अर्जदारांनी जिल्हा सेतू समिती, नांदेडच्यापोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावयाचे आहे. सदर जाहिरातीच्या अधिक माहितीसाठी नांदेड जिल्हयाच्या संकेतस्थळावर भेट दयावी.

नवीन आपले सरकार सेवा केंद्र अर्ज करण्यासाठी अनिवार्य कागदपत्रे:

1. शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र दहावी/बारावी / पदवी मार्कमेमो अथवा सनद पैकी एक

2. संगणक अर्हता प्रमाणपत्र (MS-CIT)

3. आधार कार्ड

4. पॅन कार्ड (अर्जदारांच्या नावाचेच पॅनकार्ड जोडावे )

5. अर्जदार ज्या ग्रामपंचायत/गावाचा रहिवाशी आहे त्या गावातील ग्रामसेवक अथवा तलाठी यांचा रहिवाशी दाखला

6. अर्जदार महानगरपालीका क्षेत्रातील झोन / वार्ड चा रहिवाशी असल्यास त्या झोन / वार्ड चे झोनल अधिकारी यांचा रहिवाशी दाखला

7. जागेच्या मालकी हक्काची कागदपत्रासाठी खालील पैकी एक पुरावा

  • ग्रामपंचायतीचा नमुना नं. ८
  • घर कर पावती
  • लाईट बिल
  • क्रेडिट कार्ड
  • स्वतःचे घर नसल्यास घरमालकाचे भाडेपत्र (भाडेपत्रा सोबत घरमालकाचे मालमत्ताकर पावती अथवा लाईट बिल जोडावे.)

8. अर्जदारास आपले सरकार सेवा केंद्र चालविण्यासाठी नियोजीत जागेचे आतील व बाहेरील फोटो (Notecam Andriod app द्वारे) अक्षांस व रेखांक्षासह काढलेले फोटो

9. अर्जदारांनी अर्ज शुल्क रक्कम रू. 500/- “E-SUVIDHA COLLECTORATS NANDED” Gurudwara Branch Nanded Ac /No. 52073059077 IFSC Code SBIN0021097 या खात्यामध्ये जमा करून जमा केल्याची पावती ऑनलाईन अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे.

10. अर्जदाराकडे सी.एस.सी. (CSC) केंद्र असल्यास त्याचे प्रमाणपत्र

11. अर्जदार दिव्यांग असल्यास दिव्यांगाचे जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे.

12. उपरोक्त प्रमाणे सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावीत.

“आपले सरकार सेवा केंद्र मंजुर करण्यासाठी निकष”

1. गावातील रहिवाशी व त्याच गावातील CSC (कॉमन सर्व्हिस सेन्टर) चालकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. आशा एकाच गावातील अनेक CSC (कॉमन सर्व्हिस सेन्टर) चालकांनी अर्ज केल्यास त्यांच्या केंद्रावर झालेल्या व्यवहाराच्या संख्येनूसार आपले सरकार सेवा केंद्र मंजुर करण्यात येईल. समान व्यवहाराची संख्या आढळून आल्यास सोडत पध्दतीने (Lucky Draw) निवड करण्यात येईल.

2. अ.क्र. 01 मधील निकषानूसार अर्ज प्राप्त न झाल्यास गावातील रहिवाश्यांना प्राधान्य देण्यात येईल.

3. अ.क्र. 01 व 02 मधील निकषानूसार अर्ज प्राप्त न झाल्यास लगतच्या गावातील रहिवासी यांचा विचार करण्यात येईल.

4. उपरोक्त तिन्ही पैकी कोणत्याही निकषामध्ये समान पात्रता धारण करणारे एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास सोडत पध्दतीने (Lucky Draw) निवड करण्यात येईल.

5. जिल्हयातील एकुण आपले सरकार सेवा केंद्राच्या रिक्त जागेपैकी 05% जागा अपंगासाठी राखीव ठेवण्यात आले असल्याने गावातील दिव्यांग व्यक्तीने अर्ज केल्यास आशा प्रकरणामध्ये मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती यांचा निर्णय अंमित असेल.

अर्ज तपासणीचे विविध टप्पे

1. सर्व प्रथम अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्राच्या आधारे प्राथमिक पात्र / अपात्र ची यादी दिनांक 06/10/2023 रोजी सायंकाळी 5.00 वा. नांदेड जिल्हयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

2. पात्र / अपात्र यादीवरील अक्षेप दिनांक 09/10/2023 ते दिनांक 13/10/2023 रोजी सायंकाळी 05.00 वा. पर्यंत ऑनलाईन सादर करावीत. सदरची सुविधा ऑनलाईन अर्ज केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आपण यापुर्वी तयार केलेला युजरआयडी व पासवर्डचा वापर करून अक्षेप दाखल करू शकता. इतर मार्गाने प्राप्त अक्षेपांचा विचार केला जाणार याची नोंद घ्यावी.

3. पात्र / अपात्र यादीवरील अक्षेपावर दिनांक 19/10/2023 रोजी दुपारी 12.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे सुनावणी घेण्यात येईल. सुनावणीस हजर राहतांना आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत.

4. सुनावणी नंतर दिनांक 27/10/2023 रोजी सायंकाळी 05.00 वा. अंतिम पात्र / अपात्र यादी नांदेड जिल्हयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

5. प्रत्येक गावासाठी एक आपले सरकार सेवा केंद्र मंजुर करण्यासाठी जिल्हा सेतू समितीच्या बैठकीमध्ये पात्र अर्जांची निकषानुसार निवड करून अंतिम मान्यता प्रदान करण्यात येईल.

6. अंतिमतः मंजुर करण्यात आलेल्या आपले सरकार सेवा केंद्र चालकांना अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांच्या मुळ प्रतिसह तपासणीसाठी जिल्हा सेतू समिती, नांदेड येथे बोलविण्यात येईल. मुळ कागदपत्रांच्या तपासणीसाठीचा दिनांक व वेळ नांदेड जिल्हयाच्या संकेतस्थळावर वेगळयाने प्रसिध्द करण्यात येईल, याकामी अर्जदारांनी या कार्यालयास भेट देवू नये.

7. कागदपत्र तपासणीसाठी येतांना प्रत्येक मंजूर केंद्र चालकांने कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा रक्कम रू. 20,000/- चा धनाकर्ष “E SUVIDHA COLLECTORATS NANDED” या नावाने अनामत (Deposit) म्हणुन जिल्हा सेतू समिती, जमा करावे लागेल, अन्यथा आपणास मंजुर करण्यात आलेले केंद्र रद्द करण्यात येईल.

8. तहनंतर आपले सरकार सेवा केंद्राचा आयडी उपलब्ध होण्यसाठी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यात येईल. वरिष्ठ कार्यालयाकडून केंद्रचालकास अजीत नमुद केलेल्या ई-मेल आयडीवर युजर आयडी व पासवर्ड प्राप्त होतील. त्यामुळे अर्जदारांनी आपला मेल आयडी व मोबाईल क्रमांक अचुक नमुद करावा. चुकीचा मेल आयडी नमुद केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदाराची असेल.

9. आपले सरकार सेवा केंद्र मंजुर झालेल्या केंद्र चालकांनी 01 महिन्यात संबंधित पोलीस स्टेशनचे चारीत्र्य प्रमाणपत्र या कार्यालयास सादर करणे बंधनकारक असेल. संबंधित पोलीस स्टेशनचे चारीत्र्य प्रमाणपत्र प्रत 01 महिन्याचे आत या कार्यालयास सादर न केल्यास अर्जदारास मंजुर करण्यात आलेले आपले सरकार केंद्र रद्द करण्यात येईल.

“आपले सरकार सेवा केंद्र” मिळणेकामीच्या अटी व शर्ती” :-

1. महाराष्ट्र शासन, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील शासन निर्णय क्रमांक मातंसं- 1716/प्र.क्र.517/39 दिनांक 19 जानेवारी, 2018 मधील निकष, कार्यपध्दती, सुविधा, जबाबदा-या, कारवाईची काटेकोरपणे अंमलबजावणी करणेस अधीन राहून केंद्राची नियुक्ती करुन केंद्र कार्यान्वित केले जाईल. तसेच वेळोवेळी प्रसिध्द होणारे शासन निर्णय / परिपत्रक / शुध्दीपत्रकात दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे बंधनकारक राहील, त्याचा भंग केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता केंद्र बंद करणेत येईल.

2. नागरीकांना विविध सेवा उपलब्ध करून देणे कामी उमेदवार हा गुंतवणूकीचे दृष्टीकोणातून सक्षम असला पाहीजे.

3. उमेदवारांकडे संगणक साहित्य व इतर अनुषंगीक साहित्य तसेच जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे.

4. महाराष्ट्र शासनाने प्रसिध्द केलेल्या आपले सरकार सेवा केंद्राबाबत 19 जानेवारी, 2018 च्या शासन निर्णयाला अधिन राहून केंद्राची नियुक्ती व कार्यान्वित केल्या जाईल. तसेच आवेदकांना अटी व शर्तीचे पालन करणे बंधनकारक असेल.

5. शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार केंद्र चालू ठेवणे, शासनाने ठरवून दिलेले दरपत्रक केंद्रावर दर्शनी भागात प्रसिध्द करणे, तसेच ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक शुल्काची आकारणी न करणे, शासनाने पुरविलेल्या आज्ञावलीचा (software) इ. योग्य वापर, संरक्षण, व जतन करणे आवेदकांना बंधनकारक राहील.

6. आपले सरकार सेवा केंद्राना शासनाचे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वेळोवेळी देण्यात येणारे निर्देशांचे पालन करावे लागेल. तसेच उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांचे वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे पालन करावे लागेल. तसेच त्यांना केंद्राबाबत मागविलेला अहवाल तात्काळ सादर करावा लागतील.

7. शासन निर्णयानुसार ठरवून दिलेल्या सेवा आपले सरकार सेवा केंदातून ऑनलाईन पध्दतीने देणे अनिवार्य राहील. याबाबत नागरीकांकडून तक्रार प्राप्त झाल्यास त्यांची गंभीर दखल घेण्यात येईल व चौकशी करुन कार्यवाही करण्यात येईल.

8. निर्गत केलेल्या दाखल्याच्या / प्रमाणपत्राच्या स्थळप्रती पुढील महिन्यात संबंधित उपविभागीय अधिकारी / तहसिल कार्यालयात जमा करणे बंधनकारक राहील.

9. अर्जदारास मंजुर करण्यात आलेल्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र चालविणे बंधनकारक असेल. मंजुर करण्यात आलेल्या ठिकाणी केंद्र चालवित नसल्यास अथवा दुस-या ठिकाणी चालवित असल्याचे आढळून आल्यास संबंधीत केंद्रचालकाची अनामत रक्कम जप्त करून केंद्र कायमस्वरुपी बंद करण्यात येईल व त्याचे नाव आपले सरकार सेवा केंद्र मिळण्याच्या काळया यादीत टाकण्यात येईल.

10. अर्जदारास आपले सरकार सेवा केंद्र मंजुर झाल्यानंतर अर्जदारांनी 06 महिन्याच्या कालावधीमध्ये एकही व्यवहार न केल्यास त्यांना मंजुर करण्यात आलेले केंद्र रद्द करून अर्जासोबत दिलेली अनामत रक्कम रू. 20,000/- जप्त करण्यात येईल.

11. प्राप्त अर्जापैकी कोणता अर्ज स्वीकारायचा, कोणता अर्ज नाकारायचा किंवा संपूर्ण प्रक्रिया कोणतेही कारण न देता रद्द करण्याचा अधिकार मा. अध्यक्ष, जिल्हा सेतू समिती, (जिल्हा ई- गर्व्हनन्स सोसायटी), तथा जिल्हाधिकारी, नांदेड. यांचेकडे राखून ठेवण्यात आले आहे.

अर्ज करण्याचे कालावधी: दिनांक 04/09/2023 पासून ते दिनांक 22/09/2023 सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – CSC सेंटर साठी असा करा ऑनलाईन नोंदणी अर्ज (Common Service Centres)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.