सरकारी योजनावृत्त विशेष

‘शासन आपल्या दारी’अंतर्गत महिला व बालविकास विभागाच्या विविध योजना !

राज्यात 1 एप्रिल 2023 पासून ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबवला जात आहे. शासनाच्या विविध योजनांची माहिती व लाभ एका छताखाली देण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हा उपक्रम राबवून प्रत्येक जिल्ह्याला किमान 75 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे.

त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यात हा कार्यक्रम लवकरच आयोजित केला जात असून त्या अनुषंगाने महिला व बालकल्याण विभागाकडे असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येत असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

‘शासन आपल्या दारी’अंतर्गत जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या योजनाची माहिती पुढील प्रमाणे देण्यात येत आहे.

महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर च्या स्वनिधीतून राबविण्यात येणाऱ्या योजना सन 2023-24.

>

योजना क्रमांक-1

1) योजनेचे नांव :- इ.5 वी ते 12 वीत शिकत असलेल्या मुलींना सायकली खरेदीचे अनुदान देणे. (सर्वसाधारण घटक)

योजनेचा उद्देश – ग्रामीण भागात एस.टी. ची सोय नसते किंवा शाळेच्या वेळेत एस.टी. नसते. त्यामुळे मुली शाळेत जाऊ शकत नाहीत. चालत जाण्यामुळे बराचसा वेळ वाया जाऊ शकतो.सायकलीमुळे वेळेची बचत होते व मुलींचे शाळेतील गळतीचे प्रमाण थांबते.

2)लाभार्थी निवडीचे निकष

1) लाभार्थी मुलगी ग्रामीण भागातील असावी.

2) लाभार्थी मुलगी इयता 5 वी ते 12 वी मध्ये शिकत असली पाहिजे.

3) लाभार्थीचे वास्तव्य ते शाळा यातील अंतर कमीत कमी 2 कि.मी. किंवा 1 कि. मी. पेक्षा जास्त असावे.

4)अनुदान मर्यादा जिल्हा परिषदेकडील खरेदी समिती निश्चित करेल ती राहील.

योजना क्रमांक –2

योजनेचे नांव- ग्रामीण भागातील इयता 7 वी ते 12 वी पर्यंत शिकणा-या मुलींना संगणक प्रशिक्षणकरीता अनुदान देणे.

योजनेचा उद्देश – ग्रामीण भागातील मुली संगणकाचे ज्ञान घेऊन त्याचे कौशल्य विकसीत करु शकतात. नोकरी व व्यवसायासाठी संगणकाची मदत होते.

लाभार्थी योजनेस पात्र होण्याचे निकष-

1)लाभार्थी ग्रामीण भागातील रहिवासी असावी.

2)लाभार्थी संगणक परीक्षा उत्तिर्ण झालेली असावी.

3)लाभार्थी दारिद्रय रेषेच्या कुटूंबातील असावी. अथवा वार्षिक उत्पन्न रु. 120,000/- पर्यंत असावे.

4)अनुदान मर्यादा जिल्हा परिषदेकडील खरेदी समिती निश्चित करेल ती राहील.

योजना क्रमांक-3

1) योजनेचे नांव :- ग्रामीण भागातील अनु-सूचित जातीतील इ.5 वी ते 12 वीत शिकत असलेल्या मुलींना सायकली खरेदीचे अनुदान देणे. (विशेष घटक योजना )

योजनेचा उद्देश- ग्रामीण भागात एस.टी. ची सोय नसते किंवा शाळेच्या वेळेत एस.टी. नसते. त्यामुळे मुली शाळेत जाऊ शकत नाहीत. चालत जाण्यामुळे बराचसा वेळ वाया जाऊ शकतो.सायकलीमुळे वेळेची बचत होते व मुलींचे शाळेतील गळतीचे प्रमाण थांबते.

2)लाभार्थी निवडीचे निकष

1) लाभार्थी मुलगी ग्रामीण भागातील असावी.

2) लाभार्थी मुलगी इयता 5 वी ते 12 वी मध्ये शिकत असली पाहिजे.

3) लाभार्थी अनु-जातीतील असलेचा सक्षम प्राधिकारी यांचा जातीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक.

4) लाभार्थीचे वास्तव्य ते शाळा यातील अंतर कमीत कमी 2 कि.मी. किंवा 1 कि. मी. पेक्षा जास्त असावे.

5) अनुदान मर्यादा जिल्हा परिषदेकडील खरेदी समिती निश्चित करेल ती राहील.

योजना क्रमांक –4

योजनेचे नांव- अनु-सूचित जातीतील ग्रामीण भागातील इयता 7 वी ते 12 वी पर्यंत शिकणा-या मुलींना संगणक प्रशिक्षणकरीता अनुदान देणे.

योजनेचा उद्देश – ग्रामीण भागातील मुली संगणकाचे ज्ञान घेऊन त्याचे कौशल्य विकसीत करु शकतात. नोकरी व व्यवसायासाठी संगणकाची मदत होते.

लाभार्थी योजनेस पात्र होण्याचे निकष-

1) लाभार्थी ग्रामीण भागातील रहिवासी असावी.

2) लाभार्थी संगणक परीक्षा उत्तिर्ण झालेली असावी.

3) लाभार्थी दारिद्रय रेषेच्या कुटूंबातील असावी. अथवा वार्षिक उत्पन्न रु. 120,000/- पर्यंत असावे.

4) लाभार्थी अनु-जातीतील असलेचा सक्षम प्राधिकारी यांचा जातीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक

5)अनुदान मर्यादा जिल्हा परिषदेकडील खरेदी समिती निश्चित करेल ती राहील.

योजना क्रमांक –5

योजनेचे नांव- माझी कन्या भाग्यश्री योजना.- सुधारीत

योजनेचा उद्देश –

1) मुलींचा जन्मदर वाढविणे,लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे.

2) एक किंवा देान मुली असणा-या कुटूंबाना मुलींच्या नांवे वैयक्तिक लाभ (रु. 50,000/-

किंवा रु. 25,000/-)

माझी कन्या भाग्यश्री- सुधारीत योजनेच्या अटी व शर्ती.

1) ज्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 8 लाखापर्यंत आहे अशा सर्व घटकातील लाभार्थ्यासाठी ही योजना लागू आहे.

2) 1 ऑगस्ट 2017 नंतरची पहिली व दुस-या अशा देान्ही मुली लाभास पात्र राहतील.

3) दि. 1 ऑगस्ट 2017 नंतरची एकच मुलगी आहे. व मातेने/पित्याने दोन वर्षाच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करुन प्रमाणपत्र व प्रस्ताव सादर केला आहे. अशा मुलीस रक्क्म रु. 50000/- चे मुदतठेव प्रमाणपत्र देय राहील.

4) दि. 1 ऑगस्ट 2017 नंतर दोन मुली आहेत. व एक वर्षाच्या आत माता/पित्याने कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करुन प्रमाणपत्र व प्रस्ताव सादर केला आहे. अशा प्रत्येक मुलींस रु. 25000/- चे मुदतठेव प्रमाणपत्र देय राहील.

5) प्रथम जुळया मुलींनंतर कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास सदर देान्ही मुलींना प्रत्येकी रु. 25000/- लाभ देय राहील.

6) लाभार्थी कुटूंबाने लगतच्या वर्षाचा रक्क्म रुपये 8.00 लाखपर्यतचा उत्पन्नाचा दाखला व रहिवासी (अधिवास) दाखला स्थानिक तहसिलदार यांचा सादर करणे आवश्यक राहील.

7) माझी कन्या भाग्यश्री- सुधारीत योजनेचे अर्ज नजीकचे अंगणवाडी केंद्रात प्राप्त होऊ शकेल.

8) योजनेचा अंतिम लाभ घेताना मुलींचे वय 18 वर्षै पुर्ण होणे तसेच तिने 18 वर्षे पुर्ण होईपर्यत अविवाहित असणे आवश्यक राहील.

इ.5 वी ते 12 वीत शिकत असलेल्या मुलींना सायकली खरेदीचे अनुदान देणे. (सर्वसाधारण घटक), ग्रामीण भागातील इयता 7 वी ते 12 वी पर्यंत शिकणा-या मुलींना संगणक प्रशिक्षणकरीता अनुदान देणे. ग्रामीण भागातील अनु-सूचित जातीतील इ.5 वी ते 12 वीत शिकत असलेल्या मुलींना सायकली खरेदीचे अनुदान देणे. (विशेष घटक योजना) व माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनांच्या निकषाची पूर्तता करणाऱ्या लाभार्थांनी योजनांचा लाभ मिळण्यासाठी अर्ज करावेत.

उपरोक्त योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत देण्यात येत असून अजूनही या योजनेचा लाभ मिळाला नाही अशा पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

हेही वाचा – घरबसल्या घ्या विविध सरकारी सेवांचा ऑनलाईन लाभ – Government Services Online

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.