महाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेष

राज्यात कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी नवे निर्बंध लागू

महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारनं नवीन निर्बंध जारी केले आहेत. असं असलं तरी नवीन निर्बंध हे कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान लागू केलेल्या निर्बंधांसारखे कठोर नाहीयेत. दुकानं, रेस्टॉरंट्स, सिनेमागृह या गोष्टी 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत.

  1. (9 जानेवारी 2022) रात्री 12 वाजेपासून हे निर्बंध लागू होणार आहेत.
  2. नव्या नियमांनुसार, पहाटे 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत महाराष्ट्रात जमावबंदी असेल. याकाळात 5 जणांपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही.
  3. रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी असेल. या काळात अत्यावश्यक कारणांशिवाय कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही.
  4. दहावी-बारावीच्या परीक्षा वगळता महाराष्ट्रातल्या शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत.

याव्यतिरिक्तही अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत.

  • दहावी-बारावीच्या परीक्षा वगळता महाराष्ट्रातल्या शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार.
  • स्विमिंग पूल, जिम, स्पा, वेलनेस सेंटर, ब्युटी पार्लर बंद.
  • हेअर कटिंग सलून 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार. रात्री 10 ते सकाळी 7 काळात हेअर कटिंग सलून बंद राहतील.
  • क्रीडा स्पर्धात्मक कार्यक्रम होणार नाहीत. राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय इव्हेंट्स या प्रेक्षकांशिवाय होतील आणि स्पर्धकांना आणि अधिकाऱ्यांना बायो बबलमध्ये रहावं लागेल.
  • एन्टरटेन्मेंट पार्क, प्राणी संग्रहालय, म्युझियम, किल्ले आणि तिकीट लागणाऱ्या इतर सार्वजनिक जागा बंद.
  • शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्समध्ये मर्यादित प्रवेश. लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच प्रवेश.
  • रेस्टॉरंट्स आणि उपहारगृह 50 टक्के क्षमतेने सुरू. लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच प्रवेश.
  • नाट्यगृह आणि सिनेमागृहातही 50 टक्के उपस्थिती. लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच प्रवेश.
  • अन्नपदार्थांची होम डिलीव्हरी सुरू राहणार.
  • विमान, रेल्वे वा रस्तेमार्गे राज्यात दाखल होणाऱ्या देशांतर्गत प्रवाशांना राज्यात दाखल होताना 72 तासांमधला RTPCR रिपोर्ट दाखवणं बंधनकारक.
  • UPSC, MPSC सारख्या स्पर्धा परीक्षा केंद्राच्या सूचनांनुसार होणार.
  • सरकारी कार्यालयांमध्ये उपस्थित कर्मचाऱ्यांची संख्या कमी करावी. वर्क फ्रॉम होमचा पर्याय किंवा वेगवेगळ्या कामाच्या वेळांचा पर्याय वापरावा. कार्यालय प्रमुखाने हे निर्णय घ्यावे.
  • खासगी कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचारी क्षमतेने काम.
  • लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच ऑफिसमध्ये जायची परवानगी. लसीकरण न झालेल्या कर्मचाऱ्यांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करावं.

राज्य सरकारची नवी नियमावलीची ऑर्डर पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – कलम 144 – जमावबंदी आणि संचारबंदी कायद्याविषयी संपूर्ण माहिती

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.