आपले सरकार - महा-ऑनलाईनवृत्त विशेष

आपले सरकार सेवा केंद्र – महा ई सेवा केंद्र अर्ज सुरू, पहा अटी शर्ती – Aapale Sarkar Seva Kendra Pune District

मा.माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडील दिनांक १९/०१/२०१८ चे शासन निर्णयान्वये आपले सरकार सेवा केंद्र नव्याने देणेबाबत निर्देश देणेत आलेले आहेत. त्यानुसार पुणे जिल्हयातील सर्व नागरिकांना CSC – SPV चे केंद्र मिळवण्यासाठी विहीत केलेल्या अटी व शर्ती पुर्ण करित असेल अशा व्यक्तींना सुचित करण्यात येते की, सदरचा जाहिरनामा व अर्जाचा विहीत नमुना व अटी व शर्तीबाबतची माहिती तसेच ग्रामीण भागा करिता ६३९, शहरी भागामधील पुणे महानगर पालिका ७४, पिंपरी चिंचवड महानगरपालिका ४५, नगरपालिका- १५, कटकमंडळ- ८, असे एकूण ७८१ ठिकाणांची यादी https://pune.gov.in/ आणि  https://asskpune.setuonline.com या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देणेत आलेली आहे. तरी अर्जदार यांनी त्यांचा अर्ज सादर करणेकामी https://asskpune.setuonline.com या संकेतस्थळावर भेट द्यावी.

ऑनलाईन अर्ज स्विकारण्याचा कालावधी : दिनांक ४/०१/२०२२ दुपारी १२.०० वा. पासून ते दिनांक ३/०२/२०२२ रात्री १२.०० वा. पर्यंत

ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करणेचा कालावधी : जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार

ऑनलाईन पात्र व अपात्र झालेल्या अर्जाची यादी प्रसिध्द करणेचा कालावधी : जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार दिनांक निश्चित केला जाईल.

>

अंतिम निर्णय घेण्यासाठी कालावधी : जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार दिनांक निश्चित केला जाईल.

आपले सरकार सेवा केंद्राकरिता ऑनलाईन https://asskpune.setuonline.com या संकेतस्थळावर भरावा. दिनांक ०३/०२/२०२२ नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

सदर आपले सरकार सेवा केंद्र चालविणेस मिळविण्यासाठी खालीलप्रमाणे निकष असून त्यानुसार कागदपत्रे आवश्यक आहेत.

१) अर्जदार हे “आपले सरकार सेवा केंद्र “चालविण्यासाठी ज्या गावातून ( रा …. गावाचे नाव.पो.ता.जि. पुणे, पिन कोड सहीत)/नगरपालिका प्रभाग/ कटक मंडळ / महानगरपालिका प्रभागामधून अर्ज करीत आहे त्याच गावातील रहिवासी असावा. रहिवासाबाबत खालील कागदपत्रांची साक्षांकित प्रत सोबत जोडावी आधारकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, निवडणूक ओळखपत्र, शिधापत्रिका, पोस्ट ऑफिस पासबुक, वाहन चालक परवाना, मिळकत कर पावती, लाईट बील (मागील तीन महिन्यातील कोणतेही एक), दुरध्वनी बील (मागील तीन महिन्यातील कोणतेही एक), पाणीपट्टी पावती, शस्त्र परवाना, राष्ट्रीय ग्रामिण रोजगार योजनेचे ओळखपत्र (मनरेगा).

२) अर्जदाराकडे स्वतःचे / भाड्याने घेतलेले दुकान अथवा जागा असावी. अर्जदार ज्या ठिकाणी केद्र चालवणार आहे त्या ठिकाणचा स्वतःच्या नावाचा ७/१२, प्रॉपर्टी कार्ड किंवा ज्या ठिकाणी अर्जदार केंद्र चालवणार आहे त्या ठिकाणचा अर्जदार आणि मुळ जमिन मालक यांच्यातील भाडेकरार पत्र सोबत जोडावे.

३) अर्जदार कमीत कमी १० वी पास असावा. शैक्षणिक पात्रते बाबतची कागदपत्रे – एसएससी सर्टिफिकेट, एचएससी सर्टिफिकेट, पदवीधर सर्टिफिकेट.

४) अर्जदार यांना किमान संगणकीय ज्ञान असले बाबत MS -CIT, CCC, GCC – TBC, GCC – SSD – CTC अथवा शासन मान्यता प्राप्त संस्थेकडील संगणकीय कोर्सेस प्रमाणपत्र आवश्यक किंवा संगणक / माहिती तंत्रज्ञान विषयातील पदवी / पदविका धारण केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

५) सर्व ग्राहकांना सौजन्याची वागणूक देणे आणि आवश्यक मदत व सहकार्य करणे.

६) विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत ठरवून दिलेले वेळापत्रक व निर्देश काटेकोरपणे पाळणे.

७) पर्यवेक्षीय संस्था, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाने निश्चित केलेल्या कार्यपध्दतीनुसार माहिती पुरविणे व दिलेल्या निर्देशांचे पालन करणे.

८) अर्जदार यांचे नावे दिलेले केंद्र दुसऱ्या ठिकाणी किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला (विक्री, भाडेकरार, पोटभाडे पध्दत व इतर मार्गाने) परस्पर देता येणार नाही. तसे केलेचे निदर्शनास आल्यास शासन निर्णय माहिती व तंत्रज्ञान विभाग, दिनांक १९ जानेवारी २०१८ अन्वये ८ मधील ३ नुसार गंभीर प्रकारची अनियमितता किंवा चुक असे मानून सदर केंद्र तात्काळ कायमस्वरूपी बंद करणेत येईल.

आपले सरकार सेवा केंद्र चालकांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे राहतील –

१) राज्य शासन पुरस्कृत डिजिटल पेमेंट वॉलेट “महा वॉलेट” कार्यान्वित झाल्यानंतर प्रत्येक आपले सरकार सेवा केंद्रास महा वॉलेट मार्फत सेवा आकाराचा भरणा करण्याचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध करून देणे आवश्यक असेल. तसेच, राज्य शासन मार्फत डिजिटल पेमेंट प्रणालीला चालना देण्यासाठी देण्यात येणाऱ्या सूचना (उदा. POS यंत्र किंवा बायोमेट्रिक रीडर यंत्र बसविणे, आधार पे प्रणालीचा वापर इ.) आपले सरकार केंद्र चालकावर बंधनकारक राहील.

२) शासनाने ठरवून दिलेले ब्रँडिंग चा वापर करणे तसेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाने स्थापन केलेल्या हेल्पलाईन क्रमांकाचा तपशील आपले सरकार सेवा केंद्राच्या दर्शनी भागावर प्रसिध्द करणे.

३) शासनाने ठरवून दिलेले दर केंद्रावर प्रसिध्द करणे तसेच ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक शुल्काची आकारणी न करणे.

४) शासनाने पुरविलेल्या वस्तू, आज्ञावली इ. चे योग्य वापर, संरक्षण व जतन करणे.

५) सर्व ग्राहकांना सौजन्याची वागणूक देणे आणि आवश्यक मदत व सहकार्य करणे.

६) विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत ठरवून दिलेले वेळापत्रक व निर्देश काटेकोरपणे पाळणे.

७) पर्यवेक्षीय संस्था, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाने निश्चित केलेल्या कार्यपध्दतीनुसार माहिती पुरविणे व दिलेल्या निर्देशांचे पालन करणे.

८) अर्जदार यांचे नावे दिलेले केंद्र दुसऱ्या ठिकाणी किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला (विक्री, भाडेकरार, पोटभाडे पध्दत व इतर मार्गाने) परस्पर देता येणार नाही. तसे केलेचे निदर्शनास आल्यास शासन निर्णय माहिती व तंत्रज्ञान विभाग, दिनांक १९ जानेवारी २०१८ अन्वये ८ मधील ३ नुसार गंभीर प्रकारची अनियमितता किंवा चुक असे मानून सदर केंद्र तात्काळ कायमस्वरूपी बंद करणेत येईल.

“आपले सरकार सेवा केंद्र” मिळणेकामीच्या अटी व शर्ती:

१) शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार केंद्र चालू ठेवणे, शासनाने ठरवून दिलेले दरपत्रक केंद्रावर दर्शनी भागात प्रसिध्द करणे, तसेच ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक शुल्काची आकारणी न करणे, शासनाने पुरविलेल्या आज्ञावलीचा (Software) इ. योग्य वापर, संरक्षण व जतन करणे आवेदकांना बंधनकारक राहील.

२) आपले सरकार सेवा केंद्र हे केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अधिसूचित ठिकाणीच चालविणे क्रमप्राप्त आहे.

३) केंद्राचे ठिकाण बदलण्यात आल्याचे निदर्शनास आल्यास गंभीर स्वरूपाची चूक समजून केंद्र रद्द करणेत येईल.

४) कुटूंबातील एका सदस्याला जिल्ह्यामध्ये (शहरी किंवा ग्रामीण भागात) फक्त एकाच ठिकाणी नव्याने आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करता येईल. (एका पेक्षा जास्त केंद्रासाठी अर्ज भरल्यास एकाच केंद्रास नियमानुसार मान्यता देणेत येईल.)

५) ग्रामीण व शहरी भागात सदर जाहीरनाम्याव्दारे प्रसिध्द केलेल्या रिक्त जागेसाठीच अर्ज सादर करावा. त्याव्यतिरिक्त इतर ठिकाणासाठी मागणी केलेस आपला अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

६) आपले सरकार सेवा केंद्राना शासनाचे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वेळोवेळी देण्यात येणारे निर्देशांचे पालन करावे लागेल. तसेच, उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांचे वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे पालन करावे लागेल. तसेच केंद्र चालकास आवश्यक ते अहवाल तात्काळ सादर करावे लागेल.

७) शासन निर्णयानुसार ठरवून दिलेल्या सेवा आपले सरकार सेवा केंद्रातून ऑनलाईन पध्दतीने देणे अनिवार्य राहील. याबाबत नागरीकांकडून तक्रार प्राप्त झाल्यास त्यांची गंभीर स्वरूपाची नोंद घेण्यात येईल व चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल.

८) निर्गत केलेल्या दाखल्याच्या प्रमाणपत्राच्या स्थळप्रती पुढील महिन्यात संबंधित उपविभागीय अधिकारी / तहसिल कार्यालयात जमा करणे बंधनकारक राहील.

९) अर्जामध्ये भरलेली माहिती चूकीची अथवा खोटी आढळल्यास त्यांचा अर्ज रद्द करण्यात येवून कायदेशीर कारवाई करणेत येईल.

१०) सदरचे आपले सरकार सेवा केंद्र नव्याने देणेबाबत रक्कम रु.३००/- ही शासकीय फी + नियमानुसार GST भरावी लागेल.

११) ज्या व्यक्तीच्या नावे पुर्वीचे आपले सरकार सेवा केंद्र दिलेले आहे किंवा कार्यरत/अकार्यरत आहे त्यांना पुन्हा नवीन आपले सरकार सेवा केंद्र करीता अर्ज करता येणार नाही. तसेच सध्यास्थितीत कार्यरत अथवा अकार्यरत आपले सरकार सेवा केंद्र चालक यांनी सदर प्रक्रियेमध्ये अर्ज सादर केलेस ही बाब गंभीर समजली जाईल तसेच त्यांचे आपले सरकार सेवा केंद्र हे कायमस्वरुपी रद्द करणेत येईल.

१२) ज्या केंद्र चालकांवर यापूर्वी प्रशासनमार्फत कार्यवाही करण्यात आलेली असेल अथवा कार्यवाही चालू केंद्रचालकांना नविन आपले सरकार सेवा केंद्र वाटप या योजनेमध्ये सहभाग घेता येणार नाही.

१३) शंकास्पद विवादस्पद अर्जाबाबत निर्णय घेणेचा तसेच अपवादात्मक परिस्थितीत संपूर्ण प्रक्रिया रद्द करणेचे अधिकारी मा. जिल्हाधिकारी, पुणे यांना आहेत.

१४) अर्जासोबत रहिवासाबाबत, जागेबाबत, शैक्षणिक पात्रतेबाबत, चारित्र्यबाबत, संगणकीय ज्ञानाबाबत वर नमुद केलेली कागदपत्रे लावणे आवश्यक आहे. कागदपत्रे न जोडता केवळ अर्ज केल्यास सदर अर्ज बाद ठरविण्यात येईल.

आपले सरकार सेवा केंद्रातर्फे द्यावयाच्या सेवांचा तपशिल:

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत आपले सरकार पोर्टल वर उपलब्ध सर्व ऑनलाईन सेवा आपले सरकार सेवा केंद्रामार्फत देण्यात येतील. या व्यतिरिक्त परिशिष्ट – क मध्ये दर्शविल्याप्रमाणे इतर सर्व शासकीय सेवा व व्यावसायिक सेवा ( B२C ) देखील आपले सरकार सेवा केंद्रामार्फत उपलब्ध करून देण्यात येतील. प्रत्येक सेवेसाठी आकारावयाचे शुल्क व त्या रक्कमेपैकी आपले सरकार केंद्र चालकाचा हिस्सा, शासन निर्णय दिनांक २३/०५/२०१२ व दिनांक १६/०९/२०१७ (वेळोवेळी झालेल्या/होणाऱ्या बदलांसह) व माहिती तंत्रज्ञान संचालनालयामार्फत वेळोवेळी निर्गमित निर्देशाप्रमाणे राहील.

आपल सरकार सेवा केंद्र – अधिसूचना पुणे जिल्हा (Aapale Sarkar Seva Kendra Pune District – Notification):

आपल सरकार सेवा केंद्र – अधिसूचना पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – CSC सेंटर साठी असा करा ऑनलाईन नोंदणी अर्ज (Common Service Centres)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

3 thoughts on “आपले सरकार सेवा केंद्र – महा ई सेवा केंद्र अर्ज सुरू, पहा अटी शर्ती – Aapale Sarkar Seva Kendra Pune District

  • akola jilhyasathi kadhi nightil

    Reply
    • अपडेट आल्यावर शेअर करू!

      Reply
  • Suryakant Rambhau Lende

    नमस्कार,
    मी, सुर्यकांत रामभाऊ लेंडे, आपल्या पोर्टलवर “आपले सरकार सेवा केंद्र” फॉर्म भरला असून मला TEXT मेसेज रजीस्टर मोबाईलवर आलेला आहे. परंतू, मेल आडीवर फॉर्मची जी कॉपी येत असते ती कॉपी आलेली नाही. कृपया सहकार्य करावे हि विनंती.
    Application ID- ASSKPU1142

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.