वृत्त विशेषमहाराष्ट्र शासन निर्णय - GR

सरकारी अधिकारी/कर्मचारी यांच्यावर शासकीय कार्यालयात मोबाईल वापरण्यासाठी आता नवे नियम

राज्य सरकारच्या सामान्य प्रशासनाने, “शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी/कर्मचारी यांच्या भ्रमणध्वनी वापराबाबतच्या शिष्टाचाराबाबत.’ अशा आशयाचे परिपत्रक काढून राज्य सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मोबाईल वापराबाबत नवा शिष्टाचार आणि नियम घालून दिले आहेत.

अलिकडील काळात सुलभ व वेगवान संपर्क माध्यम म्हणून शासकीय कामकाजात भ्रमणध्वनीचा (Mobile/Cell Phone) वापर अपरिहार्य बनला आहे. तथापि असे निदर्शनास आले आहे की, भ्रमणध्वनीच्या वापराबाबत काही वेळा संबंधित अधिकारी/कर्मचारी यांचेकडून अपेक्षित शिष्टाचार पाळण्यात येत नाहीत. अशा प्रकारच्या वर्तणुकीमुळे शासनाची प्रतिमा काही प्रमाणात मलीन होते. सबब शासकीय कामकाज करताना भ्रमणध्वनीच्या वापराबाबत पाळावयाच्या शिष्टाचाराबाबत खालीलप्रमाणे (नियम) सूचना देण्यात आल्या आहेत.

काय आहेत नियम :

१. कार्यालयीन कामासाठी दूरध्वनीचा वापर करताना प्राथम्याने कार्यालयातील दूरध्वनीचा (Landline) वापर करावा.

>

२. कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामासाठी आवश्यक असेल तेव्हाच भ्रमणध्वनीचा वापर करावा.

३. भ्रमणध्वनीवर बोलताना सौजन्यपूर्ण भाषेचा वापर करावा. तसेच बोलताना इतरांच्या उपस्थितीची जाणीव ठेवावी.

४. भ्रमणध्वनीवर बोलताना सौम्य आवाजात बोलावे, बोलताना वाद घालू नये तसेच असंसदीय भाषेचा वापर करू नये.

५. कार्यालयीन कामासाठी भ्रमणध्वनीचा वापर करताना लघुसंदेशाचा (Text Message) शक्यतो वापर करावा. तसेच मोबाईल फोनवर बोलताना कमीत कमी वेळेत संवाद साधावा.

६. भ्रमणध्वनी व्यस्त असताना प्राप्त लोकप्रतिनिधी/वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन कॉल्सना तात्काळ उत्तर द्यावे.

७. भ्रमणध्वनीवर कार्यालयीन कामकाजासाठी समाज माध्यमांचा वापर करताना वेळेचे व भाषेचे तारतम्य बाळगावे.

८. अत्यावश्यक वैयक्तिक दूरध्वनी, कक्षाचे बाहेर जाऊन घ्यावेत.

९. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात/ बैठकीदरम्यान असताना आपला भ्रमणध्वनी silent/vibrate mode वर ठेवावा.

१०. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात/बैठकी दरम्यान भ्रमणध्वनी तपासणे, संदेश तपासणे, ear place/ear phone वापरणे अशा बाबी टाळाव्यात.

११. कार्यालयीन कामकाजासाठी दौऱ्यावर असताना भ्रमणध्वनी बंद ठेवण्यात येऊ नये.

शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – शासकीय कामे होत नसतील तर ऑनलाईन पद्धतीने तक्रार कशी करायची जाणून घ्या सविस्तर

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.