वृत्त विशेष

मुंबई शहर जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहासाठी ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेले मुंबई शहर जिल्ह्यातील मुलामुलींच्या शासकीय वसतिगृहांचे सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरिता ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया दि. 22 नोव्हेंबर 2021 रोजी पासून सुरु झाली आहे.

राज्यातील मुंबई वगळुन इतर जिल्ह्यातील विद्यार्थी व विद्यार्थीनींनी खालील पत्त्यावर कार्यालयीन वेळेत ऑफलाईन प्रवेश आवेदन पत्र प्राप्त करुन त्यासोबत जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये महाविद्यालयात प्रवेश घेतल्याची पावती, 2 पासपोर्ट फोटो इत्यादी जोडून आवेदनपत्र सादर करण्यात यावे.

वसतिगृहाचे नाव, पत्ता व गृहपाल संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहे.

मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, बी.डी.डी.चाळ, वरळी-118, मुंबई-400018, संपर्क क्र. 8830316553 ; डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, वरळी-116, बी.डी.डी.चाळ, वरळी-116, मुंबई-400018, संपर्क क्र. 8830316553 ; संत मिराबाई मुलींचे शासकीय वसतिगृह, वरळी-116, बी.डी.डी.चाळ, वरळी-116, मुंबई-400018, संपर्क क्र.9987790430 असे पत्रकाद्वारे मुंबई शहरचे सहाय्यक आयुक्त यांनी कळविले आहे.

हेही वाचा – बॅंक, रेल्वे, एलआयसी, पोलिस, सैन्य भरती ई. स्पर्धा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण आणि शिष्यवृत्तीसाठी अर्ज सुरु

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.