PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता मिळवण्यासाठी; तात्काळ करा हे काम !
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Yojana) १७वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याचा लाभ जुलै २०२४च्या शेवटी वितरीत करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी प्रलंबित ईकेवायसी तात्काळ करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील ज्या शेतकऱ्यांची ईकेवायसी आणि ज्या शेतकऱ्यांचे आधार सीडींग प्रलंबित आहे, त्या शेतकऱ्यांनी प्रलंबित ईकेवायसी आणि आधार सीडींग व बँक खात्याला डीबीटी जोडणी करणे किंवा इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये खाते उघडून त्या खात्याला आधार संलग्न करून डीबीटी जोडणी करण्याचे काम तात्काळ पूर्ण करावे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी (PM Kisan Yojana) केंद्र आणि शासनाकडून वार्षिक प्रत्येकी सहा हजार आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमार्फत वार्षिक प्रत्येकी सहा हजार रुपये शेतकरी कुटुंबांना दिले जात आहेत. त्यासाठी ईकेवायसी आणि आधार सीडींग करणे अत्यावश्यक आहे.
ईकेवायसी आणि आधार सीडींग अभावी शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषि कार्यालय व तालुक्यातील कृषी सहाय्यक, गाव नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.
PM-KISAN योजनेबद्दल:
पीएम-किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 2000/- रुपये तीन समान मासिक हप्त्यांमध्ये म्हणजे एकूण 6000/-रूपये इतका निधी दिला जातो. हा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केला जातो.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आपले नाव पहायचे असेल तर आपल्यासाठी सरकारने आता ही सुविधा ऑनलाईन देखील प्रदान केली आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना २०२४ ची नवीन यादी अधिकृत संकेतस्थळ PMKisan वर तपासली जाऊ शकते. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना २०२४ च्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तापसण्यासाठी इथे क्लिक करा.
तुमच्या खात्यात 2 हजार जमा झाले नसतील तर ‘अशी’ करा तक्रार:
सर्वात आधी आपल्या क्षेत्रातील लेखापाल आणि कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागेल आणि त्यांना त्याबद्दल माहिती द्यावी लागेल. जर हे लोक आपलं म्हणणं ऐकत नसतील, तर आपण त्यासंबंधित हेल्पलाइनवर देखील कॉल करू शकता.
तुम्ही सोमवार ते शुक्रवारच्या मध्ये पीएम किसान हेल्प डेस्कच्या PM KISAN Help Desk ई मेल (Email) pmkisan ict@gov.in वर संपर्क करू शकता.
इथेही काहीच प्रतिसाद न मिळाल्यास आपण 011 23381092 (Direct HelpLine) या हेल्पलाइन नंबरवरही संपर्क करू शकता. तुमच्या खात्यात 2 हजार जमा झाले नसतील तर ऑनलाईन तक्रार करण्यासाठी (Grievance PM Kisan) इथे क्लिक करा.
- PM किसान सन्मान निधी योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती!
- PM किसान योजने संदर्भात तक्रार कशी आणि कुठे करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती!
- PMKISAN नोंदणीकृत शेतकऱ्यांची बायोमेट्रिक eKYC CSC सेंटर मधून करण्याची प्रोसेस !
- PMKISAN नोंदणीकृत शेतकऱ्यांची OTP आधारित eKYC प्रोसेस!
- PMKisan अंतर्गत लाभार्थ्यांच्या नवीन यादीमध्ये आपले नाव ऑनलाईन तपासा!
हेही वाचा – PM किसान सन्मान निधी योजना खात्याचे किंवा २००० हप्त्याचे स्टेट्स चेक करा!
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!