जिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेषसरकारी योजना

कुक्कुटपालन अनुदान योजना : कुक्कुट विकास गट स्थापन करण्यासाठी अर्ज सुरु – Poultry Scheme

महाराष्ट्र राज्यातील 302 तालुक्यामध्ये कुक्कुट पालनास चालना देण्यासाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्वावर सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करणे या योजनेसाठी जिल्हास्तरीय समितीने योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्राधान्यक्रमाने सन 2022-23 करीता परसातील  सधन कुक्कुट विकास गटाची स्थापन करण्याच्या या योजने अंतर्गत सन 2022-2023 करिता जिल्ह्यातील तालुक्यांमधून प्रति तालूका 1 या प्रमाणे लाभार्थीची निवड करावयाची आहे.

कुक्कुटपालन अनुदान योजना : कुक्कुट विकास गट स्थापन करण्यासाठी अर्ज सुरु – Poultry Scheme:

या योजनेसाठी अर्ज करणेचा कालावधी हा दिनांक २८ डिसेंबर २०२२ ते १० जानेवारी २०२३ असून इच्छूक लाभार्थीनी परिपूर्ण अर्ज भरुन संबंधित पंचायत समिती, पशुसंवर्धन विभागाकडे दि. १० जानेवारी २०२३ अखेर सादर करण्याची नोंद घ्यावी.

योजनेचे लाभार्थी निवडीचे निकष / अटी व शर्ती:

सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व जनजाती क्षेत्र उपयोजनेतील जे लाभार्थी सध्यस्थितीत कुक्कुटपालन व्यवसाय करीत आहेत, ज्या लाभार्थींकडे लघु अंडी उबवणूक यंत्र आहे, अशा लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत प्राधान्य देण्यात येईल. कुक्कुट व्यवसायात स्वयंरोजगार निर्मितीची आवड असणारे नवउद्योजकही अर्ज करु शकतात. प्रकल्प कार्यान्वित करण्याकरिता आवश्यक असणारी साधने, सुविधा व व्यवहार्यता पडताळून लाभार्थी निवडण्यात येतील.

मार्गदर्शक सूचना:

१) योजनेंतर्गत एकूण प्रकल्पाची किंमत 10 लाख 27 हजार 500 रु. पैकी सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना शासनाचे 50 टक्के अनुदान म्हणजेच 5 लाख 13 हजार 750 रु. देय असून उर्वरित 50 टक्के रक्कम लाभार्थी स्वतःचा हिस्सा किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊन उभा करु शकेल.
लाभार्थी/अर्जदाराची वयोमर्यादा 18/60 वर्ष राहील.

२) लाभार्थी निवडताना 30 टक्के महिला लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येईल. सन 2018-19 पासून टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणाऱ्या तरतुदीस अधीन राहून योजना राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 11 तालुक्यांसाठी प्रति तालुका एक प्रमाणे निवड करण्यात येणार आहे.

३) लाभार्थीकडे 2500 चौ.फू. जागा स्वतःच्या मालकीची असावी. त्या ठिकाणी दळणवळणाची, पाण्याची व विद्युतीकरणाची सुविधा उपलब्ध असावी.

४) प्रकल्प कार्यान्वित करताना शासनाचे अनुदान एकदाच देय असून, त्यानंतर प्रकल्प सुरळितरित्या चालू ठेवून पुढील खर्च संपूर्णपणे लाभार्थीने करावयाचा आहे.

५) या योजनेंतर्गत प्रकल्प उभारणीसाठी लाभार्थींनी बँकेकडून कर्ज घेतल्यास कर्जाची परतफेड स्वतः लाभार्थीने करावयाची असून कर्ज परतफेडीची जबाबदारी शासनाची राहणार नाही.

६) निवडलेल्या लाभार्थ्यांनी या योजनेअंतर्गत सधन कुक्कुट गटाच्या कामाचे व कुक्कुटपालनाचे पाच दिवशीय प्रशिक्षण नजिकच्या सधन कुक्कुट विकास प्रकल्पामार्फत घेणे बंधनकारक राहील.

७) पक्षीगृहाचा उपयोग कुक्कुटपालनासाठीच करणे बंधनकारक राहील.

८) कुक्कुट पक्षीगृहाच्या बांधकामासाठी प्रकल्प खर्चापेक्षा जास्त खर्च आल्यास तो लाभार्थ्यांनी स्वतः करावयाचा आहे.

९) लाभार्थीस हा व्यवसाय किमान तीन वर्ष करणे तसेच शासनास हमीपत्र देणे बंधनकारक राहील.

१०) लाभार्थीस पक्षीगृह बांधकाम, लघु अंडी उबवणूक यंत्र एकदिवशीय पिलांची 20 आठवडे वयाचे अंड्यावरील पक्षी, उबवणुकीची अंडी यांची खरेदी तसेच इतर पायाभूत सुविधा शासनाच्या निकषाप्रमाणे करणे बंधनकारक राहील.

११) सर्व बाबींची व कागदपत्रांची पूर्तता करुन तसेच पडताळणी झाल्यानंतरच शासन निर्णयात नमूद संबंधित बाबींच्या देय अनुदानाची रक्कम जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्यामार्फत लाभार्थींच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येईल.

१२) लाभार्थींनी विहित नमुन्यातील अर्ज संबंधित तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती यांचेकडून प्राप्त करुन घ्यावेत.

१३) पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांनी प्राप्त झालेले अर्ज जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यामार्फत लाभार्थी निवडीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्याकडे सादर करावेत.

आवश्यक कागदपत्रे:

  • फोटो आयडी / आधार कार्ड / ओळखपत्राची सत्यप्रत.
  • बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
  • लाभधारकाकडील मालमत्ता 7/12 व 8-अ उतारा आणि ग्रामपंचायत नमुना नं. ४.
  • कुक्कुट पालन व्यवसाय विषयक प्रशिक्षण घेतलेल्या प्रमाणपत्रांची छायांकित सत्यप्रत.
  • अनु. जाती/जमातीच्या अर्जदाराकरिता जातीच्या दाखल्याची सत्यप्रत.

योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त तसेच तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा.

हेही वाचा – परसातील कुक्कुटपालन योजना (पोकरा अंतर्गत) ऑनलाईन अर्ज करा

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.