स्पर्धा परीक्षावृत्त विशेष

नव्याने मंजूरी मिळालेल्या 10 सैनिकी शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठीची प्रक्रिया समजून घेण्यासाठी ई-कौन्सिलिंगच्या दुसऱ्या फेरीसाठी वेब पोर्टल पुन्हा सुरु

सैनिक स्कूल सोसायटीच्या नव्या सैनिकी शाळांमध्ये प्रवेशाची पहिली फेरी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर, आता दुसऱ्या फेरीच्या प्रवेशप्रक्रियेसाठी, ई-कौन्सिलिंग ( ई-समुपदेशन) वेब पोर्टल आजपासून पुन्हा सुरु झाले आहे.  दुसऱ्या फेरीत नव्या मान्यताप्राप्त 10 सैनिकी शाळांमध्ये 534 पदे भरली जाणार आहेत.

सैनिकी शाळांमध्ये प्रवेशासाठीची मार्गदर्शन/समुपदेशन प्रक्रिया https://sainikschool.ncog.gov.in/ecounselling  या पोर्टलवर 26 जून 2022 पर्यन्त उपलब्ध असेल.  राष्ट्रीय चाचणी संस्था- एनटीए ने घेतलेल्या अखिल भारतीय सैनिकी शाळा प्रवेश परीक्षेत (AISSEE-2022) उत्तीर्ण झालेले सर्व पात्र विद्यार्थी, ज्यांनी पहिल्या फेरीच्या ई-कौन्सिलिंग साठी नोंदणी केली होती, ते दुसऱ्या फेरीसाठी पात्र असतील. मात्र याला खालील अपवाद आहेत, ते खालीलप्रमाणे :

  • ज्या विद्यार्थ्यांना याधीच सैनिकी शाळेत प्रवेश मिळाला आहे (सध्याच्या किंवा नव्याने सुरु होणाऱ्या).
  • ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत, त्यांनी दिलेल्या प्राधान्य/पसंतीक्रमाच्या बाहेरच्या शाळांमध्ये प्रवेश मिळाला आहे, मात्र त्यांनी त्याला अजिबात प्रतिसाद दिलेला नाही.
  • ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला असूनही, त्यांनी त्यासाठी उत्सुकता दर्शवलेली नाही.
  • पहिल्या फेरीत ज्यांना त्यांच्या पसंतीच्या शाळेत प्रवेश मिळाला असून, त्यांनी तिथे जाण्याची इच्छाही दर्शवली आहे. मात्र अद्याप प्रवेश शुल्क भरलेले नाही.

असे, सगळे वगळता इतरांना दुसऱ्या फेरीच्या ई-समुपदेशनात प्रवेश घेता येईल. दुसऱ्या फेरीत प्रत्येक पात्र विद्यार्थी त्याच्या पसंतीच्या तीन शाळा सांगू शकतो/शकते. प्रत्यक्ष पडताळणी आणि प्रवेश शुल्क भरण्याची तारीख, लवकरच पोर्टलवर अपलोड केली जाईल. सविस्तर माहितीसाठी, पात्र आणि इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश पोर्टलला भेट द्यावी.

हेही वाचा – भारतीय हवाई दलात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती – Air Force Agnipath Recruitment 2022

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.